Water Supply Cut | पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

पुणे | रविवारी भामा आसखेड येथील विद्युत पुरवठा म.रा.वि.वि.कंपनीचे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी
उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील तसेच खराडी वितरण व्यवस्थेमधील दुरूस्तीच्या कामासाठी या अखत्यारीतील पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सोमवार दिनांक १२/०९/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, इत्यादी

Pune City | Water Supply | गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

गुरूवार 2 जून रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार ३ जून रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)-
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपींग भाग :-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
चतु:श्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :-
भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर,जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
 • मुळा रोड, खडकी, MES, HE Factory,हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Water Supply | काळजी करू नका | उद्या पाणीपुरवठा सुरळीत राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

काळजी करू नका | उद्या पाणीपुरवठा सुरळीत राहणार

गुरूवार दिनांक २६/०५/२०२२ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस. एन. डी. टी / वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे दि. २६/०५/२०२२ रोजी पाणीपुरवठा सुरळीत चालू राहणार आहे.

पाणी पुरवठा चालू असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र पंपींग भाग:-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क
ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :
– भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर,कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, बैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :- मुळा रोड, खडकी, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
तरी वरील भागाचा पाणीपुरवठा दि. २६/०५/२०२२ रोजी सुरळीत चालू राहणार आहे.

Mulshi Dam | Pune | Water supply | मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न! 

Categories
Breaking News PMC social पुणे

मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न!

: 5 महिने उलटूनही पाटबंधारे विभागाकडून काही हालचाल नाही

पुणे.  पुणे शहराच्या लोकसंख्येनुसार शहराला  पाणीपुरवठ्यासाठी मिळालेले पाणी अपुरे आहे.  शहराची 18.58 टीएमसी पाण्याची गरज आहे.  त्यातच आता 34 गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला आहे.  शहराला सध्या 14.48 टीएमसी पाण्याची परवानगी असली तरी आगामी काळातील पाण्याची गरज पाहता मुळशी जलाशयातून पालिकेला पाच टीएमसी पाणी मिळणे गरजेचे झाले आहे.  त्यानुसार महापालिका मुख्य सभेने प्रस्ताव मान्य करून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाकडे पाठवला आहे. मात्र गेल्या 5-6 महिन्यापासून पाटबंधारे विभागाने याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पुण्याला मुळशी धरणातून पाणी मिळणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे, असे म्हटले जात आहे. याकडे पालकमंत्री अजित पवार यांनीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

 34 गावांचा समावेश झाल्याने पाण्याची गरज वाढणार

पुणे महानगरपालिका पुणे शहराला तसेच ५ किमीच्या परिघात येणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करते.  त्यासाठी महापालिका खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.  या 4 धरणांमधून नगरपालिकेकडून 11.50 टीएमसी पाणी मंजूर आहे.  गेल्या वर्षीपासून भामाखेड धरणातून २.६४ टीएमसी पाण्याची आवक होत आहे.  तसेच पवना धरणातून ०.३४ टीएमसी पाण्याची आवक होत आहे.  सध्या एकूण 14.48 टीएमसी पाण्याची आवक होत आहे.  मात्र प्रत्यक्षात पुण्याची गरज १८.५८ टीएमसी आहे.  तसेच नुकतेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार 34 गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे.  या गावांची लोकसंख्या १० लाखांपर्यंत आहे.  त्यामुळे त्याचा बोजा पालिकेवर पडणार आहे.  त्यामुळे पालिकेला अतिरिक्त पाण्याची गरज आहे.

 2005 पासून पाण्याचा कोटा वाढलेला नाही

  खडकवासला प्रकल्पातून शहरासह जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो.  2005 मध्ये खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी 11.50 टीएमसी पाण्याचा कोटा शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजूर केला होता.  त्यानंतर शहराला तेवढेच पाणी मिळत आहे.  शहराची लोकसंख्या वाढत असताना.  यासोबतच महानगरपालिका हद्दीत गावांचाही समावेश करण्यात येत आहे.  त्यामुळे पालिकेकडून वाढीव पाण्याची मागणी सातत्याने होत होती.  मात्र पाण्याचा कोटा वाढविण्यात आलेला नाही.  त्यामुळे पालिकेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे आता पुणे शहरासाठी पाण्याचा तिसरा स्त्रोत उपलब्ध होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.  खडकवासला व भामासखेडला पूर्वीचे पाणी येत आहे.  मुळशीतून 5 टीएमसी पाणी मिळाले तर, शहर व परिसरातील गावांची पाण्याची तहान भागणार आहे.

 – 2031 मध्ये 23 टीएमसी पाणी वापरले जाईल

 महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार लोकसंख्या वाढली की त्यानुसार पाण्याची गरजही वाढणार आहे.  त्यामुळे प्रशासनाने पाण्याची गरज पाहून पाण्यासंबंधीचे प्रस्ताव तयार केले आहेत.  यामध्ये 2021-22 साठी 20.07 टीएमसी आणि 2031-32 साठी 23.34 टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  कारण राखीव पाण्यापेक्षा जास्त पाणी घेतल्यास पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या दुप्पट दर आकारला जातो.  त्याचा बोजा पालिकेवरच पडतो.  त्यामुळे सद्यस्थितीत मुळशीला पाच टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे.  हे पाणी उपलब्ध झाल्यास टंचाईच्या काळात शहरावर जलसंकट निर्माण होणार नाही, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यानुसार महापालिका मुख्य सभेने प्रस्ताव मान्य करून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाकडे पाठवला आहे. मात्र गेल्या 5-6 महिन्यापासून पाटबंधारे विभागाने याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पुण्याला मुळशी धरणातून पाणी मिळणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे, असे म्हटले जात आहे. याकडे पालकमंत्री अजित पवार यांनीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.