PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक!

PMC Kharadi STP Plant | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने खराडी परिसरात मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (Storm Water Treatment Plant) अर्थात एसटीपी प्लांट निर्माण करण्यात आला आहे. याची आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाहणी केली. प्लांट मधून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे अजित दादांकडून कौतुक करण्यात आले. अशाच पद्धतीने सर्व प्लांट मध्ये काम व्हायला हवे, अशा सूचना पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. (PMC Pune)
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकास कामाची पाहणी केली. महापालिका प्रशासना कडून जायका प्रकल्पाचे (PMC JICA Project) काम हाती घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून शहरात 11 एसटीपी प्लांट निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील एक प्लांट खराडी परिसरात निर्माण करण्यात येणार आहे. याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पवार आले होते. हा प्रकल्प 30 MLD चा असणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्याच शेजारी महापालिकेचा 40 MLD चा शुद्धीकरण प्रकल्प आहे. याची पाहणी अजित पवार यांनी केली. शुद्धीकरण प्रकल्पातून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याची शुद्धता त्यांनी तपासली. शुद्ध पाणी नदीत सोडले जात असल्याबद्दल अजित दादांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. तसेच अशाच पद्धतीने सर्व शुद्धीकरण केंद्राचे काम व्हायला हवे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.
यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
—–

DP of Included Villages |विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

Categories
Breaking News PMC Political पुणे

DP of Included Villages |विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

| तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी

DP of Included Villages | पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency)  पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच (Included Villages DP) अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि (Chandrakant Patil) पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना टॅग करत खा. सुळे यांनी याबाबत X वर Post (Post on X) केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत कोणतेही महत्वाचे निर्णय होत नाहीत. यामागे समाविष्ट गावांसाठीचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे कारण सांगण्यात येते. याचा मोठा फटका या गावांतील नागरिकांना बसत असून पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबतही अडचणी येत आहेत. ही मोठी काळजीची गोष्ट आहे, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासकीय आणि शासकीय दिरंगाईचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो, हे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिका आयुक्त यांनी तातडीने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करुन तो मंजूर करण्यासंबंधी सकारात्मक विचार करुन कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


News Title | DP of Included Villages | Lack of development plan hinders the development of villages included in the municipality | MP Supriya Sule demanded the government to prepare a development plan immediately

 

Pune | Water Closure | बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

पुणे | शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या बुधवार आणि गुरुवारी  बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
सणस पंपिंग स्टेशन :- दि. १५/०२/२०२३ रोजी नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी-१० ते बी-१४
चतुश्रुंगी GSR inlet flow meter 1200mm, सिपोरेक्स खडकी लाईन २५० मि.मी. :- दि. १६/०२/२०२३ रोजी बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी.
पद्मावती GSR :- दि. १६/०२/२०२३ रोजी बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.
नवीन कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र व रामटेकडी खराडी नोबल हॉस्पीटल :- दि. १६/०२/२०२३ रोजी ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.

Lumbini Park | लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक

Categories
Breaking News PMC Political पुणे

 लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक

पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नीटनेटके नियोजन केल्यामुळे पुणे माहपालिका प्रभाग क्रमांक दोनच्या लुंबिनी उद्यानाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्यानाच्या सुशोभिकरणात आणि नीटनीटकेपणाचे योग्य नियोजन आम्ही केले होते. विकासाच्या दृष्टीमुळे आणि कर्मचारी, नागरिक यांच्या सहाय्याने लुंबिनी उद्यान प्रथम ठरले आहे. अशी माहिती माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. (PMC pune Lumbini park)

डॉ धेंडे यांनी सांगितले कि, आरोग्याबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहेत. पहाटे व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. नागरिकांना फिरण्यासाठी योग्य सुविधा देणे गरजेचे आहे. या उद्देशाने लुंबिनी उद्यानाची निर्मिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. उद्यानात नागरिकांना फिरण्यासाठी सुसज्ज ट्रॅक तयार केले आहेत. त्यावरून नागरिक चालण्याचा आणि धावण्याचा व्यायाम करत आहेत. उद्यानात शांतीचा मार्ग सांगणारे गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. केवळ प्रतिमा न उभारता त्याखाली मानवी जीवन समृद्ध करणारे विचार देखील नमूद करण्यात आले आहेत. उद्यानात मध्यभागी गोलाकार लहान हॉल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये तरूण, ज्येष्ठ योगाचा व्यायाम करतात.

या बरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्यानात कुठेही अस्ताव्यस्त कचरा पडलेला नाही. उद्यानाच्या वेळा नियमितपणे पाळल्या जात आहेत. ज्येष्ठांचा हास्य क्‍लब भरतो. त्याचा देखील फायदा होत आहे. उद्यानात स्वच्छ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा आहे. या बरोबरच एका सुरक्षारक्षकाबरोबरच माळी देखील या ठिकाणी कार्यरत आहेत.

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नवीन उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत. त्यांच्यामार्फत दिलेल्या सुविधांमुळे महापालिकेच्या वतीने दखल घेण्यात आली. पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 च्या स्पर्धेत सरस ठरत उद्यानाने प्रथम क्रमांक पटकाविला. असे हि धेंडे यांनी सांगितले.