Balgandharva Rangmandir | पुण्याच्या सौंदर्यावर घाला घालू नये

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुण्याच्या सौंदर्यावर घाला घालू नये – रमेश बागवे

      पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. आज पुणे शहरात एकूण १४ नाट्यगृह असून शहरात फक्त ३ नाट्यगृहच सुरू आहेत. बालगंधर्व नाट्यगृह पुण्याचे वैभव आहे. या वास्तूला पाडून तेथे मल्टीफेल्क्स मॉल करण्याचा प्रशासनाचा डाव आहे. या वास्तूला पाडू नये याचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

     यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याची शान आहे. या रंगमंदिरात अनेक दिग्गज कलाकारांनी आपले नाट्य व कला सादर केली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये अनेक छायाचित्रप्रदर्शने, व्यंग चित्रकारांचे व्यंगचित्रे प्रदर्शित केली जात आहेत. या कलाकारांना पुणे महानगरपालिका अल्पदारात रंगमंदिर उपलब्ध करून देत होते. सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कलाकारांना यापुढे वाढीव दराने रंगमंदिर उपलब्ध होईल. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे ठेवला.  पुणेकरांशी चर्चा न करता किंवा भावना समजून न घेता एवढ्‍या घाईगडबडीत हा प्रस्ताव ठेवण्याचे काय कारण आहे हे आजपर्यंत पुणेकरांना समजले नाही. काँग्रेस पक्ष नेहमी कला संस्कृतीला प्राधान्य देत आहे. बालगंधर्वचे मल्टीफेल्क्स मॉल करून काही मोजक्या राज्यकर्ते व बिल्डरांना फायदा होऊन देणार नाही. पुण्याच्या सौंदर्यावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष विरोध केल्याशिवाय राहणार नाही.’’

     यानंतर माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जनता येत आहे. पुण्यनगरीतील अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू आहे. या वास्तूला पाडून त्याठिकाणी मल्टीफेल्क्स मॉल करण्यात आला तर बालगंधर्वचे वैभव संपुष्टात येईल. २०१७ च्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी भाजपावर विश्वास टाकून त्यांना मते दिली आणि ते सत्तेवर आले. सत्तेचा गैरवापर करून या बालगंधर्व रंगमंदिराचे मल्टीफेल्क्स मॉल करणे म्हणजे पुणेकरांशी विश्वासघात करणे. पुणेकरांची भावना दुखावणाऱ्या भाजप सरकारचा मी तीव्र निषेध करतो.’’

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, बाळासाहेब दाभेकर, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, रजनी त्रिभुवन, शेखर कपोते, शानी नैशाद, नुरुद्दीन सोमजी, राजेंद्र शिरसाट, विठ्ठल गायकवाड, सतिश पवार, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सचिन आडेकर, अजित जाधव, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, प्रशांत सरसे, मुन्नाभाई शेख, अकबर शेख, अविनाश अडसूळ, सोमेश्वर बालगुडे, ताई कसबे, नंदा ढावरे शोभना पण्णीकर, राजू गायकवाड, राजाभाऊ कदम, संतोष डोके, क्लेमेंट लाजरस, शारदा वीर, स्वाती शिंदे, मीरा शिंदे, सेल्वराज ॲन्थोनी आदी उपस्थित होते.

Pune Congress Vs Raosaheb Danve : केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पुणे काँग्रेसची  निदर्शने

Categories
Political पुणे महाराष्ट्र

केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पुणे काँग्रेसची  निदर्शने

पुणे:    केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची तिरूपती येथील नाभिक समाजाच्या कामाशी तुलना करून समाजाचा अपमान केल्याप्रकरणी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे स्टेशन येथे केंद्रीय रेल्व राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

      यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आम्ही महात्मा गांधींना आदर्श मानतो. त्यामुळे आमची प्रत्येक आंदोलन ही अहिंसक असतात आणि ती कायमच अहिंसक राहतील. परंतु रेल्वे पोलिसांना पुढें करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जरी आमचे आंदोलन दडपून टाकू पाहत असले तरीही आमचा आवाज मात्र ते दाबू शकत नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या डोक्यात सत्तेची आणि मंत्रिपदाची हवा गेली आहे त्यामुळे ते कधी शेतकऱ्यांचा अपमान करतात तर कधी बहुजन समाजातील बारा बलुतेदारांचा अपमान करतात. शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. ‘‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’’ अशी म्हण ज्या समाजातील मावळ्याने केलेल्या कार्यामुळे रूढ झाली. अशा समाजाबाबत त्यांच्या कामावरुन आक्षेपार्ह विधान करणे ही मनुवादी वृत्ती आहे. हे संघाचे संस्कार रावसाहेब दानवे आणि भाजपच्या प्रत्येकच नेत्यात नेहमी दिसतात. मग ते कधी शिवरायांचा अवमान करतील तर कधी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करतील. कधी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतील तर कधी नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करतील. या सर्व वृत्तीचा पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निषेध करतो.’’

