Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

 

     Congress Meeting | Pune | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची (AICC) हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्देशानुसार आज काँग्रेस भवन, पुणे (Pune Congress Bhavan) येथे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस प्रातांध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले (Nana Patole) , माजी केंद्रीय मंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्‍हाण, प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील मुरूमकर, मा. आ. प्रणितीताई शिंदे, मा. आ. डॉ. विश्वजीत कदम, मा. आ. संग्राम थोपटे, प्रदेश महिला अध्यक्षा मा. संध्याताई सव्‍वालाखे आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरूवात ‘काँग्रेस पक्षाचा इतिहास’ व ‘भारत जोडा’ यात्रेच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करून करण्यात आली. या छायाचित्र प्रदर्शनाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केले होते आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचे संपूर्ण नियोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले होते. 

     प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान या बैठकीविषयी माहिती दिली. संपूर्ण राज्यात विभागीय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे. या बैठकांमधून काँग्रेस पक्ष संघटनात्मक मजबुतीने लोकांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे आणि सध्याच्या अत्याचारी सरकारचा खरा चेहरा लोकांपुढे आणणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय, महागाई, बेरोजगारी, गरीबांवरील अन्याय यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कथनी व करणीतील फरक जनतेच्या निर्देशनास आणणार आहे. राज्यातील हे सरकार शेतकरी, गरीब जनता, तरूण, बेरोजगार यांच्या विरोधातील आहे. हे सेल्फीश सरकार आहे. सुप्रिम कोर्टानेही सरकारचा खरा चेहरा उघडा केला आहे. काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ असूनही हे सरकार दुष्काळ जाहिर करत  नाही. 

    नांदेड व ठाणे येथील सरकारी रूग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहूणही सरकारला जाग येत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्राचा डोळामुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे.

     काँग्रेस जनतेसाठी लढत आहे. शाहू – फुले – आंबेडकर विचारांना वाचविण्याचे काम तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनीही एकजूटीने काम करावे. या बैठकीमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, सांगली शहर, सांगली ग्रामीण, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर आदी जिल्हांचा आढावा घेऊन बुथ कमिट्या, ब्लॉक कार्यकारिणी व संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. 

     यावेळी जिल्ह्याचे प्रभारी/सहप्रभारी, प्रदेश पदाधिकारी, आजी माजी आमदार, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना, विभाग व सेल अध्यक्ष, बुथ कमिटी सदस्य आदी उपस्थित होते. 

Sunil Shinde | Nana Patole | सुनील शिंदे यांचा नाना पटोले यांच्याकडून सन्मान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Sunil Shinde | Nana Patole | सुनील शिंदे यांचा नाना पटोले यांच्याकडून सन्मान

Sunil Shinde | Nana Patole |  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (INC Maharashtra) तर्फे कार्यरत असलेल्या सेल मधील सर्व जिल्हाध्यक्ष यांची एक दिवशीय कार्यशाळा ठाणे येथील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले (Nana Patole) हे उपस्थित होते. (Sunil Shinde | Nana Patole)

यावेळी दीप प्रज्वलित करण्याचा  मान त्यांनी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे (Labour Leader Sunil Shinde) यांना दिला. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
——
News Title | Sunil Shinde | Nana Patole | Sunil Shinde honored by Nana Patole

Nana Patole | २०१९ च्या लोकसभा निवडणुकिसाठी पूर्वनियोजित असलेला पुलवामा हल्ला | नाना पटोले

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

२०१९ च्या लोकसभा निवडणुकिसाठी पूर्वनियोजित असलेला पुलवामा हल्ला | नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याच्या प्रसंगी दाखविलेली निष्काळजीपणाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ” शर्म करो मोदी शर्म करो” हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आले.

यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की काश्मीरचे माजी राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी पुलवामा येथील जवानांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात जे सत्य देशातील नागरिकांसमोर मांडले यावरून सिद्ध होते की केंद्रातील मोदी सरकार हे शहीदांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात ह्या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले परंतु मोदी सरकारने ३०० किलो RDX कोठून आणले. त्याच पद्धतीने जवानांना विमानाची सुरक्षितता का देण्यात आली नाही याबाबत चौकशी सुध्दा केंद्रीय सरकारने केली ‌नाही कोणत्याही प्रकारचा गुन्हाही दाखल केला नाही. यावरून सिद्ध होते की पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित होता व त्याचा २०१९च्या लोकसभा निवडणुकिसाठी वापर करण्यात आला. गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २०हजार कोटी कुणी गुंतवले आणि हा काळा पैसा कोणाचा आहे याचे उत्तर देखील देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी द्यायला पाहिजे कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात JPC ची मागणी कॉंग्रेससहीत देशातील सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली आहे पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात राज्यभर ” शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलने घेण्यात आली असून याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, ऍड अभय छाजेड, संजय बालगुडे,आबा बागुल,चंदूशेठ कदम,कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, मेहबूब नदाफ, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख ,अजित दरेकर, सुजाता शेट्टी, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सुनिल धाडगे, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी विजय खळदकर, सतिश पवार, अजित जाधव, रमेश सकट,रवी ननावरे, सोमेश्वर बालगुडे, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे,शिलार रतनगिरी,द स् पोळेकर, प्रशांत सुरसे, शिवराज भोकरे, प्रकाश पवार, सुधीर काळे,चेतन आगरवाल, सुरेश कांबळे,मामा परदेशी, दिपक ओव्हाळ, सुरेश चौधरी, श्रीरंग चव्हाण, वैष्णवी किराड, ज्योती परदेशी,छाया जाधव, सुंदर ओव्हाळ, इंद्रजित भालेराव, कृष्णा सोनकांबळे,लतेंद्र भिंगारे इत्यादी उपस्थित होते

Chitrashrusthi | काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

Categories
Breaking News cultural Political पुणे

काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं. परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं. यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. अप्रचार करत आहे. या अप्रचाराला रोखण्यासाठी अशा प्रकारे चित्रसृष्टीचे निर्माण करणे आवश्यक आहे. हे काम आमचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अशा शब्दात अविनाश बागवे यांचे कौतुक केले.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरु मार्ग, भवानी पेठ या ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारीत चित्रसृष्टी काँग्रेस पक्षाचे मा. नगरसेवक अविनाश रमेशदादा बागवे यांच्या वतीने निर्माण करण्यात आली. या चित्र सृष्टीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते झाले.

या कार्यक्रमाला त्यांच्या समवेत राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी तसेच शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भोर मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे, पुरंदर मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, सौ सुरेखाताई खंडाळे, विठ्ठलजी थोरात व अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पार पडला.

यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. अप्रचार करत आहे. या अप्रचाराला रोखण्यासाठी अशा प्रकारे चित्रसृष्टीचे निर्माण करणे आवश्यक आहे. हे काम आमचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात व सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Congress | Nana Patole | भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही | नाना पटोले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही | नाना पटोले

          काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. असा आरोप   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांनी  केला.   

      भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ‘‘आझादी गौरव पदयात्रा’’ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅपिटल थिएटर, कॅम्प ते लोकमान्य टिळक, मंडई पर्यंत काढण्यात आली.

       मंडई येथे सभेमध्ये बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की, ‘‘ज्या विचारांनी तिरंगा झेंड्याचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, इंग्रजांबरोबर छुपी युती केली ते आज हर घर तिरंगा अभियान राबवित आहेत. हिंदू महासभा व मुस्लिमलीगने एकत्र येऊन त्याकाळी इंग्रजांच्या विरोधात लढायचे सोडून सरकार स्थापन केले. देशाच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या विचारसरणीचे केंद्र सरकार आज घरावर तिरंगा लावावा म्हणून सांगत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. भाजपाला तिरंग्याचे महत्व माहित नसावे. तिरंगा देशाची शान आहे, करोडो भारतीयांची प्रेरणा आहे पण भाजपाने त्याचा बाजार मांडला आहे. आमचे त्यांना एकच सांगणे आहे की तुम्ही तिरंग्याचा अवमान करू नका.’’

