Water cuts in Pune | दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी या उपाय योजना करा ! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Water cuts in Pune | दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी या उपाय योजना करा !

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

Water cut in Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने  18 मे पासून पुणे शहारामध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद (water cut in Pune) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी काही उपाय योजना करावी. कारण पुणे शहराच्या आजुबाजूला असणाऱ्या उपनगरामध्ये म्हणजेच प्रभाग क्र 31 व 32 वारजे माळवाडी मध्ये ज्या वेळेस क्लोजर घेण्यात येतो तेव्हा पुढील चार दिवस पाणी पुरवठा बंद असतो किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल होतात. हा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत या साठी काही उपाय योजना आपण करावी. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे (PMC Pune water supply department) केली आहे. (Water cut in Pune)

: हे करा उपाय

1 ) गांधीभवन टाकी ही गुरवारी पाणी पुरवठा बंद होण्यापूर्वी, बुधवारी संपूर्ण पाणीपुरवठा झाल्यानंतर
कमीत कमी 80% भरणे गरजेचे आहे. तसेच बुधवारी रात्री कुंभारवाडी टाकी भरणे गरजेचे आहे.
2 ) खडकवसला पंपिंग स्टेशन दरवेळेस रात्री 12 ते 1 किंवा 2 या वेळे प्रमाणे चालू होते, त्या ऐवजी
पंपिंग दर गुरुवारी रात्री 9 ते 10 या वेळे दरम्यान चालू झाले पाहिजे.
4 ) पंपिंग ची लाईट गेल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो, एम.एस.ई.बी चा एक फिडर बंद झाल्यास
दुसऱ्या फिडर वरुन लाईन चालू ठेवण्याची व्यवस्था एम.एस.ई.बी यांच्याकडून सुधारणा व्हावी व जनरेटर
मोठ्या प्रमाणाचा बसवावा.
5 ) एल अँड टी च्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा.
6 ) ज्या भागात पाणी पुरेसे मिळत नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा.
7 ) वारजे माळवाडी भागात पाणी पुरवठा मेंटेनेसची कामे कमी असल्याने शक्यतो क्लोजर रद्द करावा.
8 ) काही बैठ्या सोसायटी मध्ये चढावर असणाऱ्या घरांना पाणी मिळत नाही यासाठी वॉल सिस्टिम
करावी. (Pmc Pune water cuts)
प्र.क्र 31 व 32 मध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन नागरिकांचे पाण्यावाचून हाल होऊ नये त्यासाठी उपाय योजना करावी. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.
News Title | Water cuts in Pune | Plan these measures before shutting down the water supply every Thursday!| Former opposition leader Deepali Dhumal’s demand to the municipal administration

Water cut in Pune on Thursday |  From next Thursday, water will be shut off in the entire Pune city every Thursday  | Air wall installed at 20 places

Categories
Breaking News PMC पुणे

Water cut in Pune on Thursday |  From next Thursday, water will be shut off in the entire Pune city every Thursday  | Air wall installed at 20 places

 – Pune civic Body appeal to Pune residents to use water sparingly

 Water cut in Pune on Thursday |  The Pune Municipal Water Supply  department has appealed to the people of Pune to use water sparingly in the future.  Because the decision to save water on the lines of El Nino storm has been taken by the municipal administration (Pune civic body).  Accordingly, from May 18, water will be shut off in the entire city every Thursday.  The planning of the administration has been completed in this regard.  On Friday and Saturday, water may come under low pressure in some areas, so the administration has appealed to use water sparingly.  (Pune water supply cut)
 The state government is serious about water in the wake of Al Nino storm.  Along with reservation of drinking water, the government has given instructions to cut water wherever necessary. Accordingly, the Pune municipal corporation (PMC) has made a plan. Meanwhile, will water cut be implemented in Pune? If so, will water be available every other day?  This meeting was held. Guardian Minister Chandrakant Patil had given instructions to review water reduction. According to this decision has been taken after review by the municipal administration. (Pune water cut news)
 Air walls were installed at 20 places
 Meanwhile, there are some areas in the city where water supply is shut off for one day and the problem of water shortage arises for the next three days.  (Pune water cut) Because of this, the citizens are troubled.  The key issue is how the administration will plan in such areas.  The administration has prepared accordingly.  In this regard, Anirudh Pavaskar, head of water supply department, said that there are some parts of the city which are called tail end.  If the water is shut off for one day in such a place, water comes at low pressure for the next two days.  Technical corrections have been made in this regard.  There are 20 localities in the city.  Air wall has been installed there.  This will decrease the air pressure and increase the water pressure.  Vents have been installed in some places.  These walls have been installed at places like Warje, Karvenagar, Yerwada, Kharadi, Taljai Plateau, Rasta Peth, Nana Peth.  (Pune water news)

Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल 

Categories
Breaking News PMC social पुणे

Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल

– पाणी जपून वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे पुणेकरांना आवाहन

Water cuts in Pune | पुणेकरांना आगामी काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Pune Water Department) करण्यात आले आहे. कारण अल निनो (El-Nino) वादळाच्या धर्तीवर पाणी बचत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाचे नियोजन पूर्ण  झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी काही परिसरात कमी दाबाने पाणी येऊ शकते, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune Water cut)
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे (निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणीमिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

20 ठिकाणी बसवण्यात आले एअर वॉल

दरम्यान शहरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एका दिवशी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. (Pune water cut) त्यामुळे नागरिक त्रासून जातात. अशा भागात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करणार, हा कळीचा मुद्दा आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले कि शहरातील असे काही भाग आहेत ज्यांना टेल एन्ड (Tail End) म्हटले जाते. अशा ठिकाणी एक दिवस पाणी बंद ठेवले तर पुढील दोन दिवस पाणी कमी दाबाने येते. याबाबत तांत्रिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. असे शहरात 20 परिसर आहेत. तिथे एअर वॉल (Air Wall) बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे हवेचा दाब कमी होईल आणि पाण्याचा दाब वाढेल. तर काही ठिकाणी वेन्ट बसवण्यात आले आहेत.  वारजे, कर्वेनगर,  येरवडा, खराडी, तळजाई पठार, रास्ता पेठ, नाना पेठ अशा ठिकाणी हे वॉल बसवण्यात आले आहेत. (Pune pmc News)
—-
News Title | Water cuts in Pune | From next Thursday, water will be shut off in the entire Pune city every Thursday Air wall installed at 20 places