     यानंतर माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अरविंद शिंदे, नाभिक समाजाचे सोमनाथ काशिद आदींची भाषणे झाली.

      यावेळी नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, दत्ता बहिरट, महिला अध्यक्षा पुजा आनंद, राजेंद्र शिरसाट, अरूण वाघमारे, शिलार रतनगिरी, प्रशांत सुरसे, सुनील दैठणकर, आबा जगताप, राजू शेख, वाल्मिक जगताप, राहुल तायडे, मीरा शिंदे, क्लेमेंट लाजरस, मुन्नाभाई शेख, बाबा नायडू, विशाल मलके, सचिन भोसले, बाबा सय्यद, बाळू कांबळे, शोभना पण्णीकर  यांच्या सोबत न्हावी समाजाचे अनेक लोक तसेच काँग्रेसचे सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Pune Congress : सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला पुणे शहर काँग्रेसचा पाठिंबा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला पुणे शहर काँग्रेसचा पाठिंबा

 

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अतिशय कठीण काळात पक्षाची धुरा सांभाळली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सुध्दा या राज्यात दौरा करून उमेदवारांसाठी प्रचार केला. निवडणुकीमध्ये मिळणाऱ्या यश व अपयशाच्या सामोरे जावेच लागते. पक्षाच्या सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक मताने सोनिया गांधींच्या पाठीशी ठाम पणे उभ्या आहेत. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी बैठकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास आहे व त्यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून रहावे असा ठराव मांडला.

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे ‘डिजीटल सभासद नोंदणी’’ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक विधानसभा निहाय सभासद नोंदणीचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. दि. ३१ मार्च पर्यंत जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात यावी अशी सूचना माजी आमदार रामहरी रूपनवार यांनी मांडली.

     या बैठकीत नुकत्याच ५ राज्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा अध्यक्षा . सोनिया गांधी यांनी अतिशय कठीण काळात पक्षाची धुरा सांभाळली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सुध्दा या राज्यात दौरा करून उमेदवारांसाठी प्रचार केला. निवडणुकीमध्ये मिळणाऱ्या यश व अपयशाच्या सामोरे जावेच लागते. पक्षाच्या सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक मताने सोनिया गांधींच्या पाठीशी ठाम पणे उभ्या आहेत. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी बैठकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास आहे व त्यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून रहावे असा ठराव मांडला. या ठरावाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, गटनेते आबा बागुल यांनी अनुमोदन दिले व उपस्थित सर्वांनी हात वर करून ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, नीता रजपूत, सोनाली मारणे, गोपाळ तिवारी, राजेंद्र शिरसाट, शानी नौशाद, रजनी त्रिभुवन, द. स. पोळेकर, रमेश सकट, सुनिल घाडगे, प्रदीप परदेशी, सचिन आडेकर, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, सुनिल मलके, राहुल शिरसाट, अनुसया गायकवाड, निलेश बारोडे, चैतन्य पुरंदरे, संदिप मोकाटे, मेहबुब नदाफ, चेतन आगरवाल, स्वाती शिंदे, शारदर वीर, सचिन भोसले, हेमंत राजभोज, अक्षय नवगिरे, रमेश राऊत, देवीदास लोणकर,  आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Avinash Bagwe : संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे भूमिपूजन संपन्न  : नगरसेवक अविनाश बागवे यांची संकल्पना 

Categories
cultural PMC Political पुणे

संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे भूमिपूजन संपन्न

: नगरसेवक अविनाश बागवे यांची संकल्पना

पुणे : संत तुकाराम महाराजांन सोबत ज्यांनी टाळकरी म्हणून काम केलं , तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लिहण्याचे काम केले व पुढे लोकांसमोर आणून त्यातुन समाज प्रबोधनाचे महान कार्य केले ते थोर ” संत संताजी महाराज जगनाडे ” यांचे कार्य लोकांपुढे येण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होईल. असे मत  उल्हासदादा पवार यांही व्यक्त केले.

प्रभाग क्र .19 पुणे महानगर पालिका हद्दीतील सेव्हन लवज चौक जवळील उड्डाण पूला चे खालील मोकळ्या जागेत , पुणे म.न. पा. चे वतीने मा. अविनाश रमेशदादा बागवे , नगरसेवक यांच्या निधीतून विकसित होत असलेल्या ” संत संताजी महाराज जगनाडे उद्यान ” भूमिपूजन समारंभात ते बोलत होते .

