Chitrashrusthi | काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

Categories
Breaking News cultural Political पुणे

काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं. परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं. यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. अप्रचार करत आहे. या अप्रचाराला रोखण्यासाठी अशा प्रकारे चित्रसृष्टीचे निर्माण करणे आवश्यक आहे. हे काम आमचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अशा शब्दात अविनाश बागवे यांचे कौतुक केले.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरु मार्ग, भवानी पेठ या ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारीत चित्रसृष्टी काँग्रेस पक्षाचे मा. नगरसेवक अविनाश रमेशदादा बागवे यांच्या वतीने निर्माण करण्यात आली. या चित्र सृष्टीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते झाले.

या कार्यक्रमाला त्यांच्या समवेत राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी तसेच शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भोर मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे, पुरंदर मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, सौ सुरेखाताई खंडाळे, विठ्ठलजी थोरात व अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पार पडला.

यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. अप्रचार करत आहे. या अप्रचाराला रोखण्यासाठी अशा प्रकारे चित्रसृष्टीचे निर्माण करणे आवश्यक आहे. हे काम आमचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात व सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Health Camp | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मातंग एकता आंदोलनच्या वतीने आरोग्य शिबिर 

Categories
Breaking News cultural Political आरोग्य पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मातंग एकता आंदोलनच्या वतीने आरोग्य शिबिर

मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार  रोजी राजेवाडी शाखा, नाना पेठ पुणे या ठिकाणी सकाळी १० ते २ वा. वाजेपर्यंत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये अनेक स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला.

याप्रसंगी मा. गृहराज्य मंत्री व अध्यक्ष रमेशदादा बागवे, स्थानिक मा. नगरसेवक  अविनाश बागवे, अरविंद शिंदे, नगरसेविका लताताई राजगुरू, नगरसेवक वनराज आंदेकर, मा. नगरसेवक प्रदीप गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, चेतन मोरे, जावेद खान,  मेहबूब नदाफ या कार्यक्रमात उपस्थित होते.
तसेच यावेळी विठ्ठल थोरात  अरुण गायकवाड, यासेर भाऊ बागवे, डॉ. वैष्णवी ताई किराड, विशाल भाऊ शेवाळे, सुरेश अवचिते, व शाखेचे अध्यक्ष अरबाज शेख, रोहित अवचिते, दयानंद अडागळे, सुनील बावकर, अरबाज खान, रोहित साबळे, श्रीकांत अडागळे, गणेश ससाणे, सोहेल अन्सारी, संदीप अवचिते, कृष्णा लंबीयार, सागर पवार, सुनील वाघमारे, सागर आडेप असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Marathi Din | 1 ऑगस्ट मराठी दिन साजरा करावा म्हणून  सरकार सोबत भांडत आहोत |  श्रीमंत कोकाटे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

1 ऑगस्ट मराठी दिन साजरा करावा म्हणून  सरकार सोबत भांडत आहोत |  श्रीमंत कोकाटे

अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान पाहता, 1 ऑगस्ट हा मराठी दिन म्हणून साजरा करावा, त्यासाठी आम्ही राज्य सरकार कडे अनेक वर्ष भांडत आहोत, असे डॉ श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.

मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त रविवार २ रोजी स्व. ठाकरे कलादालन, सारसबाग, पुणे या ठिकाणी  श्रीमंत कोकाटे साहेब यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थाचा ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन चांगले गुण मिळविले त्यांचा संस्थापक अध्यक्ष व मा. गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे यांनी सत्कार केला. तसेच अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी समाज कार्य केले पाहिजे व जीवनात कितीही कठीण प्रतिकूल परिस्थिती असली तरीही संघर्ष करून पुढे जाण्याचे सामर्थ्य अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून घ्यावे असे आवाहन रमेशदादा बागवे यांनी सर्व विद्यार्थांना केले.

आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक म्हणजे अण्णा भाऊ साठे. असे मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना सात समुद्र पार कोणी नेले असेल तर अण्णा भाऊ नी. रशिया च्या स्टालिनगार्ड मध्ये शिवाजी महाराजांचा शौर्य सादर करणारा पौवाडा गायला व त्याची महानता तिथे सांगितली हा इतिहास आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माजी नगरसेवक अविनाश बागवे होते. या कार्यकमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्र संचालन अरुण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी मातंग समाज चे ज्येष्ठ नेते यादवराव सोनावणे, डॉ सुहास नाईक, विठ्ठल गायकवाड, महिला आघडीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ताई अडसूळ, सौ सुरेखा खंडाळे , संजय साठे , दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसैन शेख, रोहित अवचीते, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Prabhag NO 19 | श्री संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे लोकार्पण 

Categories
Breaking News cultural Political पुणे

श्री संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे लोकार्पण

प्रभाग क्र १९ काशेवाडी – लोहियानगर भागातील सेव्हन लाॅज चौक शंकर शेठ रोड पुणे,या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आले आहे यांचा लोकार्पण  सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे, पुणे म.न.पा चे माजी गटनेते आबा बागुल,शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे, स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे, श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे चे अध्यक्ष सतीश उबाळे, वाघोली चे सरपंच उबाळे, तेली समाजाचे प्रतिष्ठित सर्व प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उल्हासदादा पवार यांनी आपल्या भाषणात येणा-या पिढीला जगनाडे महाराजाच्या कामाची माहिती, सर्व वारकरी संप्रदाय तसेच भागवत समाजाची माहिती देणारे व समाजसेवेची प्रेरणा देणारे , दिशादर्शक हे उद्यान ठरणार आहे.. असे मत त्यांनी व्यक्त केले.
रमेशदादा बागवे यांनी पुर्वीच्या काळात देखील जगनाडे महाराज व तुकाराम महाराज यांच्या वर करमठ वादयान कडून अन्याय होत होता. तसेच अताचे काही लोक प्रयत्न करतायत ते सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून ते हाणून पाडला पाहिजे असे मत मांडले.
महाराष्ट्रात कुठेच जगनाडे महाराज यांचे नाव असलेले सार्वजनिक उद्यान, समाजमंदिर, वास्तू किंव्हा चौक, नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून तेली समाजाच्या मागणीनुसार हे उद्यान साकारण्यात आले आहे..या उद्यानात महाराष्ट्रातील सर्व संतांची माहिती, त्यांचे अभंग, भागवत समाज व वारकरी संप्रदाय ची परंपरा. तथा इतिहासाची माहिती दर्शविणारे चित्र येथे आहे असे स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांनी सांगितले.

प्रास्ताविक सुदुंबरे संस्थांचे उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी केले तर आभार क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान चे विठ्ठल थोरात यांनी केले.

Avinash Bagwe : संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे भूमिपूजन संपन्न  : नगरसेवक अविनाश बागवे यांची संकल्पना 

Categories
cultural PMC Political पुणे

संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे भूमिपूजन संपन्न

: नगरसेवक अविनाश बागवे यांची संकल्पना

पुणे : संत तुकाराम महाराजांन सोबत ज्यांनी टाळकरी म्हणून काम केलं , तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लिहण्याचे काम केले व पुढे लोकांसमोर आणून त्यातुन समाज प्रबोधनाचे महान कार्य केले ते थोर ” संत संताजी महाराज जगनाडे ” यांचे कार्य लोकांपुढे येण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होईल. असे मत  उल्हासदादा पवार यांही व्यक्त केले.

प्रभाग क्र .19 पुणे महानगर पालिका हद्दीतील सेव्हन लवज चौक जवळील उड्डाण पूला चे खालील मोकळ्या जागेत , पुणे म.न. पा. चे वतीने मा. अविनाश रमेशदादा बागवे , नगरसेवक यांच्या निधीतून विकसित होत असलेल्या ” संत संताजी महाराज जगनाडे उद्यान ” भूमिपूजन समारंभात ते बोलत होते .

