Tag: contract employees
Lad Page Committee|कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा
Lad Page Committee | घाणी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी प्रमाणे घाण भत्ता ,त्याचप्रमाणे वारसा हक्काने नोकरी, हे लाभ मिळतात. परंतु राज्य सरकारने हे लाभ सध्या स्थगित केले आहेत. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांना (Contract employees) किमान वेतन, बोनस, रजा, मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील. कंत्राटी कामगारांचा सन्मान केला पाहिजे. या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), नगरपालिका कृती समिती तर्फे आज भव्य मोर्चा विभागीय आयुक्त (Divisional commissioner office) कार्यालया वर काढण्यात आला. (Lad Page Committee)
या मोर्चामध्ये पुणे जिल्ह्यातील नगरपालिका मध्ये काम करणारे कर्मचारी व महानगरपालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाचे आयोजन एस के पळसे व प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. या मोर्चाला कामगार नेते सुनील शिंदे (Labour leader sunil shinde) यांनी मार्गदर्शन केले. लाड पागे समितीच्या शिफारसी व कामगारांवरील अन्याय यावेळी त्यांनी उपस्थित कामगारांसमोर मांडला व यापुढे हा संघर्ष खूप मोठा करून न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Contract employees news)
—-
News Title | Lad Page Committee | March of contract workers on Divisional Commissioner’s office
कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल मिळणार नाही
| मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे आदेश
पुणे | पुणे महानगरपालिके अंतर्गत ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा योजनचे ई-पेहचान पत्र वितरीत करणे बंधनकारक आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना हे पत्र मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी याबाबत कडक धोरण अवलंबले असून कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल देऊ नये, असे आदेश मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी सर्व खात्यांना दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेतर्फे विविध विकास प्रकल्प व देखभाल दुरुस्तीची कामे निविदेव्दारे कंत्राटी कामगारांमार्फत करण्यात येत आहेत. कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० मधील व राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ तरतुदींच्या अनुषंगाने राज्य कामगार विमा योजनेचे परिणामकारक अंमलबजावणी व कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळणेकामी कंत्राटी कामगारांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या निर्देशांचे सर्व संबंधित खातेप्रमुख, क्षेत्रिय अधिकारी व पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी पालन करण्याची दक्षता घ्यावी. असेही आदेशात म्हटले आहे.
कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा !
| मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा
| 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार
पुणे महानगरपालिकेतील (PMC pune) कंत्राटी कामगारांचा मेळावा (Contract employees Gathering) काँग्रेस भवन येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या मेळाव्यामध्ये गेली सहा महिन्यापासून 45 वयाची अट या व इतर कारणांसाठी विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आलेल्या सुमारे 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. (contract employees)
या मेळाव्यासाठी पाणीपुरवठा विभाग, सुरक्षारक्षक विभाग, उद्यान विभाग, स्मशानभूमी विभाग, झाडन काम, कचरा वाहतूक करणारे चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये बोलताना कामगार नेते व राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सर्व सुरक्षा रक्षकांनी संघटनेवर विश्वास ठेवला व संघटनेच्या पाठीशी उभे राहिले म्हणून त्यांच्यासाठी संघटनेने आंदोलन उभारले व त्या आंदोलनाला यश येऊन या सर्व सुरक्षारक्षकांना पुन्हा पूर्ववत कामावर घेण्यात आले असे सांगितले. त्याचप्रमाणे सुनील शिंदे यांनी पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांना एवढाच बोनस व 19 हजार रुपये दिला पाहिजे ही मागणी ही प्रशासनाने मान्य केली असून लवकरच याबाबत ही ठोस निर्णय संघटना करून घेईल असे आश्वासन यावेळी दिले ते पुढे बोलताना म्हणाले कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहिले पाहिजे. किमान वेतन कायद्यातील फरकाशी रक्कम तात्काळ दिली गेली पाहिजे, अशा महत्त्वाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मागण्यांबाबत आपण प्रशासनाबरोबर वारंवार चर्चा करत असून या बाबतीत पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला नाही तर यापुढे मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णयही यावेळी जाहीर केला.
या वेळामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस के पळसे यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे परिमंडळ प्रमुख विजय पांडव यांनी सूत्र संचालन केले तसेच स्मशानभूमीचे प्रमुख बाबा कांबळे व्हेईकल डेपोचे संदीप पाटोळे संजीवन हॉस्पिटलच्या मेघमाला काकडे इत्यादी कामगार नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (pune municipal corporation)
उद्यापासून कंत्राटी कर्मचारी महापालिका गेटवर आमरण उपोषण करणार | सुनिल शिंदे
कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 5 एप्रिलला कामगार युनियनचा मोर्चा
कंत्राटी मोटार सारथी व कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
| कामगार संघटनेकडून निदर्शने
कंत्राटी मोटार सारथी यांच्या कंत्राटदार जरी बदलला तरी मोटार सारथी व कामगार यांना कामावरून कमी करू नये. तसेच मोटार सारथी कडून कर्तव्य बजावत असताना अनावधानाने अपघात झाला तर त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ नये. भविष्य निर्वाह निधी व ई. एस. आय. ची रक्कम भरून उपचारासाठी दवाखान्याचे कार्ड काढून देणे, वेतन चिठ्ठी व ओळखपत्र तसेच गणवेश इत्यादी सुविधा देणे शिवाय अपघात नुकसान भरपाई देणे तसेच कर्तव्य बजावत असताना नैसर्गिक किंवा अपघातात कामगार मृत्यूमुखी पडला तर त्यांच्या वारसांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कामावर घ्यावे या व इतर मागण्यांसाठी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ कामगार संघटनेकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले कि यातील कुणालाही कामावरून कमी केले जाणार नाही. (PMC contract Employees)
पुणे महानगरपालिकेत महानगरपालिकेत व्हेईकल डेपो व १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत कचरा वहातुक, सार्वजनिक स्वच्छता व सर्व खात्यातील व अस्थापना विभागात कंत्राटी पद्धतीने महानगरपालिकेची जहाज रूपी यंत्रणेचे सारथ्य करणारी १३७० कंत्राटी पद्धतीने काम करणारे मोटार सारथी गेली पंधरा वर्षापासून महानगरपालिकेत अतिशय तुटपुंजा वेतनामध्ये काम करत आहेत. तसेच कोविडच्या कालखंडामध्ये हे सर्व मोटार सारथी स्वतःच्या जीवाची परवा न करता दवाखान्याच्या अँब्युलन्सवर कोविडने मृत्यू पावलेले प्रेते व व रुग्णांची सेवा केली त्यामध्ये काम करता करता १३ कंत्राटी कामगार व मोटार सारथी मृत्युमुखी पडले त्यांचे कुटुंबे उध्वस्त झाली तरीही प्रशासनाने व संबंधित कंत्राटदाराने कोणत्याही पद्धतीची मदत केली नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या धोरणानुसार पंधरा वर्षाखालील सर्व जुनी वाहने स्क्रॅप होणार आहेत. (Vehicle depot)
त्यामुळे व्हेईकल डेपो मधील कामाचे कंत्राट संपणार आहे त्या ठिकाणी कंत्राटदारा मार्फतच नवीन वाहनासहित निविदा मान्य केलेले आहेत त्यामुळे त्या वाहनावर संबंधित ठेकेदाराचेच नवीन मोटार सारथी व कामगार असणार आहेत असे खबर कामगार युनियनला लागली. त्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. (PMC kamgar union)
या निदर्शनामध्ये मार्गदर्शन करत असताना युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट असे म्हणाले की,” महानगरपालिकेच्या प्रशासनाने निविदेच्या अटी शर्तीचे पालन करावे तसेच कंत्राटदार जरी बदलला तरी मोटार सारथी व कामगार कदापिही बदलू देणार नाही. त्यांनाच नवीन कंत्राटदारांच्या गाडीवर काम द्यावे. तसेच त्यांना किमान वेतनाप्रमाणेच वेतन अदा करावे त्यांच्या वेतनातून एकही रुपया कमी करू देणार नाही आणि कोणत्याही मोटार सारथीला व कामगारांना कमी करू देणार नाही जर प्रशासनाने या कामगारांवर अन्याय केला तर युनियन म्हणून आम्ही तो सहन करणार नाही असे प्रशासनाला ठणकावले”. (PMC Pune)
सदर कामगारांच्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त रवींद्र बिनवडे यांना देण्यात आले. तसेच अतिरिक्त आयुक्त व्हेईकल डेपोचे उपायुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. एकही मोटार सारथी व कंत्राटी कामगार कमी केला जाणार नाही अशा आश्वासन युनियनला दिले.
सदर निदर्शनामध्ये युनियनचे संयुक्त चिटणीस कॉ. मधुकर नरसिंगे, उपाध्यक्ष कॉ. शोभा बनसोडे कॉ. सुदाम गोसावी, कॉ. दिलीप काबळे, कॉ. अनंत मालप, कॉ. मदन प्रधान, कॉ. वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष कॉ. राम अडागळे, कॉ. रमेश पारसे, कॉ. शरद , कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. प्रकाश हुरकडली, कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. निलेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. समारोप कॉ. शोभा बनसोडे यांनी केले. तसेच सदर निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपा व्हेईकल डेपोमधील कंत्राटी कामगार व बिगारी करणार निदर्शने
पुणे महापालिकेत खरंच साडे आठ हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत काय?
| आमदार माधुरी मिसाळ यांना पडला प्रश्न
करण्यासाठी साडेआठ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार नियुक्त केले आहेत, हे खरे आहे काय?
(२) असल्यास, कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगार व ठेकेदारांचा सर्वसाधारण तपशील काय आहे?
(३) असल्यास, कंत्राटी कामगारांच्या वेतन देणेकामी पुणे महानगरपालिकेकडून एकूण किती खर्च करण्यात येत आहे, याचा तपशिल देण्यात यावा.