Water problem of Baner-Balewadi-Sus-Mhalunge | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (Baner-Balewadi-Sus-Mhalunge) येथील  पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे मा.नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या मागणी नुसार महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Vikram Kumar) प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी महापालिका आयुक्तांनी अत्यंत गंभिर असलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी नागरीकांनी चार चार दिवस मनपा कडुन कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा बाणेर-बालेवाडी भागाला होत नसल्याने धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असुन देखिल येथील नागरीकांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे असे आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यावर तातडीने उपाय योजना करुन वारजे येथुन पाणी पुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच बालेवाडी येथील अंडर ग्राऊंड टाकीमध्ये पंप बसवुन बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले.( Water problem Baner-Balewadi-Sus-Mhalunge )

तसेच २४x७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उर्वरीत पाईप लाईनचे काम पुर्ण करणे, नविन टाक्यांना पंप बसवुन टाक्या कार्यरत कराव्या व त्यातुन या भागाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश देखिल  आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी “बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागाला त्यांच्या हक्काचा मुबलक पाणी पुरवठा करुन येथील नागरीकांना व माता-भगिनींना लवकरात लवकर या कृत्रिम टंचाईतुन मुक्तता करावी” अशी मागणी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. तसेच या भागातील सर्व वॅाल्व्हची पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना योग्यरित्या हताळण्याची आवश्यकता असल्याचे देखिल सांगितले.

यावेळी “या भागाला निर्माण झालेली पाणी समस्या हि पुर्णपणे कृत्रिम असुन या भागातील सर्व वॅाल्वमन ला सक्तिची ताकिद देवुन सर्व वॅाल्व पुर्वरत करत या भागाला लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करण्याची मागणी” यावेळी गणेश कळमकर यांनी केली.

यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा नेते गणेश कळमकर, युवा नेते लहु बालवडकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदिप बालवडकर, अस्मिता करंदिकर व परिसरातील सोसायटींचे नागरीक, ग्रामस्थ व पुणे मनपा पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प

| अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प अमोल बालवडकर फाऊंडेशन  आणि भाजपा सक्रिय महिला यांच्या वतीने केला आहे.

याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, आज या अभियानाची सुरुवात योग्य व्यक्तीच्या हाती पहिला तिरंगा देऊन करावी असे मनात होते. या अनुषंगाने आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला प्रोत्साहन देणार्या शूरवीराच्या मातोश्री सौ.मित विज यांना पहिला तिरंगा देऊन या अभियानाला सुरुवात झाली. आपल्या प्रभागातील एक युवक लेफ्टनंट गुरप्रितसिंग विज हे भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावत असुन त्यांच्या मातोश्री सौ.मित विज व त्यांचा संपुर्ण परिवार कायमच गुरप्रित सिंग यांना प्रोत्साहन देत असतात. यावेळी गुरप्रित सिंग सैन्य दलात बजावत असलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्या मातोश्रींकडुन माहिती घेतली.

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरचे सैनिक किंवा देशसेवा करणारे सगळे लोक जेव्हा देशासाठी आपले योगदान देतात तेव्हा फक्त तेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचे योगदान मोठे असते. त्यामुळे या सर्वांच्या हिमतीने आणि त्यागामुळे आज देश ताठ मानेने उभा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या-ज्या सैनिकांनी बलिदान दिले आणि आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी जे-जे सैनिक स्वतःचे मौलिक योगदान देत आहेत अशा सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा! असे ही बालवडकर म्हणाले.

Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा

| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.

यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.

“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.

यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 

Categories
Breaking News PMC पुणे

मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली

| औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत

पुणे | महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती.  त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.

या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, .उपायुक्त नितीन उदास यांनी केली.  सदर काम  महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत  यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात काम पूर्ण केले.

Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political social पुणे

प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार

: पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन

पुणे :  म्हाळुंगे येथे पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे  यांच्या उपस्थितीत ग्रामस्तांसोबत टीपी स्किम बाबत समस्या व सूचनां करिता बैठक संपन्न झाली. टीपी स्किम बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला या टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा आहे आणि टिपी स्किमच्या ध्येय-धोरणाबाबत नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये कुठलीही शंका नाहीये. निश्चितपणे काही शेतकरी असमाधानी आहेत पण त्यांच्या बाबतीतदेखील विचार केला जाईल असे मत, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी नागरिकांना दिला.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिली टीपी स्किम २०१७ मध्ये म्हाळुंगे येथे साकारण्यास सुरुवात झाली. तेव्हा २०१७ साली पालकमंत्री गिरीशजी बापट साहेबGirish Bapat यांच्या उपस्थितीमध्ये पहिली मिटींग येथील ग्रामस्थांसोबत मी मिटकॉन कॅालेज बालेवाडी येथे आयोजित केली होती. त्याच्या नंतर टीपी स्किम बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला या टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा आहे आणि टिपी स्किमच्या ध्येय-धोरणाबाबत नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये कुठलीही शंका नाहीये. निश्चितपणे काही शेतकरी असमाधानी आहेत पण त्यांच्या बाबतीतदेखील विचार केला जाईल असे मत असा विश्वास सुद्धा आयुक्तांनी यावेळी नागरिकांना दिला. या टीपी स्किम मुळे निश्चितपणे म्हाळुंगे गावचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हाळुंगे गाव हे इतर गावांपेक्षा निश्चितपणे विकासामध्ये मागे राहिलेले आहे. पण टीपी स्किम मुळे निश्चितपणे हे गाव इतर गावांप्रमाणे विकासाची गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, पीएमआरडीए चे आयुक्त यांना जमीन मालक व शेतकऱ्यांच्यासोबत भेटून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची विनंती मी व माझे सहकारी गणेशजी कळमकर यांनी केली होती, तेव्हा त्यांनी आज ही वेळ दिली होती. यावेळी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे, विवेक खरवडकर, नगरसेविका ज्योती  कळमकर व पीएमआरडीए चे इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी पीएमआरडीए च्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी पेक्षा अधिक तरतूद या टिपी स्किमकरीता उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन आयुक्त साहेबांनी दिले. तसेच म्हाळुंगे गावांमधील महत्त्वाचे डीपी रस्ते प्राथमिकतेणे विकसित करण्यावरती लक्ष केंद्रित केले जाईल” असेही यावेळी दिवसे साहेब यांनी सांगितले. म्हाळुंगे गावामध्ये १२ मी, ३० मी, ३६ मी रस्ते विकसित करण्याला प्राधान्य दिले जाईल.

बालवडकर पुढे म्हणाले, यावेळी मी म्हाळुंगे येथील स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या त्यातील काही मुद्दे या बैठकी दरम्यान मी सर्वांसमोर मांडले ते मुद्दे खालील प्रमाणे :-
१)Property card चे वाटप केव्हा होणार..?
२)रस्ते डेव्हलपमेंट
३)प्लॉटला चिरा लावणे
४)प्रत्यक्ष जागेवर रस्ते आखणी व रस्ते विकसित करणे.
५)रस्ते संपूर्ण कधीपर्यंत विकसित होणार..?
६)ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बाबत समाधानी नाहीत त्याबाबत आपण काय करणार..?
७)जर तुम्ही प्रॉपर्टी कार्ड दिले तर शेतकरी बांधकाम नकाशा मंजूर करू शकतो का..?
८)बांधकाम नकाशा मंजूर करायला जर शेतकरी गेला तर त्याला हेलपाटे घालावे लागतील का..?
९) संपूर्ण टीपी स्किम मध्ये ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, एम एस सी डी सी एल लाईन वॉटर लाईन पीएमआरडीए मार्फत विकसित होणार का..?
१०)नवीन आर्थिक वर्षात २०२२-२०२३ मध्ये पीएमआरडीए म्हाळुंगे
गावासाठी किती आर्थिक तरतूद करणार आहे..?
११)पाणीप्रश्न – पाण्याच्या नियोजनाबाबत पीएमआडीए ची
भूमिका काय आहे..?
१२)म्हाळुंगे गावामध्ये एक गार्डन एक मैदान लवकरात लवकर
तयार करा.
यावेळी बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने सर्व ग्रामस्थ बांधवांनी समाधान व्यक्त केले. तसेच म्हाळुंगे गावामध्ये विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सर्व ग्रामस्थांनी पीएमआरडीए ला दिले.