Health Camp | पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News social आरोग्य पुणे

Health Camp | पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Health Camp | मनःशांती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने पिंपळे गुरव येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सातशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये सर्जरी, मेडीसिन, बालरोग, अस्थिरोग, स्री रोग, आयुर्वेद व पंचकर्म या संदर्भातील विविध आजार, व्याधी याबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. एक्स रे, रक्त लघवी, सोनोग्राफी, कलोनोग्राफी, गॅस्ट्रॉसकॉपी, इसीजी, सिटी स्कॅन आदी तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार, आयोजक प्रा. विष्णू शेळके, सह्याद्री ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. बी. घोडे, उपनिबंधक सुदाम चपटे, नुमवी पर्यवेक्षक देवराम चपटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धावजी साबळे आदी उपस्थित होते.

The karbhari - Arun Pawar
शिबिरात डॉ. धीरज जंगले, डॉ. विराग  कुलकर्णी, डॉ. शुभांगी करंजे, डॉ. मंजिरी जोशी, डॉ. केतन जंगले या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या व मार्गदर्शन केले.
शिबिराच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विष्णू शेळके व महिला सरचिटणीस सुनिता कोळप यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुशिला डिसुझा, रुपाली लांडे, सिद्धी शेळके, प्रज्ज्वल कांबळे, श्रेया वरे, अंकिता दाते, वैष्णवी कराळे यांनी सहकार्य केले.

Mahaarogya camp | पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Mahaarogya camp | पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

| वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे गरजू रुग्णांवर उपचार होणार

Mahaarogya camp |जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार (Free Health Facility) करण्यासाठी आणि त्यांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेनुसार आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मैदानावर ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे (Mahaarogya Camp)आयोजन करण्यात येणार आहे. (Mahaarogya camp)

जिल्हाधिकारी कार्यालयात महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिराचे समन्वयक रामेश्वर नाईक, मनपा उपायुक्त महेश पाटील, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदी उपस्थित होते.

श्रीमती कदम म्हणाल्या, रुग्णसेवेसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याची सुविधा करण्यात यावी. लोकसहभागातून शिबिराचे आयोजन होत असल्याने सर्व यंत्रणांनी आयोजनात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. नाईक यांनी महाआरोग्य शिबिराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात निदान झालेल्या गंभीर आजारावर जागतिक किर्तीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात औषधाची गरज असणाऱ्यांना ती मोफत देण्यात येतील. गरजू रुग्णांना वैद्यकीय साधने आणि सुविधा देण्यात येतील आणि आवश्यक असल्यास विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध संस्थांशी सहकार्याबाबत चर्चा केली आहे. या सर्वांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. हे सेवाकार्य असल्याने सर्व विभागांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

महाआरोग्य शिबिरासाठी २२ जुलै पासून आत्तापर्यंत सुमारे ५८ हजार नागरिकांची पूर्व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात रक्त, लघवी तपासणी व एक्सरे आदी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शिबिराचे उदघाटन करण्यात येणार आहे.

महाआरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश असणार आहे. डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच. संचेती, डॉ.विकास महात्मे, डॉ.यशराज पाटील, डॉ.ललवाणी, डॉ.चंदनवाले, डॉ.तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया असे तज्ज्ञ डॉक्टर्स शिबिरास उपस्थित राहणार आहेत.

शिबिरात एकूण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश असणार आहे. बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान, नाक, घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुवंशिक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृद्धांची सामान्य तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुने संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी करण्यात येईल.

गरजू रुग्णांना कृत्रिम अवयव, चष्मे, वृद्ध काठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळ्या यांचे नोंदणीनुसार वाटप करण्यात येईल. सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नास्ता व भोजनाची सोय करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


News Title | Mahaarogya camp organized in Pune on August 6 | The needy patients will be treated by expert doctors in the medical field

Health Camp | ६ ऑगस्ट रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” | सोमेश्वर फॉऊंडेशन चा उपक्रम 

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

Health Camp | ६ ऑगस्ट रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” | सोमेश्वर फॉऊंडेशन चा उपक्रम

Health Camp | भारत देशाचे  पंतप्रधान, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची “स्वस्थ ग्राम – स्वस्थ भारत” या संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तसेच गिरीश महाजन यांचे “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील गरजु व गरीब रुग्णांसाठी केले जाणारे सेवाकार्यसुध्दा समाजासाठी अतिशय मोलाचे आहे.
या पार्श्वभुमीवर गिरीशजी महाजन (Girish Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पुणे मतदारसंघातील गरजु रुग्णांच्या सेवेसाठी कार्यसम्राट आमदार विनायकजी निम्हण (Vinayak Nimhan) यांच्या जयंतीनिमीत्त सोमेश्वर फॉऊंउेशन (Someshwar Foundation), पुणे यांनी ०६ ऑगस्ट रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” कृषी महाविद्यालय मैदान- भोसले नगर, शिवाजी नगर, पुणे येथे आयोजित केले आहे. अशी माहिती माजी नगरसेवका सनी निम्हण (Sunny Nimhan) यांनी पत्रकार परिषदेत दिली.  (Health Camp)

या शिबीराचा भाग म्हणुन रुग्णांसाठी दिनांक २२ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२३ पर्यंत रुग्ण पुर्व तपासणी अभियान शिवाजी नगर मतदार संघात (शिवाजीनगर पासून सोमेश्वरवाडी,सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, इतर) सदर अभियानात एकुण ५७९६३ रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली. व्दितीय रुग्ण तपासणी अभियानात आवश्यक रक्त, लघवी, ईसीजी, एक्स-रे इत्यादी प्रकारची तपासाणी मोफत करण्यात येत आहे.

