PMC Pune Water Department | पुणे शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Water Department | पुणे शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार

– सकाळी 9 ते सायंकाळी 5 पाणी बंद राहणार

PMC Pune water Department | गुरूवार   रोजी वडगाव जलकेंद्र येथे म.रा.वि.वि.कंपनीचे २२ KV येणाऱ्या विद्युत वाहिनीवर म.रा.वि.वि.कंपनी तातडीचे व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम करणार आहे. त्यामुळे उपरोक्त जलकेंद्र व राजीवागांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी : ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे. तसेच गुरूवार ११/०५/२०२३ रोजी सायंकाळी ५ नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा
होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी,  सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी. (Pmc pune news)

Canal Advisory Committee | सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

| कालवा समितीच्या बैठकीत झाला निर्णय

पुणे | पाणी कपातीबाबत (Water cut pune) पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या तरी शहरात पाणी कपात लागू होणार नाही. मात्र आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. याबाबत पुढील 8-10 दिवसात परिस्थिती पाहून कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुपारी झालेल्या कालवा समितीच्या (Canal advisory committee) बैठकीत हा निर्णय झाला. (Pune water issue)
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत पुणेकरांना दिलासा देण्यात आला आहे. सध्या तरी कुठलीही कपात नसणार आहे. मात्र आगामी 10 दिवसात धरणातील पाण्याची स्थिती पाहून कपाती बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
(Pune city water distribution issue)

| एक दिवस पाणी बंद ठेवण्याला आमदार माधुरी मिसाळ यांचा विरोध

सध्या जरी पाणीकपात केली जाणार नसली तरी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मात्र याला आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी विरोध केला. एक दिवस पाणी बंद ठेवले तरी पुढील तीन दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी बंद ठेवू नये, अशी मागणी मिसाळांनी केली. त्यावर महापालिका पाणीपुरवठा विभाग कडून सांगण्यात आले कि पूर्ण शहरात अशी समस्या येत नाही. याबाबत योग्य नियोजन केले जाईल. एकंदरीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले जाऊ शकते. त्यासाठी पुणेकरांनी तयार राहायला हवे आहे.
दरम्यान उद्या म्हणजे गुरुवारी पूर्ण शहरात पाणी बंद (Water closure) राहणार आहे.

Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय

| दुपारी कालवा समितीची बैठक

पुणे | अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात (pune water cut) लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत (canal Advisory Committee Meeting)  होणार आहे. (Pune city water distribution issue)
भारतीय हवामान विभागाच्या (Indian weather department) अंदाजानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अलनिनो” (EL-Nino) या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जुन,२०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ह्रास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालवू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळ सचिव भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी आपत्कालीन पाणी आराखडा बनवण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने हा आराखडा सरकारला सादर केला आहे. (PMC Pune)
असे असले तरी अल निनो च्या बाबतीत सरकार गंभीर आहे. त्यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता दाट आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील (Khadakwasla Chain) पाण्याची पातळी खाली गेली आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune district Guardian minister Chandrkant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. (Canal advisory committee)

Water Cut | पुणेकरांना एक दिवसाआड पाणी? | बुधवारच्या कालवा समितीच्या बैठकीत होणार निर्णय

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना एक दिवसाआड पाणी?

| बुधवारच्या कालवा समितीच्या बैठकीत होणार निर्णय

पुणे | अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. मात्र एक दिवसाआड पाणी घ्यायला महापालिकेचा विरोध आहे. पुणेकरांना किती पाणी मिळणार? याबाबतचा निर्णय परवा (ता.26) ला पालकमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अलनिनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जुन,२०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ह्रास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालवू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळ सचिव भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी आपत्कालीन पाणी आराखडा बनवण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने हा आराखडा सरकारला सादर केला आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या धरणात होत आहे, त्या धरणाचे पाणी त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसासठी आरक्षित करण्याबाबत संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या विभागातील जलसंपदा विभागास कळवावे. असे सरकारने आदेशात म्हटले होते.
त्यानुसार महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेमार्फत पुणे शहरासाठी सरासरी १४७० एम.एल.डी. प्रतिदिन याप्रमाणे पाणवठा केला जात आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट २०२३ अखेर पुणे शहरासाठी एकुण सुमारे ७.टी.एम.सी. आहे. तरी खडकवासला प्रकल्पामधून पुणे शहरासाठी ७.टी.एम.सी. पाणी आरक्षित करावे. यावर आता कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. शहराला एकदिवस आड पाणी मिळणार किंवा कसे हे याच बैठकीत ठरणार आहे.
असे असले तरी महापालिका पाणीपुरवठा विभागाने तयारीचा भाग म्हणून एक दिवसाआड पाण्याचे नियोजन तयार ठेवले आहे. कुठल्या परिसराला कुठल्या दिवशी पाणी द्यायचे, याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.

EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार!

 | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

– ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे सरकारचे निर्देश

पुणे | “अल-निनो” वादळ (समुद्र प्रवाह सक्रीयता) च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरीता विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकरकडून पुण्यासहीत सर्वच महापालिकांना देण्यात आले आहेत. अल निनो मुळे मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यापर्यंत करावे लागणार आहे. त्यासाठी पाणीकपात आवश्यक आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही काळातच पुणेकरांना पाणीकपात सहन करावी लागणार, हे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते जून या कालावधीचे टंचाई कृती आराखडे तयार करण्याबाबत व त्या अनुषंगाने टंचाई निवराणाचे उपाययोजना राबविण्याबाबत शासनाच्या स्थायी सुचना आधीच दिल्या आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या अंदाजा नुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अल- निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे माहे जुन, २०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणा-या -हास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालावू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर  मंत्रीमंडळ सचिव (Cabinet Secretary) भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना काही सूचना केल्या  आहेत.

