Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर

| आरोग्य विभागाचा उपक्रम 

पुणे | महानगरपालिकेच्या मध्यवर्ती इमारत व एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सेविकांसाठी कॅन्सर तपासणी व त्याबाबत जनजागृती करणेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य कार्यालयकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार या  शिबिरामध्ये कॅन्सर आजाराबाबत जनजागृती १४/०२/२०२३ रोजी सकाळी १०:३० ते ११:०० या वेळेत जुना जी. बी, हॉल तिसरा मजला, मुख्य इमारत पुणे मनपा येथे व कॅन्सर तपासणी शिबीर सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वा. या वेळेमध्ये पशुवैद्यकीय विभागासमोर, आरोग्य कार्यालय या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी सदर शिबिरामध्ये उपस्थित राहणेबाबत सर्व खातेप्रमुखांनी आपले अधिनस्त असणाऱ्या महिला सेविकांना अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने सर्व खात्यांना केले आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात मनपा मुख्य इमारतीत कार्यरत महिलाना प्राधान्य देण्यात येणार आहे. असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.