PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका |  कामगार नेते सुनील शिंदे 

PMC Contract Employees Bonus | कामगार उपायुक्तांची कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांना (Contractors) काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी केली आहे. (PMC Pune)

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनेकदा मागणी करूनही बोनस देण्यात येत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी पासून आमरण उपोषण आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर सुरू केले. या आंदोलनाची दखल घेऊन कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथील सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना पेमेंट ऑफ  बोनस ऍक्ट हा कायदा लागू होतो.  त्याप्रमाणे बोनस अदा करण्याचे आदेश मनपा व संबंधित कंत्राटदारांना दिले. या आदेशाप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील मुख्य कामगार सल्लागार यांनी पुणे मनपा मधील सर्व कंत्राटदारांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना  दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याचे आदेश दिनांक 3/11/2023 रोजी दिले. परंतु अद्याप पर्यंत सदर आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे. त्याचप्रमाणे कांत्राटी कामगार अधिनियम व पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट या दोन्ही कायद्याचे उल्लंघन मनपाच्या कंत्राटदारांकडून झालेले आहे. त्यामुळे अशा सर्व कंत्राटदारांवर आपण म्हणजेच पुणे महानगरपालिकेने कारवाई करावी, त्यांना काळे यादीत टाकावे व अशा कंत्राटदारांना पुन्हा महानगरपालिकेमध्ये कंत्राट देऊ नये. अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार साहेब यांच्याकडे केली आहे.

PMC Contract Employees Bonus | मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर | ठेकेदारांनी बोनस अदा करण्याचे कामगार उपायुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | मनपाच्या कंत्राटी कामगारांना  दिवाळी बोनस जाहीर | ठेकेदारांनी बोनस अदा करण्याचे कामगार उपायुक्तांचे आदेश

| सुनील शिंदेच्या आमरण उपोषणाला यश

PMC Contract Employees Bonus | पुणे | बोनस अधिनियमाच्या तरतुदीनुसार महापालिकेच्या कंत्राटी कामगाराना बोनस देणे ठेकेदारावर बंधनकारक आहे. त्यानुसार ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे आदेश कामगार उपायुक्त यांनी दिले आहेत. तसे पत्र कामगार उपयुक्तानी महापालिका आयुक्तांना दिले आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय कामगार नेते सुनील शिंदे यांनी देखील आपले आमरण उपोषण माघारी घेतले आहे. (Diwali Bonus News)
पुणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते म्हणजे पुणे मनपाचे साफसफाई, वेहिकल डेपो, स्मशानभूमी, कीटकनाशक, सुरक्षारक्षक, आरोग्यविभाग, पाणीपुरवठा, गार्डन अशा विविध खात्यातील सुमारे 10,000  कंत्राटी कर्मचारी.
हे सर्व अदृश्य हात राबतात त्यामुळेच पुणे शहरातील नागरिकांचे आयुष्य हे निरोगी राहत पण विरोधाभास असा की या सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन, युनिफॉर्म, सामाजिक सुरक्षा वेळेवर भेटत नाही किंवा भेटतच नाही. गेली 2 वर्ष राष्ट्रीय मजदूर संघटने मार्फत
सातत्याने कामगार उपायुक्त कार्यालय पुणे व पुणे मनपा प्रशासनाचा कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनस बाबत पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नव्हते. कंत्राटी कामगार अधिनियम 1971 नुसार दिवाळी बोनस
हक्काच असूनही मिळत नाही यासाठीच राष्ट्रीय मजदूर संघटने (RMS) मार्फत सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर गेले 3 दिवस चालू होते.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला व प्रश्न समजावून घेतले या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व इन्स्पेक्टर पाठवून प्रकरणाची चौकशी केली. यानंतर अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व माधव जगताप तसेच मुख्य  कामगार अधिकारी  नितीन केंजळे यांच्या सोबत बैठक झाली असता कामगार उपायुक्ता कडून कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याबाबत पत्र आणण्यास सांगितले. त्यानुसार कामगार उपायुक्ता कडून पत्र मिळाल्यानंतर मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी बोनस ॲक्ट नुसार ठेकदारांनी दिवाळी पूर्वी बोनस द्यावा अस लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदेंनी यांना दिलं. तसेच ठेकेदाराकडून बोनस देण्यास विलंब झाल्यास पुणे मनपा प्रशासन ठेकेदाराला उसने पैसे देऊन कामगारांना बोनस देतील असे आश्वासन दिले.
गेली 10 वर्ष कंत्राटी कामगारांना बोनस मिळत नव्हता संघटनेच्या लढ्यामुळे व कामगारांच्या एकाजुटीमुळे हा एतिहासिक निर्णय झाला असे राष्ट्रीय मजदुर संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपोषण सोडताना सांगितले.
यानंतर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आमरण उपोषण सुरक्षा अधिकारी केंजळे व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  अरविंद शिंदे यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडलं.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  अरविंद शिंदे यांच्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचा प्रश्न हा लवकर मार्गी लागला. यावेळी कामगार एकजुटीची गाणी, तसेच बोनस आमच्या हक्काचा, आमचाच लढा न्यायासाठी अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस के पळसे त्याचबरोबर संघटनेचे विविध कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

DA Hike in January 2024 | जानेवारीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% नव्हे तर 51% वर पोहोचेल!

