Tag: IAS Sachindra Pratap Singh
PMPML CMD | पीएमपीचे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली | पुण्यात असणाराच अधिकारी नवीन सीएमडी
| संजय कोलते नवे सीएमडी
PMPML CMD | पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा सीएमडी सचिंद्र प्रताप सिंह (IAS Sachindra Pratap Singh) यांची बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त (Divyang Welfare Commissioner) पुणे या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील एस जी कोलते (IAS S G Kolte) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कोलते (CEO Smart City) हे सद्यस्थितीत पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे दोन्ही पदभार असणार आहेत. (PMPML Pune)
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अपर मुख्य सचिव नितीन गद्रे (IAS Nitin Gadre) यांनी या संदर्भातील आदेश सोमवारी काढले आहेत. ओम प्रकाश बकोरिया (IAS Omprakash Bakoria) यांच्यानंतर सिंह यांनी नुकताच पी एम पी सीएमडी पदाचा पदभार स्वीकारला होता. तीन महिन्यातच त्यांची बदली झाली आहे. त्यांनी त्यांच्या काळात गेले पी एम पी एम एल मध्ये यूपीआय क्यूआर कोड तिकीट यंत्रणा सुरू केली. पुणेकरांना जास्तीत जास्त गाड्या मिळाव्या यासाठी ताफ्यातील सर्व गाड्या त्यांनी मार्गावर काढल्या होत्या. परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होत होती. लवकरच पीएमपीच्या मालमत्तांचे विकसन करून पीएमपीच्या उत्पन्नात आणखीन वाढ करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र इतक्यातच त्यांची बदली झाली. शिवाय थोड्या अवधीत शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची पीएमपी आणि पुणे शहरात ओळख झाली होती.
दरम्यान संजय कोलते हे पीएमपी चे नवे सीएमडी असतील. सद्यस्थितीत कोलते हे पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. कोलते यांच्याकडे दोन्ही पदाची जबाबदारी असणार आहे. पीएमपी आणि पुणे महापालिका यांच्याशी संबंधित पीएमपी आहे. त्यामुळे कोलते यांना पीएमपी ची आणि शहराची आधीच पूर्ण माहिती आहे. त्यामुळे पीएमपी चा कारभार करणे कोलते यांना सोईचे जाणार आहे. असे बोलले जात आहे.
—-
——
PMP Pass Payment by QR Code | नागरिकांना पीएमपीच्या पास साठी आता क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार
| पीएमपी कडून उद्यापासून सुविधा सुरु करण्यात येणार
PMP Pass Payment by QR Code |पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून (PMPML Pass Centers) विविध प्रकारच्या पासेसची विक्री केली जाते. महामंडळास महिन्यातून सरासरी पास विक्रीतून ५ कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त होत असते तर सरासरी ६० हजार पासची विक्री होत असते. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह (PMPML CMD Sachhindra Pratap Singh) यांच्या संकल्पनेतून सोमवार पासुन महामंडळाच्या सर्व ४० पास केंद्रावर प्रवाशी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. (PMPML Pune)
पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये १ ऑक्टोबर २०२३ पासुन सर्व बसेस मध्ये ई – तिकीट मशीन मध्ये तिकीट काढून कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्याला प्रवासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून दि. १ ऑक्टोबर २०२३ ते दि. २० ऑक्टोबर २०२३ याकालावधीत महामंडळाला रक्कम रुपये १९,४९,४००/- इतके उत्पन्न मिळाले
असून ७३,७२८ तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. तर ८९,३६८ प्रवाशांनी कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) तिकीट काढली आहेत. (PMP Pass)
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विक्रम कुमार यांच्या शुभहस्ते व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी शुभारंभ होणार आहे. तरी पास काढण्यासाठी सर्व नागरिकांनी कॅशलेस सुविधेचा वापर करून पेमेंट करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन
महामंडळाकडून करण्यात येत आहे.
या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट
1. पास केंद्रावरील सेवकास ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
2. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
3. पास केंद्रावरील सेवकांकडून पास प्राप्त करणे.
PMPML Employees Diwali Bonus | PMC आणि PCMC प्रमाणे PMPML च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 8.33% सानुग्रह अनुदान आणि 21000 बक्षीस
PMPML Employees Diwali Bonus | पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे (PMC and PCMC) दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना (PMPML Employees) सानुग्रह अनुदान (Bonus) व बक्षिस रक्कम दिली जाते. त्याप्रमाणे यावर्षी देखील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाच्या (Director Body Meeting) आजच्या ठरावाच्या मान्यतेनेमूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३٪ प्रमाणे सानुग्रह अनुदान व रूपये २१,०००/- इतकी बक्षिस रक्कम दिवाळीपूर्वी (Diwali Bonus) अदा करण्यात येणार आहे. (PMPML Employees Diwali Bonus)
सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करणेत येणार आहे. सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम जाहीर झाल्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
———-—————-
“पीएमपीएमएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या ३ महिन्यांत जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ होवून प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षिस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.“
– सचिन्द्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
——