Congress | Nana Patole | भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही | नाना पटोले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही | नाना पटोले

          काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. असा आरोप   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांनी  केला.   

      भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ‘‘आझादी गौरव पदयात्रा’’ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅपिटल थिएटर, कॅम्प ते लोकमान्य टिळक, मंडई पर्यंत काढण्यात आली.

       मंडई येथे सभेमध्ये बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की, ‘‘ज्या विचारांनी तिरंगा झेंड्याचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, इंग्रजांबरोबर छुपी युती केली ते आज हर घर तिरंगा अभियान राबवित आहेत. हिंदू महासभा व मुस्लिमलीगने एकत्र येऊन त्याकाळी इंग्रजांच्या विरोधात लढायचे सोडून सरकार स्थापन केले. देशाच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या विचारसरणीचे केंद्र सरकार आज घरावर तिरंगा लावावा म्हणून सांगत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. भाजपाला तिरंग्याचे महत्व माहित नसावे. तिरंगा देशाची शान आहे, करोडो भारतीयांची प्रेरणा आहे पण भाजपाने त्याचा बाजार मांडला आहे. आमचे त्यांना एकच सांगणे आहे की तुम्ही तिरंग्याचा अवमान करू नका.’’

 

       या पदयात्रेचे चौका चौकात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक मंडळे, स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

       यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्‍यवहारे, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आबा बागुल, अजित दरेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, बाळासाहेब मारणे, दिप्ती चवधरी, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मंजूर शेख, अनिल सोंडकर, रवि मोहिते, रमेश अय्यर, साहिल केदारी, सचिन आडेकर, प्रविण करपे, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, सुनील घाडगे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, शोएब इनामदार, विजय खळदकर, रमेश सकट, नरेंद्र व्‍यवहारे, बाळासाहेब अमराळे, अमीर शेख, राहुल शिरसाट, भुषन रानभरे, भरत सुराणा, नितीन परतानी, अक्षय माने, शिवराज भोकरे, दादु अधिकारी, सुरेश कांबळे, नरेश नलावडे, जुबेर खान, द. स. पोळेकर, यासीन शेख, प्रकाश पवार, विनोद रणपिसे, निलेश बोराडे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, विश्वास दिघे, कान्होजी जेधे, सुनील पंडित, दत्ता पोळ, परवेज तांबोळी, ॲड. अनिल कांकरिया, सचिन सावंत, राधिका मखामले, अविनाश गोतारणे, रजिया बल्लारी, ज्योती परदेशी, सीमा महाडिक, अनुसाया गायवाड आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले तर आभार बाळासाहेब मारणे यांनी मानले.