7th pay commission: PMC: महापालिका कर्मचाऱ्यांना डिसेंबर मध्ये वाढीव वेतन! : प्रशासनाचा प्रस्ताव आयुक्तांसमोर

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिका कर्मचाऱ्यांना डिसेंबर मध्ये वाढीव वेतन!

: सातव्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ

: प्रशासनाचा प्रस्ताव आयुक्तांसमोर

पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने वेतन निश्चितीकरणाचे काम सुरु केले होते.  या कामास गती देण्यासाठी व लवकरात लवकर मनपा कर्मचाऱ्यांना याचा  लाभ व्हावा या हेतूने वेतन आयोगाच्या कामासाठी ६७ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज यासाठी देण्यात आली होता. त्यानुसार हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ नोव्हेंबर पेड इन डिसेंबर  देण्याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर ठेवला आहे. आयुक्तांची सही झाल्यानंतर तात्काळ परिपत्रक काढले जाईल. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा संपली असून त्यांना आता दिलासा मिळाला आहे.

: लवकरच परिपत्रक होणार जारी

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रस्ताव बरेच दिवस महापालिका आणि पुन्हा राज्य सरकारकडे पडून होता. अखेर सप्टेंबर  महिन्यात वेतन आयोग राज्य सरकारकडून लागू करण्यात आला आहे. आयोगाला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याबाबत कुठलीही हालचाल करण्यात आलेली नव्हती. कारण आयोगाला मंजुरी देताना सरकारने उपायुक्त आणि शिपाई यांचे वेतन त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी केले आहे. मात्र त्यामुळे याला उशीर होत होता. याबाबत  स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनतर  वेतन निश्चितीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. नंतर या कामास गती देण्यात आली होती. आता हे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा लाभ नोव्हेंबर पेड इन डिसेंबर  देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर ठेवला आहे. आयुक्तांची सही झाल्यानंतर तात्काळ परिपत्रक काढले जाईल. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे.

: कोविड भत्याचा देखील मिळणार लाभ

 महापलिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोनस देण्याबाबत मुख्य सभेने नुकतीच मान्यता दिली होती. यंदा मात्र बोनस सोबत ३ हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता देण्यासही मुख्य सभेने मान्यता दिली आहे. बोनस चा लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. आता कोविड भत्ता मात्र डिसेंबर महिन्यात मिळेल. हा भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनात देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना लवकरच ही रक्कम मिळेल.

Leave a Reply