त्यानुसार  जुलै ते ऑगस्ट, २०२३ या  कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई. निवारणार्थसाठी विशेष कृती आराखडा  तयार करणेमी. या कृती आराखडयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या तसेच पिण्याखेरीज इतर आवश्यक गरजांकरिता, जनावरांकरिता पाण्याची आवश्यकता विचारात घ्यावी. त्याचप्रमाणे ज्या शहराना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो त्याची पाणी पातळी कमी झाली तर काही अंशी पाणी कपात करणे गरजेचे आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 16.50 टीएमसी हुन अधिक पाणी आहे. महापालिकेने याचे जुलै पर्यंत नियोजन केले आहे. त्यासाठी 7.5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पाटबंधारेला दोन आवर्तनासाठी 10 टीएमसी पाणी अवश्यक आहे. आगामी काळात म्हणजे अल निनो मुळे पाऊस नाही झाला तर एवढे पाणी पुरणार नाही. त्यासाठी शेतीचे पाणी कमी करावे लागणार आहे. तसेच शहरातही पाणीकपात होऊ शकते. तसा निर्णय राज्याच्या आदेशानुसार घ्यावा लागणार आहे.

Pune | Water Closure | बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

पुणे | शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या बुधवार आणि गुरुवारी  बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
सणस पंपिंग स्टेशन :- दि. १५/०२/२०२३ रोजी नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी-१० ते बी-१४
चतुश्रुंगी GSR inlet flow meter 1200mm, सिपोरेक्स खडकी लाईन २५० मि.मी. :- दि. १६/०२/२०२३ रोजी बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी.
पद्मावती GSR :- दि. १६/०२/२०२३ रोजी बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.
नवीन कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र व रामटेकडी खराडी नोबल हॉस्पीटल :- दि. १६/०२/२०२३ रोजी ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.

Water Closure | येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद

पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या सोमवारी व रविवारी  बाधित होणारे भागास  पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
आगम मंदिर ESR :- दि. १३/०२/२०२३ रोजी दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता
Institute ESR :- दि. १४/०२/२०२३ रोजी वडगाव बु., निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर

Pune | Water closure | पुणे शहराच्या काही भागात गुरुवारी पाणी बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Categories
Uncategorized

पुणे शहराच्या काही भागात गुरुवारी पाणी बंद

महापालिकेकडून येत्या गुरूवारी रोजी वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गांधी भवन पाणी टाकी तसेच चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहीनीला फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे, येत्या बुधवारी रात्री पासून गुरूवारी रात्री पर्यंत शहराच्या पश्‍चिमभागातील कोथरूड, बावधन, वारजे, कर्वेनगर,बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, तसेच औंधच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी रोजी उशीराने तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून  करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

गांधी भवन टाकी परिसर ( बुधवारी रात्री 10 ते गुरूवारी रात्री 10) :

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्ह्यू, गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुल नगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क- 1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9 . मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर ( बुधवारी रात्री 10 ते गुरूवारी रात्री 10):

पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क,शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर इत्यादी.

पॅन कार्ड क्‍लब GSR टाकी परिसर :-

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्‍लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ.

Water supply | PMC pune | जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर 

Categories
Breaking News PMC social पुणे

जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर

दांडेकर पूल येथे पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणाऱ्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून रविवारी  जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, यामुळे संपूर्ण हडपसर, लष्कर, कोंढवा भागातील पाणी पुरवठा विस्कळित होणार आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्रात १६०० मिमी व्यासाची जलवाहिनी जाते. ती खराब झाल्याने दुरुस्त केली जाणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून कॅनॉलमधून पाणी सोडले जाणार आहे. ते लष्कर जलकेंद्रात घेऊन शुद्धीकरण केले जाईल, त्यामुळे पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुमारे १४ तास चालणार आहे, त्यामुळे रविवारी दिवसभर काम केले जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले.

| या भागात कमी दाबाने येणार पाणी

बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपूर्ण हडपसर इंडस्ट्रिअल एरिया, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजू, नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू. एस. व्ही.नगर, शांतिनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगावशेरी पार्ट, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एन. आय. बी. एम. रोड, रेसकोर्स.

Water supply shut off | शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

गुरुवार दिनांक १५/०९/२०२२ रोजी लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील वानवडी ESR व हायसर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती HLR येथे व SNDT HLR येथे फ्लो मीटर बसविण्याचे  नियोजन आहे.  त्यामुळे शहरातील पुढीलप्रमाणे परिसर बुधवार दि. १४/९/२०२२ रोजी रात्री १० ते गुरुवार दि. १५/०९/२०२२ रोजी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद व शुक्रवार दि. १६/०९/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

१) वानवडी इ एस आर व हाय सर्विस टाक्याखालील भाग:- 
वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, प्रभाग क्र. २५ संपूर्ण परिसर.
२) पर्वती HLR :-
पर्वती HLR, पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, SBI कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, ST कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर)
३) सेमिनरी GSR :-
अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स.नं. ३५४, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स.नं. ४२,४३, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर.
४) SNDT (HLR):-
शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड,बी.एम.सी.सी. रोड, रेव्हेन्यू कॉलनी,
गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापतीबापट रोड, कोथरूड (डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्या मागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानी नगर, किस्किंदा नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर, प्रभाग ३१ चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हैप्पी कॉलनी, पृथ्वी हॉटेल परिसर, मेघदूत सोसायटी).