शिबीराचे उदघाटन उपमुख्यमंत्री, नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते रविवार (ता.६). आॕगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता कृषी महाविद्यालयाचे मैदान, सिंचन नगर, भोसलेनगर, पुणे याठिकाणी कार्यसम्राट मोफत महा – आरोग्य शिबीराचे उदघाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.

 

 

शिबीराचे वैशिष्टे –

• विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध
• देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे डॉ.संचेती, डॉ.यशराज पाटील, डॉ.ललवाणी, डॉ.चंदनवाले, डॉ.तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया इत्यादी
• विविध आजारांवरील उपचार
एकुण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया
त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी

• गरजु रुग्णांना मोफत वितरण
कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार वाटप
• आपतकालीन व्यवस्थेमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका, रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन, रुग्ण स्ट्रेचर, व्हिलचेअर यांचा समावेश
• सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नास्ता व भोजनाची सोय.
करीता सर्व नागरीकांनी या बहुमुल्य संधीचा लाभ घ्यावा असे आयोजक सोमेश्वर फॉऊंउेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आवाहान केले आहे. रुग्णहिताय गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करावी.

PMC Pune | Health camp | पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

पुणे | पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून आयोजित कॅन्सर तपासणी शिबिरामध्ये पुणे महानगरपालिकेमधील महिला सेविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन १०० महिला सेविकांच्या General Examination, BSL(R), B.P तपासण्या व ५० महिला सेविकांच्या PAP Smear करण्यात आले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

पुणे महानगरपालिका वर्धापनदिना निमित्त पुणे महानगरपालिका व इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी, पुणे यांचे समन्वयाने दि. १४ रोजी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत कार्यरत महिला सेविकांसाठी कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन जुना जी.बी. हॉल मुख्य इमारत आरोग्य कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन श्री. रवींद्र बिनवडे मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमात डॉ. आशिष भारती आरोग्य प्रमुख, सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना, डॉ. वैशाली जाधव, डॉ.कल्पना बळीवंत, डॉ. संजीव वावरे, डॉ.नागमोडे, डॉ. सुर्यकांत देवकर, डॉ. प्रल्हाद पाटील वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी व सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना विभाग तसेच इंद्रायणी हॉस्पिटल ॲण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट यांचेमार्फत डॉ. शैलेश नाईक, डॉ. मंजिरी जोशी, अनिल पत्की, ज्योती काकडे हे उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये डॉ. मंजिरी जोशी यांनी कॅन्सर या आजाराबाबत उपस्थित ३०० महिलांना माहिती दिली तसेच स्तनाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सर विषयी आढळणारी लक्षणे, खुणा, त्याबाबत घ्यावयाची काळजी व उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर

| आरोग्य विभागाचा उपक्रम 

पुणे | महानगरपालिकेच्या मध्यवर्ती इमारत व एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सेविकांसाठी कॅन्सर तपासणी व त्याबाबत जनजागृती करणेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य कार्यालयकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार या  शिबिरामध्ये कॅन्सर आजाराबाबत जनजागृती १४/०२/२०२३ रोजी सकाळी १०:३० ते ११:०० या वेळेत जुना जी. बी, हॉल तिसरा मजला, मुख्य इमारत पुणे मनपा येथे व कॅन्सर तपासणी शिबीर सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वा. या वेळेमध्ये पशुवैद्यकीय विभागासमोर, आरोग्य कार्यालय या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी सदर शिबिरामध्ये उपस्थित राहणेबाबत सर्व खातेप्रमुखांनी आपले अधिनस्त असणाऱ्या महिला सेविकांना अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने सर्व खात्यांना केले आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात मनपा मुख्य इमारतीत कार्यरत महिलाना प्राधान्य देण्यात येणार आहे. असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Health Camp | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मातंग एकता आंदोलनच्या वतीने आरोग्य शिबिर 

Categories
Breaking News cultural Political आरोग्य पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मातंग एकता आंदोलनच्या वतीने आरोग्य शिबिर

मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार  रोजी राजेवाडी शाखा, नाना पेठ पुणे या ठिकाणी सकाळी १० ते २ वा. वाजेपर्यंत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये अनेक स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला.

याप्रसंगी मा. गृहराज्य मंत्री व अध्यक्ष रमेशदादा बागवे, स्थानिक मा. नगरसेवक  अविनाश बागवे, अरविंद शिंदे, नगरसेविका लताताई राजगुरू, नगरसेवक वनराज आंदेकर, मा. नगरसेवक प्रदीप गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, चेतन मोरे, जावेद खान,  मेहबूब नदाफ या कार्यक्रमात उपस्थित होते.
तसेच यावेळी विठ्ठल थोरात  अरुण गायकवाड, यासेर भाऊ बागवे, डॉ. वैष्णवी ताई किराड, विशाल भाऊ शेवाळे, सुरेश अवचिते, व शाखेचे अध्यक्ष अरबाज शेख, रोहित अवचिते, दयानंद अडागळे, सुनील बावकर, अरबाज खान, रोहित साबळे, श्रीकांत अडागळे, गणेश ससाणे, सोहेल अन्सारी, संदीप अवचिते, कृष्णा लंबीयार, सागर पवार, सुनील वाघमारे, सागर आडेप असे अनेक मान्यवर उपस्थित होते.