दिनांक १६/२/२०२२ रोजी मा. उल्हास दादा पवार ( उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार) यांचे शुभ हस्ते आणि मा. रमेश दादा बागवे ( माजी गृह राज्य मंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी ) , मा. आबा बागुल , (नगरसेवक व पुणे म.न.पा. गटनेते काँग्रेस पक्ष), मा. विशाल धनवडे, नगरसेवक यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
रमेशदादा बागवे आपल्या भाषणात म्हणाले कि, या उद्यानाच्या माध्यमातून तिळवण तेली समाजाची पश्चिम महाराष्ट्रातील मोठया प्रमाणात अनेक वर्षा पासून होत असलेली मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे यासाठी पुणे मनपा व सर्व पदाधिकारी, नगरसेवक ज्यांनहीं यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे अभिनंदन . या प्रसंगी मा.शिवदास उबाळे ( अध्यक्ष, सुदुंबरे संस्थान) , मा. घनश्याम वाळुंजकर ( अध्यक्ष, पुणे तेली समाज) , मा. शिवराज शेलार ( अध्यक्ष, पिंपरी चिंचवड तेली समाज), मा. विजय रत्नपारखी ( कार्याध्यक्ष , सुदुंबरे संस्थान), Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस , सुदुंबरे संस्थान), नामांकित आर्किटेक्ट अभिजित पन्हाळे , दत्तात्रय शेलार ( खजिनदार, सुदुंबरे संस्थान), संजय जगनाडे ( उपाध्यक्ष ,पिंपरी चिंचवड तेली समाज), जनार्दन जगनाडे ( माजी अध्यक्ष सुदुंबरे संस्थान) तसेच Adv. आनंद धोत्रे, प्रदीप उबाळे इत्यादी मान्यवर व तिळवण तेली समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियोजित उद्यानास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याबाबत पुणे महानगर पालिका यांचेकडे  विजयकुमार शिंदे ( उपाध्यक्ष सुदुंबरे संस्थान व माजी अध्यक्ष पुणे तिळवण तेली समाज) यांनी प्रस्ताव सादर केला असून गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला असून त्याकामी, Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस सुदुंबरे संस्थान) यांचेही त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभले. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी मा. विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, रोहित अवचित, सौ. सुरेखा खंडागळे व यासेरजी बागवे यांही विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बागवे , नगरसेवक यांनी केले.
या प्रसंगी उल्हास दादा पवार, रमेश दादा बागवे आणि आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोज यांनी केले.

PMC : लहुजी वस्ताद फिटनेस क्लब होणार सील : मुख्य सभेत निर्णय 

Categories
PMC पुणे

लहुजी वस्ताद फिटनेस क्लब होणार सील 

 

: मुख्य सभेत निर्णय 

पुणे : भवानी पेठेतील लहुजी वस्ताद फिटनेस क्लब करारनामा नसल्याने खासगी संस्थेच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत भाजपने ४७ विरुद्ध १८ असा बहुमताच्या जोरावर मध्यरात्री साडे बारा वाजता मंजूर केला. राजकीय संघर्ष टोकाला जावू नये यासाठी हा विषय समंजसपणे सोडवावा अशी भाषणे नगरसेवकांनी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

: भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिला होता प्रस्ताव 

 
यावेळी काशेवाडी प्रभाग क्रमांक १९ मधील जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे लहुजी वस्ताद फिटनेस क्लब आहे. हा क्लब काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या संस्थेकडे आहे. पण यात अनियमिता आहे असल्याने हा क्लब सील करून महापालिकेने तो ताब्यात घ्यावा असा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिला आहे. त्यावरून पाटील आणि बागवे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. हा विषय मंजुर होत नसल्याने पाटील यांनी महिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने हा प्रस्ताव तुम्ही बहुमताने मंजूर करा असे मोबाईल संभाषणात सांगितले, त्यावरून काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली.या सर्व पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. पाटील व बागवे यांनी एवढी टोकाची भूमिका घेऊन नये असे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी समजून सांगितला. बागवे आणि पाटील यांनी एकमेकांवर आरोप करत गैरप्रकार सभागृहापुढे मांडत आपापली भूमिका कशी योग्य आहेअखेर यावर झालेल्या मतदानात प्रस्तावाच्या बाजूने ४७ व विरोधात १८ मते पडली. महा विकास आघाडीने विरोधात मतदान केले. तर भाजपचा मित्र पक्ष रिपाइंमध्ये फूट पडली. उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले तर सिद्धार्थ धेंडे यांनी तटस्थ भूमिका घेतली.