Summer vacation hobbies | उन्हाळी सुट्टीतील छंद, कला व संस्कार वर्ग संपन्न

Categories
Education social पुणे महाराष्ट्र

उन्हाळी सुट्टीतील छंद, कला व संस्कार वर्ग संपन्न

पिंपळे गुरव येथिल सह्याद्री आदिवासी संस्थेच्या सभागृहात दहा दिवस सुरु असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अनु. ज. सेल, आदिवासी समन्वय समिति, आणि राजगृह लोकोत्तर धम्म विनय ट्रस्ट आयोजित रांगोळी, वारली चित्रकला, भाषण कला व ढोल ताशा वादन कला प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.

प्रसंगी मा. विरोधी पक्ष नेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे महिला अध्यक्षा कविता ताई अल्हाट यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमापत्र देण्यात आले तर रांगोळी – अमर लांडे, वारली चित्रकला वैशाली लेणे, पियुषा जाधव, ढोल ताशा अभिजित पवार, अजिंक्य गायकवाड, तुषार भवारी वैष्णवी कराळे, गौरी कराड या प्रशिक्षकाना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


मंचावरून बोलताना शहराध्यक्ष अजित भाऊ यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत सहभागी विदयार्थी, महिला, युवक आणि पालक यांना या कलेचा जन सेवेसाठी उपयोग करावा यासाठी शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी अनु. ज. सेल शहराध्यक्ष विष्णू शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकात सुट्टीत मामांच्या, आजीच्या गावाला जाण्यापूर्वी काहीतरी नविन शिकावे , कला आत्मसात करावी याकरीता सर्वच वयोगटाला सामावून घेणाऱ्या या उपक्रमा ची संकल्पना व उद्देश मांडला

कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरूण पवार, राजगृह संस्थेच्या राजश्रीताई जाधव, मा. नगरसेवक राजेंद्र जगताप राष्ट्रवादीचे युवा नेते शामभाऊ जगताप, उद्योजक मैनुद्दीन शेख तानाजी जवळकर, बाळासाहेब पिलेवार, ज्येष्ठ नेते देवेंद्रजी तायडे, रोहित जाधव, अनु. ज सेल पदाधिकारी महिला शहराध्यक्षा सुशिला जोशी, शितल मडके, दिलिप लोखंडे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार अनु. ज. सेल महिला सरचिटणीस सुनिता कोळप मानले
कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि संयोजनात रूपाली लांडे, सगुणा गारे, प्रतिभा कांबळे, सविता मुंढे आणि शिवसाह्याद्री वाद्य पथकाचा यांचा सिंहाचा वाटा होता

EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार!

 | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

– ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे सरकारचे निर्देश

पुणे | “अल-निनो” वादळ (समुद्र प्रवाह सक्रीयता) च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरीता विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकरकडून पुण्यासहीत सर्वच महापालिकांना देण्यात आले आहेत. अल निनो मुळे मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यापर्यंत करावे लागणार आहे. त्यासाठी पाणीकपात आवश्यक आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही काळातच पुणेकरांना पाणीकपात सहन करावी लागणार, हे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते जून या कालावधीचे टंचाई कृती आराखडे तयार करण्याबाबत व त्या अनुषंगाने टंचाई निवराणाचे उपाययोजना राबविण्याबाबत शासनाच्या स्थायी सुचना आधीच दिल्या आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या अंदाजा नुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अल- निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे माहे जुन, २०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणा-या -हास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालावू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर  मंत्रीमंडळ सचिव (Cabinet Secretary) भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना काही सूचना केल्या  आहेत.

त्यानुसार  जुलै ते ऑगस्ट, २०२३ या  कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई. निवारणार्थसाठी विशेष कृती आराखडा  तयार करणेमी. या कृती आराखडयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या तसेच पिण्याखेरीज इतर आवश्यक गरजांकरिता, जनावरांकरिता पाण्याची आवश्यकता विचारात घ्यावी. त्याचप्रमाणे ज्या शहराना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो त्याची पाणी पातळी कमी झाली तर काही अंशी पाणी कपात करणे गरजेचे आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 16.50 टीएमसी हुन अधिक पाणी आहे. महापालिकेने याचे जुलै पर्यंत नियोजन केले आहे. त्यासाठी 7.5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पाटबंधारेला दोन आवर्तनासाठी 10 टीएमसी पाणी अवश्यक आहे. आगामी काळात म्हणजे अल निनो मुळे पाऊस नाही झाला तर एवढे पाणी पुरणार नाही. त्यासाठी शेतीचे पाणी कमी करावे लागणार आहे. तसेच शहरातही पाणीकपात होऊ शकते. तसा निर्णय राज्याच्या आदेशानुसार घ्यावा लागणार आहे.

Temprature : Pune : पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार : तापमानाचा पारा वाढणार 

Categories
Breaking News social पुणे

पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार : तापमानाचा पारा वाढणार

उन्हाळा कडक राहणार असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाचा पुणेकर यंदा अनुभव घेत आहेत. गेले काही दिवस शहराचे कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सातत्याने अधिक राहत आहे. त्यात हवामान विभागाने पुण्यातील कमाल तापमान ४१ अंशांवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आणखी कडक उन्हाळा सहन करण्याची तयारी पुणेकरांना करावी लागणार आहे.

सध्या दुपार होताच अंगावर चटका बसावा, असे उन्ह जाणवत असते. त्यामुळे शहरातील रहदारीही मंदावलेली दिसून येते. गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना ४० अंशांवर तापमान गेले नव्हते. एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान ६ एप्रिल रोजी ३९.६ अंश नोंदविले गेले होते. २०२० मध्ये २९ एप्रिलला ४०.१ अंश सेल्सिअस तापमान होते. २०१९ मध्य २९ एप्रिल रोजी ४३ अंशांपर्यंत पारा चढला होता.

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत आहे. ७ व ८ एप्रिल रोजी शहरात ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेले १५ दिवस सातत्याने कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे राहिले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी (दि. १८) शहरातील कमाल तापमान ४१ व किमान तापमान २२ अंश राहण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी ४०/२२, २० व २१ एप्रिल रोजी ३९/२३ तर २२ एप्रिल रोजी ३९/२४ आणि २३ एप्रिल रोजी ३८ /२५ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे पाहता, पुढील दोन दिवस शहरात दिवसा वाढते तापमान राहणार असून, पुढे रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.