दिनांक १६/२/२०२२ रोजी मा. उल्हास दादा पवार ( उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार) यांचे शुभ हस्ते आणि मा. रमेश दादा बागवे ( माजी गृह राज्य मंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी ) , मा. आबा बागुल , (नगरसेवक व पुणे म.न.पा. गटनेते काँग्रेस पक्ष), मा. विशाल धनवडे, नगरसेवक यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
रमेशदादा बागवे आपल्या भाषणात म्हणाले कि, या उद्यानाच्या माध्यमातून तिळवण तेली समाजाची पश्चिम महाराष्ट्रातील मोठया प्रमाणात अनेक वर्षा पासून होत असलेली मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे यासाठी पुणे मनपा व सर्व पदाधिकारी, नगरसेवक ज्यांनहीं यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे अभिनंदन . या प्रसंगी मा.शिवदास उबाळे ( अध्यक्ष, सुदुंबरे संस्थान) , मा. घनश्याम वाळुंजकर ( अध्यक्ष, पुणे तेली समाज) , मा. शिवराज शेलार ( अध्यक्ष, पिंपरी चिंचवड तेली समाज), मा. विजय रत्नपारखी ( कार्याध्यक्ष , सुदुंबरे संस्थान), Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस , सुदुंबरे संस्थान), नामांकित आर्किटेक्ट अभिजित पन्हाळे , दत्तात्रय शेलार ( खजिनदार, सुदुंबरे संस्थान), संजय जगनाडे ( उपाध्यक्ष ,पिंपरी चिंचवड तेली समाज), जनार्दन जगनाडे ( माजी अध्यक्ष सुदुंबरे संस्थान) तसेच Adv. आनंद धोत्रे, प्रदीप उबाळे इत्यादी मान्यवर व तिळवण तेली समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियोजित उद्यानास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याबाबत पुणे महानगर पालिका यांचेकडे  विजयकुमार शिंदे ( उपाध्यक्ष सुदुंबरे संस्थान व माजी अध्यक्ष पुणे तिळवण तेली समाज) यांनी प्रस्ताव सादर केला असून गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला असून त्याकामी, Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस सुदुंबरे संस्थान) यांचेही त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभले. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी मा. विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, रोहित अवचित, सौ. सुरेखा खंडागळे व यासेरजी बागवे यांही विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बागवे , नगरसेवक यांनी केले.
या प्रसंगी उल्हास दादा पवार, रमेश दादा बागवे आणि आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोज यांनी केले.

Bharat Surana : Congress : कॉग्रेस नेहमीच व्यापाऱ्यांसाठी सहकार्याच्या भूमिकेत – बागवे

Categories
Political पुणे

कॉग्रेस नेहमीच व्यापाऱ्यांसाठी सहकार्याच्या भूमिकेत – बागवे

पुणे – मार्केट यार्ड येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  भरत सुराणा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात  दि पूना मर्चंट चेंबरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा  व श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडत असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अँड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड ,कमल व्यवहारे, सोनाली मारणे यांच्या हस्ते चेंबरचे अध्यक्ष  राजेश बाठिया व श्री छत्रपती शिवाजी मार्केट आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश  शेडगे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा , शाल व पुष्पगुच्छ  देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले व्यापारी हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून व्यापाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक वेळी सहकार्य करण्यात आले आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचा विचार हा काँग्रेस पक्ष करत असतो करोना काळामध्ये चेंबरने केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

यावेळी अभय छाजेड  म्हणाले पुणे मर्चंट चेंबर मे अनेक वेळा समाज हिताचे कार्यक्रम करत असताना दिवाळी लाडू चिवडा वाटपाचा कार्यक्रम करून एक सामाजिक संदेश याठिकाणी सर्वांसमोर दिलेला आहे सर्व सदस्यांचे पुण्याशी  घट्ट नाते असून पुणे शहरामध्ये चेंबर चे व श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडत याचां वेगळे महत्त्व आहे.

कार्यक्रमाचे आयोजन भरत सुराणा व योगिता भरत सुराणा यांनी केले.