 

       या पदयात्रेचे चौका चौकात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक मंडळे, स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

       यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्‍यवहारे, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आबा बागुल, अजित दरेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, बाळासाहेब मारणे, दिप्ती चवधरी, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मंजूर शेख, अनिल सोंडकर, रवि मोहिते, रमेश अय्यर, साहिल केदारी, सचिन आडेकर, प्रविण करपे, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, सुनील घाडगे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, शोएब इनामदार, विजय खळदकर, रमेश सकट, नरेंद्र व्‍यवहारे, बाळासाहेब अमराळे, अमीर शेख, राहुल शिरसाट, भुषन रानभरे, भरत सुराणा, नितीन परतानी, अक्षय माने, शिवराज भोकरे, दादु अधिकारी, सुरेश कांबळे, नरेश नलावडे, जुबेर खान, द. स. पोळेकर, यासीन शेख, प्रकाश पवार, विनोद रणपिसे, निलेश बोराडे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, विश्वास दिघे, कान्होजी जेधे, सुनील पंडित, दत्ता पोळ, परवेज तांबोळी, ॲड. अनिल कांकरिया, सचिन सावंत, राधिका मखामले, अविनाश गोतारणे, रजिया बल्लारी, ज्योती परदेशी, सीमा महाडिक, अनुसाया गायवाड आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले तर आभार बाळासाहेब मारणे यांनी मानले.

Nana patole Vs PM Modi | कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!” |  नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!”

 नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

करोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांनंतर यावर्षी पंढरीच्या वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (२० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मंगळवारी (२१ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारकऱ्यांच्या पोशाखातील मोठा बॅनर लावण्यात आला.

या बॅनरवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. खरंतर, भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज असं कुणीही दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून नाना पटोले यांनी ‘कभी कभी लगता है, अपुन ही भगवान है’ म्हणत मोंदीवर निशाणा साधला आहे.

त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. त्यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत. कभी कभी लगता है अपुन हि भगवान है !” त्यांचं हे ट्वीट आता वेगानं व्हायरल होत आहे.

Arvind Shinde | pune congres | पुणे शहर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदी अरविंद शिंदे!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे शहर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी अरविंद शिंदे

पुणे : काँग्रेसच्या नियमावलीनुसार रमेश बागवे यांनी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते. मात्र आता प्रभारी अध्यक्ष पदी अरविंद शिंदे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.

कॉंग्रेस हायकमांड च्या निर्णयानुसार ५ वर्ष पूर्ण झालेल्या  पदाधिकाऱ्याना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसात यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात शहर अध्यक्ष पदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागून राहिले होते.

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवले आहेत. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झाले होते.

पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

बागवे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत अरविंद शिंदे यांना प्रभारी अध्यक्ष पद दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अध्यक्षांची निवड होईल. ऑगस्ट महिन्यात पूर्ण वेळ नवीन अध्यक्ष मिळेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान 2003-04 साली देखील अशीच वेळ आली होती. संगीता देवकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निवडणुकीत अभय छाजेड यांनी बाजी मारली होती.

Nana Patole | महापालिका निवडणुकीत काँग्रेस चा राहणार ‘हा’ फॉर्म्युला! | नाना पटोले यांनी दिले संकेत

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत काँग्रेस चा राहणार ‘हा’ फॉर्म्युला! 

नाना पटोले यांनी दिले संकेत 

काँग्रेसचे उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबीर (Congress Chintan Shivir) पार पडले. यामध्ये ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. हाच नियम आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये (Maharashtra local Bodies Election) लागू करण्यात येईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.

