Hearing : Objections : Ward Structure : प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

: बालगंधर्व रंगमंदिरात पूर्ण होणार प्रक्रिया 

पुणे- महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता ही सुनावणी दि. 24 आणि 25 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पहिल्यांदा एकच दिवस सुनावणीसाठी देण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सुनावणीसाठी सर्व हरकतदारांना नोटीस देऊन ठिकाण आणि वेळ कळविण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

प्रभाग रचनेवर सुमारे 3 हजार 596 हरकती आल्या आहेत. सुनावणींसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती.

 

तर 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती घेण्याची मुदत होती. तर, यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल महापालिकेस 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर करायचा आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

हरकतींचे स्वरूप एकाच प्रकारचे असल्यास एकत्र गटाने सुनावणी घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय एक प्रकारच्या हरकतींचे गट तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, मनपा प्रशासनाने सुनावणीसाठी यापूर्वी एकच दिवस निश्‍चित केला होता. मात्र, हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस ही सुनावणी होणार आहे.

Leave a Reply