Repaired 90% potholes | महापालिकेचा ९०% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा  | शहरात मात्र खड्डेच खड्डे 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेचा ९०% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा

| शहरात मात्र खड्डेच खड्डे

पुणे महानगरपालिकेच्या जुन्या व नवीन समाविष्ट गावांमध्ये पावसाळ्यामध्ये पथ विभागामार्फत रस्ते दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून गेल्या तीन दिवसात सुमारे 90% खड्डे दुरुस्तीची कामे व चेंबर दुरुस्तीची कामे तसेच पावसाचे पाणी साठल्याच्या ठिकाणाचे निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असा दावा महापालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आला आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे कि शहरात रस्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा दावा पोकळच ठरत आहे.

पथ विभागामार्फत खालील प्रकारे कामे करण्यात आलेली आहेत

1. कोल्ड मिक्स डांबरीमाल वापरून
2. कोल्ड इमल्शन वापरून
3. जेट पॅचर मशीनद्वारे
4. पूनावाला ग्रुप यांचे मशीनद्वारे
5. केमिकल युक्त काँक्रीट वापरून
पथ विभागाकडील 5 रोलर व 15 आर एम व्ही टीम तीन पाळीमध्ये अहोरात्र काम करून पथ विभागाकडील सर्व अभियंते आपापल्या कार्यक्षेत्रात काम करीत आहेत.

दिनांक 16.7.2022 ते 18.7.2022 या कालावधीत खालील प्रमाणे कामे करण्यात आलेली आहेत.
1. खड्डे दुरुस्ती =968
2. चेंबर उचलणे =65
3. पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची ठिकाणे =11
वरील कामांसाठी पथ विभागामार्फत खालील प्रमाणे माल मटेरियल वापरण्यात आलेले आहे.
1. कोल्ड मिक्स =1260बॅग
2. इमल्शन ड्रम =50
3. खडी /ग्रीट =50 टन

पथ विभागामार्फत अनाधिकृत पणे खोदाई करणाऱ्याना आळा बसवण्यासाठी, भरारी पथकाची अहोरात्र नेमणूक करण्यात आली आहे.(रविवार वगळून) नागरिकांना तक्रार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे तक्रारीसाठी नागरिकांना खालील जनसंपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.

1. कार्यालयीन वेळेत – 020-25501083
2. फिरते पथक मो. नं.+91-9049271003

Private and IT companies | पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या  | खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन 

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या

 खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन

पुणे |  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यात पुढील २ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्या यांना आवाहन करण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या दृष्टीने, त्यांनी पुढील २ दिवस त्यांचे अधिनस्थ कर्मचारीवर्ग यांना वर्क फ्रोम होम करण्यासाठी प्रोत्साहित करावे.