Pune congress | Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका गटाची प्रदेश पदाधिकाऱ्या सोबत गुप्त बैठक! 

Categories
Breaking News Political पुणे

Pune congress | Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका गटाची प्रदेश पदाधिकाऱ्या सोबत गुप्त बैठक!

| पुणे काँग्रेसला लागलेले गटबाजीचे ग्रहण सुटेना

Pune congress | Pune Loksabha 2024 |  पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून काँग्रेसच्या एका गटाने गुप्त बैठकीचे आयोजन केले आहे. २४ जानेवारीला पुण्यातील घरकुल लॉन्स येथे शहर व जिल्ह्यातील काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदेश पदाधिकारी घेणार आढावा आहेत. विशेष म्हणजे 23 जानेवारीला पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस ची विभागीय बैठक पुणे काँग्रेस भवन मध्ये होणार आहे. मात्र यामुळे हे सिद्ध होत आहे कि काँग्रेसला लागलेले गटबाजीचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. यामुळे भाजपचा विजय आणखी जवळ येत आहे. काँग्रेसने गटबाजी सोडून एकत्र होण्याची हीच वेळ आहे. (Pune congress | Pune Loksabha 2024)

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) कांग्रेस ने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस कडून (Pune City Congress) मागवण्यात आले होते. त्यासाठी 9 जानेवारी ची  मुदत देण्यात आली होती. या कालावधीत शहर कार्यालयाकडे बऱ्याच इच्छुक लोकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये जवळपास 20 उमेदवारानी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा दर्शवली आहे.  यामध्ये बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी,  शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आबा बागुल, आमदार रविंद्र धंगेकर, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे,  यांच्यासह 20 लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आरजे संग्राम खोपडे यांचा देखील समावेश आहे. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)

प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपला (BJP) या निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेस (Congress) ने कंबर कसली आहे. खासकरून पुणे शहरावर काँग्रेसने (Pune City Congress) चांगलेच लक्ष दिले आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदार संघ (Pune Lok Sabha Constituency) समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान पुणे काँग्रेस मधील गटबाजी सर्वपरिचित आहेच. त्यात अजून भर पडत आहे. शहर अध्यक्ष यांचा वेगळा गट आणि त्यांना विरोध करणारा वेगळा गट, अशी ही लढाई आहे. दरम्यान आमदार रविंद्र धंगेकर यांच्या दिल्ली वारीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता काँग्रेस मध्ये गुप्त बैठक होणार आहे. याची खबर दुसऱ्या गटाला लागली आहे. त्यामुळे हा गट आता शांत बसणार नाही. मात्र या गटबाजीमुळे काँग्रेस ही निवडणूक अजून कठीण करेल आणि भाजपचा विजयाचा मार्ग जवळ येईल. त्यामुळे सर्व गटबाजी विसरून या लोकसभेसाठी एकत्र येण्याची काँग्रेस साठी हीच योग्य वेळ आहे. मात्र पुणे काँग्रेस आणि पदाधिकारी यातून काही धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

 

     Congress Meeting | Pune | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची (AICC) हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्देशानुसार आज काँग्रेस भवन, पुणे (Pune Congress Bhavan) येथे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस प्रातांध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले (Nana Patole) , माजी केंद्रीय मंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्‍हाण, प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील मुरूमकर, मा. आ. प्रणितीताई शिंदे, मा. आ. डॉ. विश्वजीत कदम, मा. आ. संग्राम थोपटे, प्रदेश महिला अध्यक्षा मा. संध्याताई सव्‍वालाखे आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरूवात ‘काँग्रेस पक्षाचा इतिहास’ व ‘भारत जोडा’ यात्रेच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करून करण्यात आली. या छायाचित्र प्रदर्शनाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केले होते आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचे संपूर्ण नियोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले होते. 

     प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान या बैठकीविषयी माहिती दिली. संपूर्ण राज्यात विभागीय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे. या बैठकांमधून काँग्रेस पक्ष संघटनात्मक मजबुतीने लोकांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे आणि सध्याच्या अत्याचारी सरकारचा खरा चेहरा लोकांपुढे आणणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय, महागाई, बेरोजगारी, गरीबांवरील अन्याय यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कथनी व करणीतील फरक जनतेच्या निर्देशनास आणणार आहे. राज्यातील हे सरकार शेतकरी, गरीब जनता, तरूण, बेरोजगार यांच्या विरोधातील आहे. हे सेल्फीश सरकार आहे. सुप्रिम कोर्टानेही सरकारचा खरा चेहरा उघडा केला आहे. काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ असूनही हे सरकार दुष्काळ जाहिर करत  नाही. 

    नांदेड व ठाणे येथील सरकारी रूग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहूणही सरकारला जाग येत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्राचा डोळामुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे.

     काँग्रेस जनतेसाठी लढत आहे. शाहू – फुले – आंबेडकर विचारांना वाचविण्याचे काम तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनीही एकजूटीने काम करावे. या बैठकीमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, सांगली शहर, सांगली ग्रामीण, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर आदी जिल्हांचा आढावा घेऊन बुथ कमिट्या, ब्लॉक कार्यकारिणी व संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. 

     यावेळी जिल्ह्याचे प्रभारी/सहप्रभारी, प्रदेश पदाधिकारी, आजी माजी आमदार, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना, विभाग व सेल अध्यक्ष, बुथ कमिटी सदस्य आदी उपस्थित होते. 

