Canal Advisory Committee | सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

| कालवा समितीच्या बैठकीत झाला निर्णय

पुणे | पाणी कपातीबाबत (Water cut pune) पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या तरी शहरात पाणी कपात लागू होणार नाही. मात्र आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. याबाबत पुढील 8-10 दिवसात परिस्थिती पाहून कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुपारी झालेल्या कालवा समितीच्या (Canal advisory committee) बैठकीत हा निर्णय झाला. (Pune water issue)
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत पुणेकरांना दिलासा देण्यात आला आहे. सध्या तरी कुठलीही कपात नसणार आहे. मात्र आगामी 10 दिवसात धरणातील पाण्याची स्थिती पाहून कपाती बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
(Pune city water distribution issue)

| एक दिवस पाणी बंद ठेवण्याला आमदार माधुरी मिसाळ यांचा विरोध

सध्या जरी पाणीकपात केली जाणार नसली तरी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मात्र याला आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी विरोध केला. एक दिवस पाणी बंद ठेवले तरी पुढील तीन दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी बंद ठेवू नये, अशी मागणी मिसाळांनी केली. त्यावर महापालिका पाणीपुरवठा विभाग कडून सांगण्यात आले कि पूर्ण शहरात अशी समस्या येत नाही. याबाबत योग्य नियोजन केले जाईल. एकंदरीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले जाऊ शकते. त्यासाठी पुणेकरांनी तयार राहायला हवे आहे.
दरम्यान उद्या म्हणजे गुरुवारी पूर्ण शहरात पाणी बंद (Water closure) राहणार आहे.

Water Issue | बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता | अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता

|  अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

| बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे ची २४x७ समान पाणी पुरवठा योजना आढावा बैठक संपन्न
२४x७ अंतर्गत असणाऱ्या या प्रकल्पाचे ट्रान्समिशन लाईन्स चे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होऊन, वारजे येथील पंपांचे काम मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होऊन सर्वांना २४ तास ७ दिवस पाणी पुरवठा मिळेल. असे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आश्वस्त केले.
२४×७ समान पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे मनपाचे आयुक्त   विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सफा बँक्वेट हॉल, लक्ष्मण नगर, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी जवळ, बालेवाडी हाय स्ट्रीट-२ येथे संपन्न झालेल्या या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर साहेबांनी सदरील २४x७ पाणी पुरवठा योजनेचा आढावा व बाणेर-बालेवाडी येथे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यावरील उपाय योजना बाबत सादरीकरण केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
२४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत वारंवार आढावा घेत असुन पुढील दोन महिन्यांमध्ये हे काम पुर्ण करण्यात येईल. तसेच तो पर्यंत ज्या सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यांना माझ्या स्वःखर्चातुन टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीची उपाय योजना करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरीकांना सागितले.
 यावेळी २४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. असे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरुड वि. भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर,  प्रकाशतात्या बालवडकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, उमाताई गाडगिळ, मा.सरपंच नारायण चांदेरे, मा.सरपंच काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, अस्मिता करंदिकर, सुभाष भोळ, मंदार राराविकर, रोहित पाटील, मीना पारगावकर तसेच पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, परिसरातील सोसायटींचे सभासद  यावेळी उपस्थित होते.
—-
२४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल.
– अमोल बालवडकर 

Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC Political पुणे

अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश

पुणे | बाणेर-बालेवाडी (Baner-Balewadi) भागात पाण्याची समस्या (Water issue) मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात  २४x७ समान पाणी पुरवठा योजनेची कामे प्रलंबित आहेत. यावरून महापालिकेच्या कारभाराची तक्रार माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister Chandrakat patil) यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत पालमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC pune)
अमोल बालवडकर यांच्या पत्रानुसार  बाणेर-बालेवाडी- -पाषाण भागामध्ये २
७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील ८ पैकी ६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरु करण्यात येतील. परंतु या टाक्यांना ट्रान्समिशन लाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाईनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच या टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई केल्यास लवकरच या २४ x ७ समान पाणी पुरव योजनेची सुरुवात बाणेर-बालेवाडी भागामध्ये होईल. असे बालवडकर यांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले होते.
 बालेवाडी व बाणेर येथील टाक्यांना पाणी पुरवठा करण्याकरिता जोडण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामामध्ये काही जागा मालकांच्या परवानग्या प्रलंबित आहेत. परवानग्या मिळविण्याकरिता पुणे म.न.पा.च्या अधिकार्यांना कृपया आपण योग्य त्या सूचना करून तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. या सर्व प्रलंबित कामांमुळे २४ x ७ समान पाणी पुरवठा योजना या प्रकल्पास विलंब होत आहे. बाणेर-बालेवाडीचा गंभीर पाणी प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. तरी पुढील काळात अशी पाणी टंचाई भासू नये या करिता हा प्रकल्प या भागामध्ये लवकरात लवकर सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. जर हि सर्व कामे लवकर पूर्ण झाली तर येत्या उन्हाळ्याच्या सुरवातीला एप्रिल – मे पर्यंत या प्रकल्पाचे उद्घाटन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल.
तरी सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता आपण संबंधित खात्यांच्या अधिकार्यांना तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी बालवडकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांना आदेश देत प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितले आहे.
| ही आहेत प्रलंबित कामे 
१. डुक्कर खिंड वारजे – NHAI च्या उर्वरित परवानगी करिता २५० मी. चे काम प्रलंबित आहे.
२. वारजे येथे दिलीप बराजे यांच्या परवानगी अभावी ३६ मी.ची लाईन प्रलंबित.
३. चांदणी चौक – श्री.अजमेर यांच्या जागेमधून जाणार्या ६० मी च्या लींचे काम प्रलंबित.
४. HEMRL येथील रामनदी वरील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे पुढे ट्रान्स्मिशन लाईन चे काम अपूर्ण.
५. पाषाण तलाव नजीकच्या शिव मंदिर येथील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे ४० मी लाईनचे काम प्रलंबित.
६. सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे ८०० मी चे काम पाईप उपलब्ध नसल्याने प्रलंबित
७. सुतारवाडी गावठाण येथे सुमारे १५० मी चे काम अरुंद रस्त्यामुळे प्रलंबित.
८. सुस खिंड पूल ते किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) पर्यंत एकूण १२७५ मी. लांबी पैकी ८७४ मी. लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.
९. किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) ते बालेवाडी डेपो पर्यंतच्या एकूण २१५० मी. पैकी १२३० मी लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.

Water problem of Baner Balewadi | बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, शिवम बालवडकर, अनिल बापू ससार यांनी नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन (Agitation) केले. यावेळी या तिघांनी पाण्याचा वॉल फिरवून बाणेर बालेवाडी कडे जाणारे पाणी सोडले. पालिका अधिकारी आंदोलन स्थळी आले असता चर्चेत वास्तविक मागील काही काळापासून पाणी सोडण्याचे तास कमी करण्यात आले आहे हे निदर्शनास आले. लोकसंख्या वाढण्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले पण लोकसंख्या वाढल्याने पाण्याचे तास वाढण्या पेक्षा कमीच झाले. (water problem of Baner Balewadi)

या आंदोलना बद्दल बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, बाणेर बालेवाडी परिसरात अनियोजित पाणीपुरवठा सुरू आहे. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील काहीच कारवाई होत नाही. अधिकारी नुसतीच हो, पाहतो, करतो, टाकीत पाणी नाही अशी उत्तरे देत आहेत. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर जोपर्यंत पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आंदोलन सुरू होते, परंतु पालिका अधिकारी यांनी येऊन नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करू असे सांगितले. (Pune Municipal corporation)

भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, जाणुन बुजून केवळ नागरिकांना त्रास व्हावा या यातूनही कृत्रिम प्राणी टंचाई निर्माण केली जात आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे या सर्वच परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हि कुत्रिम पाणी टंचाई थांबवुन लोकांना मुबलक पाणी देउन हा प्रश्न संपविला पाहिजे. (PMC Pune)

या आंदोलनात प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, त्याचबरोबर निष्क्रिय अधिकाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा व नंदीबैल आणून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला.

याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर, सचिन मानवतकर, शिवम बालवडकर, अनिल बापू ससार आदी उपस्थित होते.

यावेळी चांदणी चौक येथील पाण्याचे टाकीवर महापालिका अधिकारी प्रसन्ना जोशी, योगिता भांबरे, श्रीधर कामत यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु या चर्चेच्या वेळी असे निदर्शनास आले की पालिकेच्या अधिकाऱ्यांना बाणेर बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्नाची जाणीवच नाही. प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीच उत्तरे व्यवस्थित देता आली नाही. पाण्याची टाकी, पाण्याचे वॉल, पंप, पाणी किती सोडायला पाहिजे याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ जाणवला. एवढा गंभीर असणारा पाणी प्रश्न का उभा राहतो वारंवार लोक का समस्या मांडतात याची गंभीरता ह्या अधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी त्या मागचे अडचण निवारण करण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले दिसून येत नाही. तरी देखील बऱ्याच वेळानंतर त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणून उद्यापासून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून काय समस्या आहे याबाबत सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. जवळपास चार ते पाच तास हे आंदोलन सुरू होते. (water issue in baner balewadi)