काँग्रेससकडून देशात जनजागरण मोहीम केली जाणार आहे. त्याद्वारे काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या निवडणुकांमध्ये तरुणांना ५० टक्के जागा देण्यात येणार आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू करणार आहोत. स्वातंत्र्यांनंतरचे ५० वर्ष काँग्रेसने देशाला महासत्ता बनविण्याचं काम केलं आहे. पण, मोदी सरकारने ८ वर्षात देशाला मागे आणले आहे. देश श्रीलंकेच्या वाटेवर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. संविधान सुरक्षित राहिलेलं नाही. याबाबत गेल्या ३ दिवसांच्या चिंतना शिबारात चर्चा केली, असं नाना पटोले म्हणाले.

 ”भाजपने सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण केलंय”

 -काँग्रेस हा एक विचार आहे. आम्ही सत्तेसाठी नको ते काम करत नाही. त्यामुळे आम्ही मोठे झालो आहोत. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो, तसा गैरवापर काँग्रेस करणार नाही. आम्ही विचाराने लढाई जिंकतो. देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांसोबत बोलायला तयार नाही. महागाई वाढत चालली आहे. भाजपच्या काळात नोकऱ्या गेल्या आहेत. भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. माझ्या हिंदू धर्माचं राजकीयकरण करणं बरोबर नाही. माझा धर्म हे शिकवत नाही. भाजप सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण करत आहे, असा आरोप देखील पटोलेंनी केला.

अजित पवारांना प्रत्युत्तर –

नाना पटोले भाजपमधून आले आहेत. त्यामुळे आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका भाजपने करावी का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यालाच आता पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ”नाना पटोलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी सत्तेसाठी लढणारा कार्यकर्ता नाही. माझ्या पार्श्वभूमीची चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे”, असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी अजित पवारांना दिलं आहे.

सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षांची निवड –

पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी आमची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.

Congress Digital Member Registration : कॉंग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ३० तारखेला पुण्यात घेणार आढावा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कॉंग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद

: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ३० तारखेला पुण्यात घेणार आढावा

पुणे : समाजाच्या सर्व थरातून कॉंग्रेस पक्षाच्या डिजीटल सभासद नोंदणीला प्रतिसाद मिळू लागल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढला आहे, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा लोकसंपर्क वाढावा, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना सांगावीत अशा उद्देशाने पक्षाच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांनी डिजिटल सभासद नोंदणीची मोहीम राबविण्याचा आदेश दिला. त्यानुसार देशभरात सभासद नोंदणी मोहीमदि. ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. पुणे शहरातही सर्व पेठा आणि उपनगरांमध्ये पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दि. ३० मार्च रोजी पुणे शहराला भेट देणार असून सभासद नोंदणीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

महागाई, पेट्रोल -डिझेल दरात वाढ, बेरोजगारी या कारणाने केंद्रातील मोदी सरकारविषयी जनतेत रोष आहे किंबहुना मोदी सरकारबद्दल नैराश्याची भावना आहे, असे सभासद नोंदणीच्यावेळी लोकांशी संपर्क साधताना आढळले आणि लोकांना काँग्रेस हाच योग्य पर्याय वाटत आहे. त्यामुळे तरुणवर्ग, गरीबवर्ग काँग्रेसचा सभासद होत आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

Anjaney Sathe : MNS : Congress : मनसेला खिंडार : मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अंजनेय साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे टिळक भवनात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या युवा नेत्याचे स्वागत नाना पटोले यांनी पुष्पगुच्छ आणि काँग्रेसचे तिरंगी उपरणे देऊन केले. याप्रसंगी विधिमंडळ पक्षेनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहप्रभारी सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.

समाजकारण, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणारे अंजनेय साठे यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधिलकी मानली. त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

अंजनेय साठे यांचे वडील डॉ. सुनील साठे आणि आई डॉ. अर्चना साठे हे दोघेही सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. अंजनेय साठे यांचे पणजोबा स्वर्गीय विनायकराव साठे हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सात वर्षे तुरुंगवास भोगला होता. कै.विनायकराव साठे यांनी तत्कालीन सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद भूषविले होते.