Water Closure | महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!

महापालिकेकडून गुरूवारी शहराच्या महत्वाच्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर,गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, पर्वती एमएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकरजलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने पाणी बंद असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा पाणी कमी दबाने सोडण्यात येणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग- 
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड,

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर,कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनिय स्कूल, कर्वेनगर गावठाण, कॅनॉल रस्ता परिसर

पॅनकार्ड क्‍लब जीएसआर टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्‍लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरन नगर, दत्त नगर

वारजे जीएसआर टाकी परिसर –  कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधामसोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11 , इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1ते 10

एस.एन.डी.टी. टाकी परिसर – गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, गोखले नगर मॉडेल कॉलनी संपूर्ण भाग, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटेरोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, कर्वेरोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी,

पर्वती टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर

चतुश्रुंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत,संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.

Water Cut | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणी राहणार बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी शहराच्या काही भागात पाणी राहणार बंद

महापालिकेकडून येत्या गुरूवारी (दि.21) रोजी तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी वडगाव जलशुध्दीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिग व वडगाव रॉ वॉटर केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

या भागात राहणार पाणी पुरवठा बंद


हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठरा, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक परिसर

Rain in Dams | पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही  | महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही

| महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणा मधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. तद्नंतर १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि  बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमित पणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक २६  जुलै नंतर पाणी  वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येऊन तो अलाहिदा कळवण्यात येईल, असे अनिरुद्ध पावसकर  मुख्य अभियंता  (पाणीपुरवठा), यांनी कळवले आहे.

| धरणात 7.74 TMC पाणी जमा

दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील 4 धरणामध्ये 7.74 tmc पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवसात 8.66 tmc पाणी होते. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणामध्ये दररोज 1 टीएमसी पाण्याची वाढ होत आहे. या पावसामुळे पुणेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी!

| महापालिका लवकरच निर्णय जाहीर करणार

पुणे | पावसाने ओढ दिल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पावसाची कुठलीच चिन्हे दिसेनात. त्यामुळे पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याचे नियोजन देखील महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. या आठवड्यापासूनच म्हणजे गुरुवार – शुक्रवार पासूनच एक दिवसाआड पाणी देण्याबाबत अमल करण्यात येणार आहे. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय भामा आसखेड आणि पवना धरणातून देखील पाणी घेतले जाते. शहर आणि समाविष्ट गावांना या धरणातून पाणी दिले जाते. शहराला महिन्याला 1.50 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा अभाव आहे. जून महिना संपत आला तरीही पाणीसाठा वाढलेला नाही. आहे तो पाणीसाठा नाममात्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात देखील अपुरा पाऊस असणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. यामुळेच महापालिका प्रशासन पाणीकपात करण्याचा निर्णय घेत आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आज बैठक होणार होती. मात्र ती होऊ शकली नाही. मात्र आयुक्तांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणी देण्याबाबत नियोजन सुरु केले आहे. शहरात पाणीपुरवठा विभागाचे तीन झोन आहेत. यामध्ये पर्वती, एसएनडीटी आणि लष्कर  विभागाचा समावेश आहे. या अंतर्गत येणाऱ्या परिसरात कशा प्रकारे एक दिवसाआड पाणी देण्यात येईल याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कारण काही परिसरात एक दिवसाआड पाणी देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. तिथे पाणी कमी कसे देता येईल. याचेही नियोजन सुरु आहे.
प्रशासनाच्या या नियोजनावर या आठवड्यातच अंमल करण्यात येणार आहे. लवकरच महापालिकेकडून याची घोषणा केली जाईल.

Pune City | Water Supply | गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

गुरूवार 2 जून रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार ३ जून रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)-
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपींग भाग :-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
चतु:श्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :-
भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर,जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
 • मुळा रोड, खडकी, MES, HE Factory,हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Water Cut | PMC | गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

गुरूवार दिनांक २६/०५/२०२२ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २७/०५/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)-
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपींग भाग :-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
चतु:श्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :-
भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर,जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
 • मुळा रोड, खडकी, MES, HE Factory,हरीगंगा
सोसायटी इत्यादी.

Water Cut : मेट्रोच्या कामामुळे पाण्याची लाईन खराब  : या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

मेट्रोच्या कामामुळे पाण्याची लाईन खराब

: या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

बुधवार  रोजी जलमंदीर तसेच ससुन लाईनवर अवलंबुन
असलेली पाण्याची लाईन मेट्रोचे काम चालु असल्याने ना-दुरुस्त झालेली आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. सदर लाईनवर अवलंबुन असलेल्या खालील भागांना दि.१२/०५/२०२२ रोजी पाणी येणार नाही. तसेच दि.१३/०५/२०२२ रोजी उशीरा व कमी दाबाने पाणी येईल.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग:-
घोरपडी, डीफेन्स, कॅम्प पुणे कॅन्टोमेंट, सोमवार पेठ, जुना बाजार परीसर, मंगळवार पेठ, कोरेगांव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन ससुन परीसर, पाटील इस्टेट वाकडेवाडी परीसर, शिवाजीनगर जुनी पोलीस लाईन परीसर, पुणे विद्यापीठ रस्ता परीसर.

Water cut : सिंहगड रोड, धानोरी, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणी बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

सिंहगड रोड, धानोरी, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणी बंद

गुरूवार रोजी वडगाव जलकेंद्र तसेच विमान नगर व धानोरी टाक्यावर अवलंबून असणारा भाग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे व टाक्यांचे अखत्यारीतील पुणे शहराचा काही भागाचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवार दिनांक ०६/०५/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

१) वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
२) भामा आसखेड प्रकल्प :-
i) विमाननगर टाकी परिसर :- संजय पार्क, संपूर्ण विमाननगर , म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुना नगर, दत्त मंदिर परिसर इ.
ii) धानोरी टाकी परिसर :- कमल पार्क, माधव नगर ,धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर,
सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क, इ.

Water Cut : गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
PMC social पुणे

औंध, बाणेर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम येत्या गुरुवारी (दि. २१) रोजी करण्यात येणार असल्याने औंध रस्ता, बोपोडी तसेच बाणेर परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :
औंध गावठाण परिसर, आय.टी.आय. रोड परिसर, स्पायसर कॉलेज परिसर औंध रोड, बोपोडी गावठाण, मुंबई – पुणे रोड, भोईटे वस्ती, सानेवाडी, आनंद पार्क, दर्शन पार्क परिसर, डी-मार्ट परिसर बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल दोन्ही बाजूचा परिसर, वर्षा पार्क, माउली मंगल कार्यालय परिसर.

Water cut : भामा आसखेड जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराचे पाणी रविवारी बंद 

Categories
PMC social पुणे

भामा आसखेड जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराचे पाणी रविवारी बंद

पुणे : भामा जलकेंद्र परिसरात तातडीचे आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार आहे. तसेच सोमवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
: पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
लोहगांव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी,  फुलेनगर, येरवडा इत्यादी