Store Department | संतोष वारुळे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाची जबाबदारी चेतना केरुरे यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

संतोष वारुळे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाची जबाबदारी चेतना केरुरे यांच्याकडे!

पुणे | महापालिका प्रशासनाने उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार आणि सांस्कृतिक व क्रीडा विभागाची जबाबदारी काढून घेत ती प्रतिनियुक्तीने नुकत्याच आलेल्या चेतना केरुरे यांच्याकडे देण्यात आली आहे. वारुळे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार चा कार्यभार चार महिन्यापूर्वीच देण्यात आला होता. थोड्याच अवधीत त्यांनी खात्यात शिस्त आणली होती. पारदर्शीपणे कारभार करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय सांस्कृतिक आणि क्रीडा खात्याचे काम करताना देखील महापालिकेला चांगले उत्पन्न मिळवून दिले होते. असे असताना त्यांच्याकडील ही दोन्ही खाती काढून घेण्यात आली आहेत. मात्र यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर अन्याय होत असल्याची भावना महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. (PMC Pune)
उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे आता परिमंडळ क्रमांक 2, बीओटी सेल, जनरल रेकॉर्ड आणि मुद्रणालय विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे मध्यवर्ती भांडार, सांस्कृतिक व क्रीडा विभाग आणि निवडणूक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उपायुक्त नितीन उदास यांच्याकडेही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. उदास यांच्याकडे समाज कल्याण व समाज विकास विभाग तसेच तक्रार निवारण अधिकारी(दिव्यांग) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation)

Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 

Categories
Breaking News PMC पुणे

मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली

| औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत

पुणे | महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती.  त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.

या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, .उपायुक्त नितीन उदास यांनी केली.  सदर काम  महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत  यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात काम पूर्ण केले.