कार्यक्रमासाठी ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,चेतन अगरवाल, सुरेश चौधरी, अक्षय जैन नितीननिकम, अविनाश गोतारणे,शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी, अनुसया गायकवाड, हलिमा शेख, अशोक नेटके, हसिना सय्यद, तस्लीम शेख, कांचन बालनायक

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सचिन अडेकर यांनी केले तर आभार विश्वास दिघे यांनी मानले

Pune City Woman Congress : शहर महिला काँग्रेस तर्फे अनोखे आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शहर महिला काँग्रेस तर्फे अनोखे आंदोलन

पुणे : पुणे  शहर महिला काँग्रेस तर्फे मकर संक्रांत निमित्त  भाजप सरकार उज्ज्वला गॅस योजना वान परत भेट करण्याचे  आंदोलन आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे व पुणे शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष पूजा आनंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी उपस्थित होते.

संध्या सव्वालाखे म्हणाल्या, सर्व सामान्यांना न परवडणारे उज्ज्वला गॅस सिलेंडर मोदींना परत करणार. अच्छे दिनाचे  स्वप्न दाखवणाऱ्या या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्व सामान्यांचे जगणे मुशकील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोडमडले आहे. उज्वला गॅसची  सबसिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,त्या मुळे  महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सत्कार चा निषेध करत आहोत. महागाई वाढवून केंद्र सरकारने महिलांच्या संक्रांतीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे काम केले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे  दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्ज्वला योजने मार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. उज्वला योजनेच्या  बहुतांश लाभार्थ्यांनी आता गॅस सिलेंडर अडगळीत टाकले असून महिलांना परत जुन्या चुलीवर स्वयंपाक करावे लागणार आहे.

पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या, दरवाढ केली मोदीने आणि आता त्याचा त्रास महिलांना संसार चालवण्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्या महिलांनी  चुल सोडून गॅस चे कनेक्शन घेतले त्यांना पुन्हा मोदी सरकारच्या ना करते पणामुळे गॅसचे दर १००० रुपय च्या आसपास पोचले आहे. घर खर्च नाकेनऊ झाले आहे. मोदी सरकारने महिलांना चुलीवर जाण्यास भाग पाडले  आहे, त्यामुळे महिलां मध्ये प्रचंड आक्रोश वाढले आहे, आता परत भाजपा  ला कधी महिला मत देणार नाही.

या आंदोलनास संगीता तिवारी, उज्ज्वला साळवे, अस्मिता शिंदे, शोभा पनीकर, इंदिरा आहिरे, सुजाता चिन्ता, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, स्वाती शिंदे, वैशाली मराठे, पल्लवी सुरसे,  सीमा सावंत व अनेक महिला उपस्थित होते.

आंदोलनाचे आयोजन  पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद यांनी केले.

PMC : कॉंग्रेस चे नगरसेवक पिशव्या, बकेट, बाकडी खरेदी नाही करणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कॉंग्रेस चे नगरसेवक पिशव्या, बकेट, बाकडी खरेदी नाही करणार 

: नगरसेवकांना सूचना करणार : रमेश बागवे

पुणे : महापालिकेच्या खर्चातून कचऱ्यासाठीच्या पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड व संजय बालगुडे यांनी दिला आहे. तसेच आमच्या नगरसेवकांना देखील ही खरेदी न करण्याची सूचना केली जाईल. असे अध्यक्ष बागवे यांनी सांगितले.

     महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन त्यात बकेट, पिशव्या आणि ढकलगाडी यांचा वापर नगरसेवक प्रचारासाठी करतील असे नमुद करण्यात आले आहे. याकरिता, या वस्तूंची खरेदी तूर्त थांबवावी. निवडणुकीनंतर महापालिकेच्या अंदाजपत्रकात रितसर तरतूद करुन या वस्तूंची खरेदी केली जावी आणि मार्च महिन्यात त्यांचे वाटप करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

     वस्तू खरेदी करुन त्यावर नगरसेवक आपापली नावे लिहून त्या वस्तूंचे वाटप करतात हा प्रचाराचाच एक भाग होईल. अवघ्या चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने नागरिकांकडून कररुपाने मिळालेल्या पैशातून सुमारे १६ कोटी रुपयांची उधळपट्टी होईल हे गैर आहे. आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अनागोंदी आळा घालावा. शिवाय, बदललेल्या प्रभाग रचना लक्षात घेऊन वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातूनही गोंधळ उडेल, नगरसेवकांसाठी असलेल्या निधीतून ढकलगाडी खरेदी करण्यास सक्त विरोध राहील. ढकला गाड्यांवरही नगरसेवकांची नावे लिहून प्रचार साधला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

     आयुक्तांनी विशेष अधिकार वापरुन ही खरेदी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.


पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी. आम्ही आमच्या नगरसेवकांना देखील ही खरेदी न करण्याच्या सूचना करणार आहोत.

