PMC Pune Teachers | पती-पत्नी एकत्रीकरण बदलीने पुणे महापालिकेत 219 उप शिक्षकांच्या नियुक्त्या

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Pune Teachers | पती-पत्नी एकत्रीकरण बदलीने पुणे महापालिकेत 219 उप शिक्षकांच्या नियुक्त्या

PMC Pune Teachers | राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थातील (Local Bodies) शिक्षकांच्या बदल्या (Teachers Transfer) पती पत्नी एकत्रीकरण बदलीने केल्या जातात. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) शिक्षण विभागात (PMC Education Department) देखील असे शिक्षक रुजू करून घेतले जातात. त्यानुसार एकतर्फी तथा एकत्रीकरण बादलीने पुणे महापालिकेच्या (PMC Pune) शिक्षण विभागात 219 उप शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे( Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Teachers)

बदलीने नेमणुकीच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे

1.  शिक्षक रुजू झाल्यास त्यांना पूर्वीचे सेवा कालावधीतील पारीभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असल्यास जमा असलेल्या निवृत्ती वेतन अंशदान रकमा इतर तदनुषंगिक रक्कमा पूर्वीच्या संस्थेने/कार्यालयाने संबंधीत कर्मचाऱ्यांनीपुणे मनपाकडे भरणे आवश्यक आहे.

2.  शिक्षकांची सेवाज्येष्ठता इकडील कार्यालयाकडे प्रत्यक्ष रुजू झालेल्या दिनांकापासून धरण्यात येईल.

३. पुणे महानगरपालिकेकडे रुजू होणेपुर्वीचा वेतनाचा कोणताही फरक (वरिष्ठश्रेणी पदवीधर वेतनश्रेणी,निवडश्रेणी,वेतन आयोगाचा फरक व इतर तदनुषंगिक रक्कमा ) पुणे महानगरपालिकेकडून
देय राहणार नाही.
4. उपरोक्त शिक्षक रुजू झाल्यास त्यांचेवर पुणे महानगरपालिकेने ठरविलेल्या अटी/शर्ती व सेवाविषयक धोरणाबाबत होणारा बदल बंधनकारक राहतील. तसेच सदर शिक्षक पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कोणत्याही शाळेत बदली पात्र राहतील.

5. उपरोक्त शिक्षकांनी रुजू होणेपुर्वी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रती व इतर सर्व कागदपत्रे प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडे सादर करावी.
६. उपरोक्त शिक्षकांस सदरचा आदेश प्राप्त झालेवर इकडील सेवेत रुजू होणेसाठी संबंधीत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यमुक्त करण्यात यावे.
7. सदर शिक्षकांची बदली विनंती अर्जानुसार झालेली असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता मिळणार नाही.
८. सदरची बदलीने नियुक्ती ही संच मान्यतेनुसार करण्यात येत आहे. सदर शिक्षकांना प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपा यांनी आपल्या स्तरावर शाळा देण्यात यावी.
9.  शिक्षक रुजू झाल्यास त्यांना मे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रं
संकीर्ण-२०१८/प्र.क्र. ३८९ / नवी २० मुंबई ३२ दिनांक १६/०२/२०२१ मधील नमूद अटी शर्ती लागू राहतील.
१०. संबंधित शिक्षकांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही तफावत आढळून आल्यास सदरची बदली रद्द करून संबंधित शिक्षकांस मूळ आस्थापनेवर पाठविण्यात येईल. वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधीत खातेप्रमुख
यांची राहील. असे आदेशात म्ह्टले आहे.

—-
Teachers Title |

Holiday for all schools in Pune | पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार 

Categories
Breaking News Education PMC पुणे

पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार

| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे | पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण भरले असल्याने  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशातच आगामी काळातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.

water at polling stations | पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

| निवडणूक विभागाची शिक्षण विभागाकडे मागणी

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीची महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचनेननंतर आता मतदारयाद्या देखील अंतिम करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान  अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी  पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवडणूक विभागाने शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी शिक्षण विभागाला तसे पत्र दिले आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात असून तद्नंतर लवकरच तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले विभागांतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून काही दुरुस्ती असल्यास किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास त्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून त्या दुरुस्त करून घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेकामी आपणाकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना योग्य ते आदेश होणेस विनंती आहे. असे पत्रात म्हटले आहे.