Water Cut : PMC : शहराच्या या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद!

Categories
PMC social पुणे
Spread the love

शहराच्या या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे : गुरुवार दिनांक ०३/०३/२०२२ रोजी भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील विमाननगर टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०४/०३/२०२२ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दि. ०३/०३/२०२२ रोजी भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीत विमाननगर टाकीचे मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे कामामुळे व सदर लाईनवर फ्लो मीटर बसविण्याचे कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.व दि. ०४/०३/२०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

भामा आसखेड प्रकल्प विमाननगर परिसर :- संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ इत्यादी.

Leave a Reply