No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका

| जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश

No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या काही भागांत नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या त्रासाला कंटाळून नागरिक ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी  गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. (Loksabha Election Voting)
जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि लोकांनी पुढे यावे म्हणून जनजागृती करत आहे. मात्र दुसरीकडे लोक मूलभूत समस्यांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सतर्क झाले आहे. लोकांना बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत.

Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

Categories
Breaking News social पुणे

Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बी विंगमधील चौथ्या मजल्यावर तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तक्रारी स्विकारण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून कक्षाकडे १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांक किंवा cvigilldccelection2024@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तक्रार करता येईल. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांना कळविण्यात येते.

कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदान यादीत नाव नोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

000

Loksabha Election 2024 Code of Conduct | महापालिका निवडणूक विभागाने सर्व विभागाकडून मागवली चालू विकास कामांची माहिती! 

Categories
Breaking News PMC पुणे

Loksabha Election 2024 Code of Conduct | महापालिका निवडणूक विभागाने सर्व विभागाकडून मागवली चालू विकास कामांची माहिती!

| लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्याचे उपायुक्त चेतना केरुरे यांचे आदेश

पुणे – Loksabha Election 2024 Code of Conduct – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Loksabha Election 2024 Code of Conduct) येत्या काही दिवसांत लागू शकते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणूक विभागाच्या (PMC Election Department) उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी  महापालिकेच्या सर्व विभागांना चालू विकास कामांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune PMC News)
लोकसभा निवडणुकीची देशभरात लगबग सुरु आहे. त्या निमित्ताने विकास कामे उरकून घेण्याबाबत लगीनघाई सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला पत्र पाठवत महापालिकेच्या चालू विकास कामांची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्याला अनुसरून महापालिका निवडणूक विभागाच्या  महापालिकेच्या सर्व विभागांना आदेशित केले आहे कि चालू विकास कामाची माहिती जिल्हा निवडणूक विभागाला तात्काळ सादर करावी. त्यानुसार विभागाकडून यावर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)