Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

| कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Pune Water Crisis | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) पुणे शहरासाठी सद्यस्थितीत 1450 MLD पाणी उचलते. खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain) प्रकल्पातील 4 धरणातून हे पाणी घेतले जाते. मात्र यात आता 50 MLD कपात करण्याचा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत (Can Advisory Committee Meeting) महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेला नियोजन करावे लागणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी दिली.
उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू याबाबत निर्णय घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Water Cut News)
मुख्य अभियंता जगताप यांनी सांगितले कि, बैठकीत धरणातील पाण्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या कि महापालिकेने 31 जुलै पर्यंत अर्धा ते एक टीएमसी पाण्याची बचत करावी. त्यासाठी दररोज उचलल्या जाणाऱ्या पाण्यात कपात करा. महापालिका सध्या शहरा साठी 1450 MLD पाणी उचलते. यात बचत करून हे पाणी 1400 MLD इतके घ्यावे. अशी सूचना महापालिकेला करण्यात आली. त्यानुसार महापालिका पाण्याचे नियोजन करणार आहे. असे जगताप यांनी सांगितले.

Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

Pune Water Crisis | पुणे | शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट येण्याची चिन्हे आहेत. कारण डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. दरम्यान महापालिका (PMC water supply department) देखील यावर गंभीरपणे विचार करत आहे. (Pune Municipal Corporation)
याबाबत जलसंपदा विभागाने पालिकेला पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड धरणातून  पाणीवापर सुरू केल्याने खडकवासला धरणातील  (Khadakwasla Dam)  दैनंदिन पाणीवापर तात्काळ नियंत्रित/कमी करण्याबाबत खडकवासला प्रकल्पाच्या रब्बी हंगामाच्या कालवा सल्लागार समितीच्या  झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, पुणे जिल्हा तसेच अध्यक्ष कालवा सल्लागार समिती यांनी निर्देश दिलेले आहेत. पुणे महानगरपालिकेस खडकवासला धरणातून १२.६० टीएमसी वार्षिक पाणी आरक्षण मंजूर आहे. पुणे महानगरपालिका सध्या खडकवासला धरणातून सरासरी दैनंदिन १५१० एमएलडी पाणीवापर करीत आहे. उपरोक्तनुसार पुणे महानगरपालिकेचा नोव्हेंबर २०२३ सरासरी दैनंदिन एकूण पाणीवापर १५१० एमएलडी इतका असून असाच पाणीवापर सुरु राहिल्यास सन २०२३-२४ चा एकूण वार्षिक पाणीवापर १९.४६ टीएमसी इतका होईल. भामा आसखेड धरणातून पुणे म.न.पा.चा प्रत्यक्ष पाणीवापर सुरू केला असल्यामुळे त्याप्रमाणात खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर कमी होणे अपेक्षित आहे. तथापि सद्यस्थितीत तसे दिसून येत नाही. त्यामुळे १.१२.२०२३ पासून पुणे महानगरपालिकेने खडकवासला धरणातील पाणी वापर नियंत्रित/कमी न केल्यास पुणे शहरास उन्हाळा हंगाम २०२३-२४ मध्ये ग्रामीण भागास पिण्यासाठी व गुरांसाठी पाणी देण्यास पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. (Pune News)
जलसंपदा विभागाने पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेने जरी पाणीवापर नियंत्रित/कमी केला नाही तरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत
ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे शहरास माहे जून- जुलै २०२४ मध्ये पिण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरात उन्हाळा अखेरीस पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये प्राधान्याने ग्रामीण व शहरी भागास पिण्याचे पाणी देण्याची सुचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. तथापि जुलै २०२४ अखेरपर्यंत पुणे शहराचे पाणीवापराचे करून साधारणत: ग्रामीण भागासाठी २.५ टीएमसी चे पाणी बचतीचा आराखडा पुणे महानगपालिकेने तयार करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याबाबत अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांनी बैठकीत निर्देश दिलेले आहेत. तथापि पाणीबचतीची अंमलबजावणी दि. ५.१२.२०२३ पासून करणे उचित राहील. असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. (Pune Water News)
सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते ३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. मात्र महापालिका यावर गंभीरपणे विचार करत आहे. त्यामुळे पाणीकपाती साठी पुणेकरांना तयार राहावे लागणार आहे.

Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय

| दुपारी कालवा समितीची बैठक

पुणे | अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात (pune water cut) लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत (canal Advisory Committee Meeting)  होणार आहे. (Pune city water distribution issue)
भारतीय हवामान विभागाच्या (Indian weather department) अंदाजानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अलनिनो” (EL-Nino) या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जुन,२०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ह्रास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालवू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळ सचिव भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी आपत्कालीन पाणी आराखडा बनवण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने हा आराखडा सरकारला सादर केला आहे. (PMC Pune)
असे असले तरी अल निनो च्या बाबतीत सरकार गंभीर आहे. त्यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता दाट आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील (Khadakwasla Chain) पाण्याची पातळी खाली गेली आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune district Guardian minister Chandrkant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. (Canal advisory committee)

Water Stock | Khadakwasla dam | चार धरणांत केवळ 2.91 TMC पाणी शिल्लक  | मागील वर्षी होते 8.24 TMC 

Categories
Breaking News PMC social पुणे

चार धरणांत केवळ 2.91 TMC पाणी शिल्लक

| मागील वर्षी होते 8.24 TMC

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीत गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असला तरी सध्या चारही धरणांत मिळून केवळ 2.91 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा 8.24 टीएमसी होता.

खडकवासला धरण साखळीच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या महिनाभरात आजपर्यंत, खडकवासला परिसरात 10.5 मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या केवळ 6 टक्‍के आहे. दुसरीकडे यंदाचा उन्हाळा गेल्या 122 वर्षांत सर्वात प्रखर होता. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने झाले झाले आहे. त्यातच यंदा पूर्व मान्सून पावसानेही पाठ फिरवल्याने याचा परिणात धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावर झाला आहे.