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

DA Hike in January 2024 | जानेवारीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% नव्हे तर 51% वर पोहोचेल!

 DA Calculator January 2024 | 1 जुलै 2023 पासून, महागाई भत्ता 46 टक्के करण्यात आला आहे.  यानंतर जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाईल.  ही पुनरावृत्ती आजपर्यंतची सर्वात मोठी पुनरावृत्ती असू शकते. (7th Pay Commission)
 DA Calculator January 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) अलीकडेच सणासुदीच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.  दिवाळीपूर्वी बोनस (Diwali Bonus), महागाई भत्त्यात वाढ (DA Hike), तीन महिन्यांची थकबाकी, हे सर्व मिळाल्याने कर्मचारी खूश आहेत.  पण, येणारे नवीन वर्ष त्यांच्यासाठी आणखी चांगली भेट घेऊन येणार आहे.  विशेषत: महागाई भत्त्याच्या आघाडीवर, चांगली बातमी येण्याची वाट पाहत आहे.  १ जुलै २०२३ पासून महागाई भत्ता (Dearness Allowance) ४६ टक्के करण्यात आला आहे.  यानंतर जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाईल.  ही पुनरावृत्ती आजपर्यंतची सर्वात मोठी पुनरावृत्ती असू शकते. (7th Pay Commission)

 महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढू शकतो का?

 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२४ हे वर्ष अनेक अर्थाने महत्त्वाचे असणार आहे.  नव्या वेतन आयोगाबाबत काही ठोस चर्चा होऊ शकते.  तसेच, महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांच्या वर जाऊ शकतो.  त्याच वेळी, जर आपण ट्रेंड पाहिला तर, गेल्या 4 वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  पण, त्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते.  महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी ५ टक्के वाढ होऊ शकते.

 AICPI निर्देशांक DA चा स्कोअर ठरवेल

 5 टक्के वाढ खरोखरच निश्चित आहे का?  सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.  असे झाल्यास ५ टक्क्यांची मोठी झेप होईल.  महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकावरून मोजला जातो.  निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते.

 सध्याची परिस्थिती काय आहे?

 जर आपण सद्यस्थितीवर नजर टाकली तर, जुलै आणि ऑगस्टसाठी AICPI निर्देशांक जाहीर झाले आहेत.  लवकरच सप्टेंबर महिन्याची आकडेवारीही समोर येईल.  सध्या निर्देशांक 139.2 अंकांवर आहे, ज्यामुळे महागाई भत्ता 47.98 टक्क्यांवर पोहोचला आहे.  सप्टेंबरमध्ये हा आकडा 48.50 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे.  यानंतर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डेटा जानेवारी 2024 मध्ये किती DA वाढेल हे ठरवेल.  तथापि, यासाठी आम्हाला डिसेंबर २०२३ च्या AICPI निर्देशांकांची प्रतीक्षा करावी लागेल.

 महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार

 7 व्या वेतन आयोगांतर्गत, AICPI क्रमांक जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ठरवतील.  महागाई भत्ता जवळपास 48 टक्क्यांवर पोहोचला आहे.  चार महिन्यांचा आकडा अजून यायचा आहे.  त्यात आणखी ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ दिसू शकते.  महागाई भत्ता कॅल्क्युलेटर (DA कॅल्क्युलेटर) उर्वरित महिन्यांत 1 पॉइंटची वाढ दाखवत आहे, त्यामुळे महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

PMPML Employees Diwali Bonus | PMC आणि PCMC प्रमाणे PMPML च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 8.33% सानुग्रह अनुदान आणि 21000 बक्षीस

Categories
Breaking News PMC social पुणे

PMPML Employees Diwali Bonus | PMC आणि PCMC प्रमाणे PMPML च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 8.33% सानुग्रह अनुदान आणि 21000 बक्षीस

 

PMPML Employees Diwali Bonus | पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे (PMC and PCMC) दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना (PMPML Employees) सानुग्रह अनुदान (Bonus) व बक्षिस रक्कम दिली जाते. त्याप्रमाणे यावर्षी देखील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना  संचालक मंडळाच्या (Director Body Meeting) आजच्या ठरावाच्या मान्यतेनेमूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३٪ प्रमाणे सानुग्रह अनुदान व रूपये २१,०००/- इतकी बक्षिस रक्कम दिवाळीपूर्वी (Diwali Bonus) अदा करण्यात येणार आहे. (PMPML Employees Diwali Bonus) 

सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी  जमा करणेत येणार आहे. सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम जाहीर झाल्यामुळे  पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

———-—————-

पीएमपीएमएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या ३ महिन्यांत जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ होवून प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोतयापुढील काळातही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेतपीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षिस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

   

 –  सचिन्द्र प्रताप सिंहअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

——

PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण

 

PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde |आम्हीही पुणे मनपा (Pune Municipal Corporation)  प्रशासनाचे कामगार आहोत. आम्हालाही कामगार कायद्यानुसार (Labor Law) आमच्या सामाजिक सुरक्षा, कामगाराचे हक्क का भेटत नाही. असा प्रश्न कामगार नेते राष्ट्रीय मजदूर संघाचे(RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचे अध्यक्ष कामगार सुनील शिंदे (Sunil Shinde)  यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार आमरण उपोषणाला बसतील असा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला. (PMC Pune Contract Employees Bonus Agitation)

निमित्त होते मनपा मुख्य प्रवेशद्वारावर आयोजित इशारा आंदोलनाचे. हे आंदोलन मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वा झाले. गेल्या वर्षभरात कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याबाबत संघटनेने दिलेला लढा, प्रशासन करत असलेली या बाबतची दिरंगाई याबाबत माहिती या आंदोलनावेळी केली. कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या एवढा बोनस मिळालाच पाहिजे, ठेकेदार बदलला तरी कामगार तेच राहिलेच पाहिजे, कंत्राटी कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळालीच पाहिजे,
कंत्राटी कामगारांना कायम कामगारां येवढेच वेतन व सवलती मिळाल्याच पाहिजेत या आंदोलनाच्या मागण्या होत्या. पाऊस असो की उन आम्ही बोनस घेतल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शेवटी सर्व कामगारांनी केला. (PMC Pune)

जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचे अध्यक्ष कामगार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार आमरण उपोषणाला बसतील असा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, प्रतिनिधी विजय पांडव, सरिता धुळेकर, गोरखनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.
तसेच पगार 10 तारखेनंतर मिळाला पाहिजे हा नियम असतानाही न मिळणारा पगार, पगाराची स्लीप, युनिफॉर्म, वेळेवर जमा न होणारा PF अशा अनेक मुद्यांवरचे प्रश्न उपस्थित कामगारांनी उपस्थित केले. आभाळाची आम्ही लेकरे, सवालाचा जवाब दे रे मनपाच्या प्रशासना ही गाणी तसेच बोनस आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीचा, ठेकेदार व अधिकाऱ्याचं नातं काय होऊ द्या चर्चा या घोषणा ही यावेळी घेण्यात आल्या. (Rashtriya Majdur Sangh)

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी | 8.33% + 21000 सानुग्रह अनुदान

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी |  8.33% + 21000 सानुग्रह अनुदान

| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळीची लवकर भेट

PMC Employees Diwali Bonus | पुणे |  महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) दिवाळी बोनस (Diwali Bonus) अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. यंदा कर्मचाऱ्यांना च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर 8.33% + 21,000 इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.  वित्त व लेखा विभागाने (PMC Chief Account and Finance Department) बोनस बाबतचे परिपत्रक (Bonus Circular) जारी केले असून सर्व खात्यांना त्यानुसार सूचना केल्या आहेत. 30 ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान दरवर्षी दिवाळी तोंडावर आल्यावर परिपत्रक काढले जाते. मात्र यंदा महिनाभर आधीच परिपत्रक काढून प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. (PMC Pune Diwali Bonus Circular)

| काय आहे परिपत्रकात?

1. पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक 2022-23 च्या मुळ वेतन + महागाई भत्ता यावर 8.33% + 21000 रु सानुग्रह अनुदान उपस्थितीतिच्या प्रमाणात अदा करायचे आहे. (Pune Municipal Corporation)
2. ज्या वर्षा करीता सानुग्रह अनुदान द्यावयाचे त्या वर्षांमध्ये संबंधीत सेवकांची (घाण भत्ता देय असणाऱ्या सेवकांसह) कामावरील प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असण्याची अट लागू राहील. तथापि फक्त कामावर असताना व काम करित असताना घडलेल्या अपघातामुळे विशेष वैद्यकिय रजा एखाद्या सेवकांस द्यावी लागल्यास अशी रजा मनपा सेवाविनियमाच्या
मर्यादित हजेरी धरण्यात येईल.
३. किमान एक वर्ष शासकिय सेवा झालेल्या सेवकांची त्यापुढील आर्थिक वर्षातील हजेरी विचारात घेऊनच सानुग्रह अनुदान देय राहील.
४. 2022-23 साठी द्यावयाचे सानुग्रह अनुदानाबाबतच्या अन्य अटी व शर्ती तसेच सेवापुस्तक व वेतन बिलावर ठेवावयाचे दाखले याबाबतचा तपशील सोबतचे परिशिष्टात दिलेला आहे, त्यानुसार तजवीज करावी. तसेच  संघटना निधीची कपात करण्यात यावी.
५. सर्व पात्र सेवकांना सानुग्रह अनुदान द्यावयाचे असल्याने सदरची बिले ऑडीट विभागातून 30 ऑक्टोबर  अखेर पर्यंत तपासून घ्यावीत. सदरच्या रकमा बँक खात्यातून आदा होणार असल्याने त्याबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (व्हर्जन) सांख्यिकी व संगणक कार्यालयाकडून त्वरीत प्राप्त करून घ्यावी. (PMC Pune)
६. ज्या अधिकारी / सेवकांना सानुग्रह अनुदानातून आयकर व पुरसंचय निधी योजना लागू असलेल्या ज्या सेवकांना पुरसंचय निधीची वर्गणी कपात करावयाची आहे त्यांनी त्याबाबतची पूर्वसुचना संबंधीत बिल लेखनिकांना देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आयकर व पुरसंचय निधी वर्गणी कपात करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.
७. माहे सप्टेंबर 2023  चे वेतन संबंधीत सेवकास ज्या खात्याकडून देण्यात आले आहे. त्या खात्याने सानुग्रह अनुदान आदा करावयाचे आहे.
तरी, 2022-23 या वर्षासाठी सानुग्रह अनुदान आदा करण्याकरीता वरीलप्रमाणे पुर्तता करणेविषयी सर्व खाते प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना जरूर त्या सुचना देण्याची तजवीज करणे. असे ही आदेशात म्हटले आहे.

संघटना निधी असा कापला जाणार

वर्ग 1  अधिकारी – 700 रु
वर्ग 2 अधिकारी – 700 रु
वर्ग 3 अधिकारी व सेवक – 500 रु.
वर्ग 4 मधील सेवक – 400 रु.
—-

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा

PMC Contract Employees | Diwali Bonus अखिल भारतीय म्युनिसिपल फेडरेशन संलग्न (AICCTU) महानगरपालिका / नगरपालिका कंत्राटी कामगारांचा हक्क दिन कंत्राटी कामगारांच्या बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याकरता महापालिका कामगार युनियन (pune Mahanagarpalika Kamgar union) च्या वतीने इशारा मोर्चा काढून साजरा केला. तसेच यंदा दिवाळी बोनस कंत्राटी कामगारांना मिळवून देण्यासाठी आपला लढा तीव्र करणार आणि एकजुटीच्या ताकदीवर आपला दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवूया असा निर्धार यावेळी करण्यात आला. (PMC Contract Employees | Diwali Bonus)
याबाबत कामगार युनियन च्या वतीने अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार गेल्या 3 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांचा दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन  बेकायदेशीर पद्धतीने बंद केला आहे. गेल्या 3  वर्षांपासून प्रशासन पातळीवर दिवाळी बोनस, रजावेतन, घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी सातत्याने लढत आहोत. अवघ्या दोन महिन्यांवर दिवाळी सण येऊ घातला आहे. (PMC Pune)
यावर्षीपासून तरी कंत्राटी कष्टकरी कामगारांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आपण आज “इशारा मोर्चा” द्वारे पुणे महानगरपालिका भवन येथे कंत्राटी कामगारांची निदर्शने केली. दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळेपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार मोर्चा मध्ये करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज या निदर्शनास जाहीर पाठिंबा दर्शविला.
पुणे शहराचे आरोग्याचे रक्षण करताना, स्वतःच्या आरोग्याची हानी करून प्रसंगी जीव देऊन काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सरकारने तसेच पुणे मनपा प्रशासनाने वार्‍यावर सोडलेले आहे. पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने मनपा प्रशासनाच्या पातळीवर बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे प्रश्न सोडवावेत, अन्यथा दिवाळीपूर्व तीव्र आंदोलन करण्याचा तयारीला आपण सुरुवात करणार आहोत. जर 10 ऑक्टोबर पर्यंत या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर 11 ऑक्टोबर पासून बेमुदत निदर्शने करण्याची हाक कंत्राटी कामगारांना देण्यात आली.
——
News Title | PMC Contract Employees | Diwali Bonus | Contract workers will intensify their fight to get Diwali bonus Labor union warning to the administration