Pune Congress Block President | पुणे काँग्रेस कडून 10 वर्षांपासून रखडलेल्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress Block President | पुणे काँग्रेस कडून 10 वर्षांपासून रखडलेल्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

| आगामी निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश

Pune Congress Block President | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (INC Maharashtra) कमिटीच्या आदेशान्वये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (INC pune) वतीने आज काँग्रेस भवन (Congress Bhavan Pune) येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांना (Block President) नियुक्तीची पत्र काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. (Pune Congress Block President)

      येरवडा ब्लॉक – रमेश सकट, मार्केट यार्ड ब्लॉक – रमेश सोनकांबळे, भवानी ब्लॉक – सुजित यादव, पुणे कॅन्टोमेंन्ट – आसिफ शेख, शिवाजीनगर ब्लॉक – अजित जाधव, पर्वती ब्लॉक – संतोष पाटोळे, हडपसर ब्लॉक – बळिराम डोळे, बोपोडी ब्लॉक – विशाल जाधव, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक – हेमंत राजभोज, कोथरूड ब्लॉक – रविंद्र माझीरे, कसबा ब्लॉक – अक्षय माने आदींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.

      यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘गेल्या ८ ते १० वर्षांपासून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. जयपूर अधिवेशनामध्ये ५ वर्षांपेक्षा अधिक पदांवर असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होऊन नविन पदाधिकारी नेमणुकीचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता. त्यानुसार आज काँग्रेस भवन येथे ह्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सर्व नवनियुक्त अध्यक्षांकडून आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी असल्याचे शहराध्यक्षांनी यावेळी सांगितले तसेच आपापल्या ब्लॉकमध्ये नवीन मतदार नोंदणी, दुरूस्ती अभियान व पक्षाच्या बैठकांचे आयोजन करण्याचे आदेश दिले.’’

      सदर कार्यक्रमांप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, लता राजगुरू, दत्ता बहिरट, संगीता तिवारी, कमल व्‍यवहारे, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार आदी मान्यवरांसोबत सर्व जुने ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——

News Title | Pune Congress Block President | Appointments of block presidents stalled for 10 years by Pune Congress

Arvind Shinde | भवन रचना विभागाकडील टेंडर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करू नये | काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची आयुक्ताकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

 भवन रचना विभागाकडील टेंडर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करू नये

| काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची आयुक्ताकडे मागणी

पुणे | भवन रचना विभागातील टेंडरप्रक्रिया माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून प्रशासनाला वेठीस धरणारे कार्यकर्ते, काही राजकीय पदाधिकारी यांच्या मुळे बेसुमार लांबणीवर जात आहे. असा आरोप काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसेच नियमात बसणारी टेंडर प्रक्रिया रद्द करू नये. अशी मागणी शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
    शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार काही ठेकेदार रिंग पद्धतीने काम मिळवण्यासाठी अश्या स्वयं घोषित समाजसेवकांना सुपारी देतात. असे समाजसेवक मर्जीतल्या हितसंबंधी ठेकेदारास काम न मिळाल्यास जबाबदार लोकप्रतिनिधी चे कडून टेंडर प्रक्रिया रद्द करून फेर टेंडर काढण्याची मागणी करतात. या गोंधळात विकासकामे अकारण लांबतात ही वस्तुस्थिती आहे . मनपाच्या प्रचलित पद्धतीने दक्षता विभागाच्या देखरेखीखाली निविदा प्रक्रिया राबविणे ही मनपाच्या आर्थिक हिताची बाब असून कोणत्याही परिस्थितीत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व स्वयंघोषित समाजसेवकांच्या दबावाखाली नियम अटी मध्ये बसणारी रीतसर टेंडर प्रक्रिया रद्दबातल करू नये.
            या प्रकरणी कायदेशीर बाबी यांचे पालन करणाऱ्या निविदाआर्थिक संगनमताने  रद्द केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल. असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Arvind Shinde | pune congress | तुमचे फक्त ६ महिने मला द्या | स्वबळाचा नारा देत अरविंद शिंदेनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जागवली ऊर्जा 

Categories
Breaking News Political पुणे

महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभे करण्याचे काँग्रेसचे नियोजन

| स्वबळाचा नारा देत अरविंद शिंदेनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जागवली ऊर्जा

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानुसार काँग्रेस येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभा करणार आहे. तसे नियोजन देखील पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी 6 महिने पक्षासाठी सर्वस्व अर्पण करत मेहनत करा, अशी अपेक्षा अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली आहे.
https://youtu.be/gdamQK9ampw

| काँग्रेस ने घेतली आघाडी

राज्यातील राजकीय घडामोडी कडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यामुळे महापालिका निवडणुकीचा विषय मागेच पडला होता. सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा निवडणुकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कारण महाविकास आघाडी सरकार कोसळून आता भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरु करण्यात काँग्रेस ने आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस ने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. तसेच प्रभारी अध्यक्ष झाल्यानंतर देखील अरविंद शिंदे यांना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शिंदे यांनी बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेण्यात आल्या.

| पक्षासाठी आगामी 6 महिने सर्वस्व अर्पण करा

महापालिका निवडणुकीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केल्या कि आता महाविकास आघाडी सरकार नाही, त्यामुळे आपल्याला चांगला जोर लावावा लागणार आहे. तसेच मतदार याद्याबाबत देखील तक्रारी सांगितल्या. पदाधिकाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या नियोजनाबाबत सूचना केल्या. त्यावर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आपण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभा करणार आहोत. तसे नियोजन देखील पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी 6 महिने पक्षासाठी सर्वस्व अर्पण करत मेहनत करा, अशी अपेक्षा अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान शिंदे यांनी पदावर आल्यानंतर आजी माजी लोकांना एकत्र करत सुसंवाद साधल्याने आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत. शिवाय महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची असल्याने देखील कार्यकर्ते खुश आहेत. कारण या अगोदर नेहमी आघाडी होत असल्याने काही जागांवर पाणी सोडावे लागत होते. मात्र आता संधी मिळण्याची आशा असल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच समाधानी झाले आहेत.