Time Bounde Promotion | कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून मागवली माहिती  | शिफारस फॉर्म भरून द्यावा लागणार 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून मागवली माहिती

| शिफारस फॉर्म भरून द्यावा लागणार

पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या मंजुरीकरिता शिफारस फॉर्म व बंधपत्र सादर करावे लागणार आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अधिकारी / कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत संदर्भिय कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीकरीता खात्यांचे मार्फत प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे. सदर प्रस्तावामध्य संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची लाभाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली माहिती अंतर्भूत करणे व त्यानुसार सदर प्रस्ताव पदोन्नती समितीच्या मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे. याकरिता आवश्यक माहिती समाविष्ट असणारा खात्यामार्फत शिफारस करावयाचा फॉर्म आणि अधिकारी / कर्मचारी यांचेकडून लिहून घ्यावयाचे बंधपत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे. सर्व खातेप्रमुख / विभाग प्रमुख  अटी व शर्तीना अधीन राहून, शिफारस फॉर्म मध्ये नमूद केलेली संपूर्ण माहिती भरणे व त्यानुसार अधिकारी / कर्मचारी यांचे ७ व्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनांतर्गत लाभाचे प्रस्ताव शिफारशीसह सादर करणेबाबत कार्यवाही करावयची आहे.

| काय आहे फॉर्म मध्ये 
या फॉर्म नुसार सेवकांना आपली नेमणुकीपासून पूर्ण माहिती भरावी लागणार आहे. तसेच 10/20/30 साठी एका लाभाची शिफारस करावी लागणार आहे. वेतनाची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच खातेनिहाय चौकशी, न्यायिक चौकशी, शास्ती, बडतर्फ, सेवेतून कमी, गैरहजर कालावधी, पदावनत केले असल्यास त्याची माहिती द्यावी लागणार आहे.