Avinash Bagwe : संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे भूमिपूजन संपन्न  : नगरसेवक अविनाश बागवे यांची संकल्पना 

Categories
cultural PMC Political पुणे
Spread the love

संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे भूमिपूजन संपन्न

: नगरसेवक अविनाश बागवे यांची संकल्पना

पुणे : संत तुकाराम महाराजांन सोबत ज्यांनी टाळकरी म्हणून काम केलं , तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लिहण्याचे काम केले व पुढे लोकांसमोर आणून त्यातुन समाज प्रबोधनाचे महान कार्य केले ते थोर ” संत संताजी महाराज जगनाडे ” यांचे कार्य लोकांपुढे येण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होईल. असे मत  उल्हासदादा पवार यांही व्यक्त केले.

प्रभाग क्र .19 पुणे महानगर पालिका हद्दीतील सेव्हन लवज चौक जवळील उड्डाण पूला चे खालील मोकळ्या जागेत , पुणे म.न. पा. चे वतीने मा. अविनाश रमेशदादा बागवे , नगरसेवक यांच्या निधीतून विकसित होत असलेल्या ” संत संताजी महाराज जगनाडे उद्यान ” भूमिपूजन समारंभात ते बोलत होते .

दिनांक १६/२/२०२२ रोजी मा. उल्हास दादा पवार ( उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार) यांचे शुभ हस्ते आणि मा. रमेश दादा बागवे ( माजी गृह राज्य मंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी ) , मा. आबा बागुल , (नगरसेवक व पुणे म.न.पा. गटनेते काँग्रेस पक्ष), मा. विशाल धनवडे, नगरसेवक यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
रमेशदादा बागवे आपल्या भाषणात म्हणाले कि, या उद्यानाच्या माध्यमातून तिळवण तेली समाजाची पश्चिम महाराष्ट्रातील मोठया प्रमाणात अनेक वर्षा पासून होत असलेली मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे यासाठी पुणे मनपा व सर्व पदाधिकारी, नगरसेवक ज्यांनहीं यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे अभिनंदन . या प्रसंगी मा.शिवदास उबाळे ( अध्यक्ष, सुदुंबरे संस्थान) , मा. घनश्याम वाळुंजकर ( अध्यक्ष, पुणे तेली समाज) , मा. शिवराज शेलार ( अध्यक्ष, पिंपरी चिंचवड तेली समाज), मा. विजय रत्नपारखी ( कार्याध्यक्ष , सुदुंबरे संस्थान), Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस , सुदुंबरे संस्थान), नामांकित आर्किटेक्ट अभिजित पन्हाळे , दत्तात्रय शेलार ( खजिनदार, सुदुंबरे संस्थान), संजय जगनाडे ( उपाध्यक्ष ,पिंपरी चिंचवड तेली समाज), जनार्दन जगनाडे ( माजी अध्यक्ष सुदुंबरे संस्थान) तसेच Adv. आनंद धोत्रे, प्रदीप उबाळे इत्यादी मान्यवर व तिळवण तेली समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियोजित उद्यानास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याबाबत पुणे महानगर पालिका यांचेकडे  विजयकुमार शिंदे ( उपाध्यक्ष सुदुंबरे संस्थान व माजी अध्यक्ष पुणे तिळवण तेली समाज) यांनी प्रस्ताव सादर केला असून गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला असून त्याकामी, Adv. राजेश येवले ( मुख्य चिटणीस सुदुंबरे संस्थान) यांचेही त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभले. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी मा. विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, रोहित अवचित, सौ. सुरेखा खंडागळे व यासेरजी बागवे यांही विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बागवे , नगरसेवक यांनी केले.
या प्रसंगी उल्हास दादा पवार, रमेश दादा बागवे आणि आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोज यांनी केले.

Leave a Reply