EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार!

 | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

– ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे सरकारचे निर्देश

पुणे | “अल-निनो” वादळ (समुद्र प्रवाह सक्रीयता) च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरीता विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकरकडून पुण्यासहीत सर्वच महापालिकांना देण्यात आले आहेत. अल निनो मुळे मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यापर्यंत करावे लागणार आहे. त्यासाठी पाणीकपात आवश्यक आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही काळातच पुणेकरांना पाणीकपात सहन करावी लागणार, हे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते जून या कालावधीचे टंचाई कृती आराखडे तयार करण्याबाबत व त्या अनुषंगाने टंचाई निवराणाचे उपाययोजना राबविण्याबाबत शासनाच्या स्थायी सुचना आधीच दिल्या आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या अंदाजा नुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अल- निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे माहे जुन, २०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणा-या -हास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालावू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर  मंत्रीमंडळ सचिव (Cabinet Secretary) भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना काही सूचना केल्या  आहेत.

त्यानुसार  जुलै ते ऑगस्ट, २०२३ या  कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई. निवारणार्थसाठी विशेष कृती आराखडा  तयार करणेमी. या कृती आराखडयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या तसेच पिण्याखेरीज इतर आवश्यक गरजांकरिता, जनावरांकरिता पाण्याची आवश्यकता विचारात घ्यावी. त्याचप्रमाणे ज्या शहराना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो त्याची पाणी पातळी कमी झाली तर काही अंशी पाणी कपात करणे गरजेचे आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 16.50 टीएमसी हुन अधिक पाणी आहे. महापालिकेने याचे जुलै पर्यंत नियोजन केले आहे. त्यासाठी 7.5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पाटबंधारेला दोन आवर्तनासाठी 10 टीएमसी पाणी अवश्यक आहे. आगामी काळात म्हणजे अल निनो मुळे पाऊस नाही झाला तर एवढे पाणी पुरणार नाही. त्यासाठी शेतीचे पाणी कमी करावे लागणार आहे. तसेच शहरातही पाणीकपात होऊ शकते. तसा निर्णय राज्याच्या आदेशानुसार घ्यावा लागणार आहे.