Assessment of Properties | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मिळकतींचे मूल्यांकन 34 हजार 886 कोटी  | महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी होणार उपयुक्त 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

पुणे महापालिकेच्या मिळकतींचे मूल्यांकन 34 हजार 886 कोटी 

| महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी होणार उपयुक्त 

 
पुणे | पुणे महापालिकेच्या 3912 मिळकती आहेत. पुढील काळात यामध्ये अजून वाढ होऊ शकते.  विविध विभागाच्या ताब्यात या मिळकती आहेत. या मिळकतीच्या 7/12 वर महापालिकेचे नाव देखील लावण्यात आले आहे. अशा सर्व मिळकतीचे एकूण मूल्यांकन 34 हजार 886 कोटी होत आहे. ज्याचा उपयोग महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी होणार आहे. 

महापालिकेच्या विविध विभागाच्या ताब्यात एकूण 3912 मिळकती आहेत. यामध्ये दुकाने, हॉल, भाडेतत्त्वावर दिलेल्या मोकळ्या जागा, समाविष्ट गावातील मिळकती, सदनिका, क्रीडासंकुले, उद्याने, रुग्णालये, सांस्कृतिक भवन, भाजी मंड्या, शाळेच्या इमारती, पाणीपुरवठा केंद्र, अमेनिटी स्पेस, चाळ विभागाकडील इमारती, समाज मंदिरे, मनपा वाहनतळे यांचा समावेश आहे. या सर्वांची सुरक्षा महत्वाची आहे. कारण महापालिकेच्या जागा परस्पर भाड्याने देण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे महापालिका याबाबत दक्ष झाली आहे. त्यामुळे महापालिकेने या मिळकतीच्या सुरक्षेवर लक्ष दिले आहे.

महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने मिळकतीचे पॉलीगोन मॅपिंग देखील केले आहे. तसेच महापालिकेच्या ताब्यात आलेल्या 3500 मिळकतीचे कलेक्टर दप्तरी 7/12 वर पुणे महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही केली आहे. पुणे महापालिकेच्या सर्व मिळकतीचे मूल्यांकन करण्यात आले असून एकूण मूल्यांकन 34 हजार 886 कोटी करण्यात आले असून महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी उपयुक्त होणार आहे.