PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा

PMC Contract Employees | Diwali Bonus अखिल भारतीय म्युनिसिपल फेडरेशन संलग्न (AICCTU) महानगरपालिका / नगरपालिका कंत्राटी कामगारांचा हक्क दिन कंत्राटी कामगारांच्या बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याकरता महापालिका कामगार युनियन (pune Mahanagarpalika Kamgar union) च्या वतीने इशारा मोर्चा काढून साजरा केला. तसेच यंदा दिवाळी बोनस कंत्राटी कामगारांना मिळवून देण्यासाठी आपला लढा तीव्र करणार आणि एकजुटीच्या ताकदीवर आपला दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवूया असा निर्धार यावेळी करण्यात आला. (PMC Contract Employees | Diwali Bonus)
याबाबत कामगार युनियन च्या वतीने अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार गेल्या 3 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांचा दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन  बेकायदेशीर पद्धतीने बंद केला आहे. गेल्या 3  वर्षांपासून प्रशासन पातळीवर दिवाळी बोनस, रजावेतन, घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी सातत्याने लढत आहोत. अवघ्या दोन महिन्यांवर दिवाळी सण येऊ घातला आहे. (PMC Pune)
यावर्षीपासून तरी कंत्राटी कष्टकरी कामगारांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आपण आज “इशारा मोर्चा” द्वारे पुणे महानगरपालिका भवन येथे कंत्राटी कामगारांची निदर्शने केली. दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळेपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार मोर्चा मध्ये करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज या निदर्शनास जाहीर पाठिंबा दर्शविला.
पुणे शहराचे आरोग्याचे रक्षण करताना, स्वतःच्या आरोग्याची हानी करून प्रसंगी जीव देऊन काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सरकारने तसेच पुणे मनपा प्रशासनाने वार्‍यावर सोडलेले आहे. पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने मनपा प्रशासनाच्या पातळीवर बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे प्रश्न सोडवावेत, अन्यथा दिवाळीपूर्व तीव्र आंदोलन करण्याचा तयारीला आपण सुरुवात करणार आहोत. जर 10 ऑक्टोबर पर्यंत या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर 11 ऑक्टोबर पासून बेमुदत निदर्शने करण्याची हाक कंत्राटी कामगारांना देण्यात आली.
——
News Title | PMC Contract Employees | Diwali Bonus | Contract workers will intensify their fight to get Diwali bonus Labor union warning to the administration