        रमेश बागवे, अध्यक्ष, शहर कॉंग्रेस

Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

 राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले 

: कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप

पुणे : गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांचा ‘एटीएमएस’ प्रकल्पामध्ये महापालिकेमध्ये देखभाल दुरूस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील ५ वर्षात ५८ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतला. या प्रकल्पामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला होता. या ५८ कोटी रूपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या बाबतीत सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पत्रकार परिषद घेवून या प्रकल्पाला विरोध केला होता आणि आंदोलनही केले होते. मात्र राष्ट्रवादीने ऐन वेळेला पलटी खात भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असा आरोप कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे. 

: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे

बागवे पुढे म्हणाले,  मुख्य सभेमध्ये सत्ताधारी भाजपाने उपसूचना देवून समाविष्ट गावातील १०० सिग्नलचा यामध्ये समावेश केला. हा विषय मंजूरीसाठी आल्यावर काँग्रेसच्या व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करीत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी केली. सदर प्रस्ताव महानगरपालिकेच्या अहिताचा आहे आणि पुणे शहरावर आर्थिक बोजा टाकणारा आहे. या प्रकल्पाची पुणे शहराला गरज नसताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरावर आर्थिक भार लादणारा हा प्रस्ताव आहे आणि स्मार्ट सिटीने काढलेल्या निविदांची देखभाल दुरूस्ती पुणे मनपाने करावी असा हा पहिल्याच प्रकल्प आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका अनेक सामाजिक संस्थानी, संघटनांनी व पक्षांनी उपस्थित केली. काँग्रेस पक्षाची भूमिका सुरूवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती आणि म्हणून मुख्य सभेमध्ये काँग्रेस पक्षाने या विरूध्द आवाज उठविला आणि प्रस्तावाला प्रखर विरोध करून विरोधी मतदानही केले.‌ या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान कले. या आधी देखील अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मतदान करून अनेक प्रकल्पांना व भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता देवून पुणे मनपाला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील.

  बागवे म्हणाले, महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले.

Pune Congress : महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने सुरु केली ही तयारी

Categories
Political पुणे

महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने सुरु केली ही तयारी

: पक्षातर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ

                                     

पुणे –  प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शना नुसार शहर कॉंग्रेस महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ना. गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौकाजवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून समाजातील विविध घटक काँग्रेस पक्षाचे सभासद होतात.  पुणेकरांतर्फे श्री. सचिन भोसले रा. येरवडा यांनी काँग्रेस पक्षाची सर्वात प्रथम सभासद नोंदणी अर्ज भरून प्राथमिक सभासद झाले.

   : दिल्लीत झेंडा फडकवण्याचा संकल्प

  यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीने १६ ऑक्टोबरच्या बैठकीत सप्टेंबर २०२२ ला पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष सभासद नोंदणीला सुरूवात झाली आहे. ना. गोपाळकृष्ण गोखले १९०५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. आज त्यांना अभिवादन करून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यात सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात केली आहे. काँग्रेस पक्ष हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. समाजातील सर्व जाती जमातीचे लोक या पक्षाचे सदस्य होऊ शकतात. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. सन १८८५ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. वोमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सर फिरोज शहा मेहता, एनी. बेसंट, सरोजिनी नायडू, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस व इतर ज्येष्ठ काँग्रेस नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व तुरूंगवास भोगला. स्वातंत्र्य मिळाल्यावर  पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी व इतरांनी भारत देशाला जगात लौकिक मिळवून दिला. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे आज भारत देश सुजलाम सुफलाम झाला आहे. परंतु आज देशाचे चित्र फार वेगळे आहे. महागाई, बेरोजगारी आणि चूकीच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. याला मोदी सरकार जबाबदार आहे. आपण सर्वांनी जनतेपर्यंत काँग्रेस पक्षाने केलेले काम आणि पक्षाचे ध्येय धोरण जनतेमध्ये पोहचवून जास्तीत जास्त सभासद नोंदवून पक्ष बळकट करावा लागेल. सन २०२४ ला काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा दिल्लीत फडकला पाहिजे असा संकल्प करूयात.’’

     यावेळी पुणे मनपाचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, माजी महापौर कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, नीता रजपूत, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, राजेंद्र भुतडा, रमेश सकट, प्रविण करपे, सुरेश कांबळे, भारत पवार, बाबा सैय्यद, संदीप मोरे, गौरव बोराडे, नारायण पाटोळे, राहुल वंजारी, राजश्री अडसुळ, शारदा वीर, विठ्ठल गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.