PMC Contract Employees Bonus | बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार | कामगार नेते सुनील शिंदे

 

PMC Contract Employees Bonus | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांच्या बोनस, अनुदान व इतर प्रश्नांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. (PMC Contract Employees Bonus)

आज सकाळी महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली अर्पण करून सुनील शिंदे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. आज दिवसभर या आंदोलनाला महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षारक्षक, पाणीपुरवठा, कीटकनाशक, हॉस्पिटल, स्मशानभूमीतील कंत्राटी कामगार, कंत्राटी चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला. सकाळपासून सुमारे 300 कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी कामगार एकजुटीची गाणी, तसेच बोनस आमच्या हक्काचा, आमचाच लढा न्यायासाठी अशा घोषणाही देण्यात आल्या. दिवसभरामध्ये प्रशासनाकडून मात्र या आंदोलनाची कोणती दखल घेण्यात आली नाही.

कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला व प्रश्न समजावून घेतले. या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व इन्स्पेक्टर पाठवून प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर कामगारांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. आज या ठिकाणी कोणताही निर्णय न झाल्याने कामगार नेते सुनील शिंदे यांनी जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलन चालू आहे, असे सांगितले. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस के पळसे, त्याचबरोबर संघटनेचे विविध कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण

 

PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde |आम्हीही पुणे मनपा (Pune Municipal Corporation)  प्रशासनाचे कामगार आहोत. आम्हालाही कामगार कायद्यानुसार (Labor Law) आमच्या सामाजिक सुरक्षा, कामगाराचे हक्क का भेटत नाही. असा प्रश्न कामगार नेते राष्ट्रीय मजदूर संघाचे(RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचे अध्यक्ष कामगार सुनील शिंदे (Sunil Shinde)  यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार आमरण उपोषणाला बसतील असा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला. (PMC Pune Contract Employees Bonus Agitation)

निमित्त होते मनपा मुख्य प्रवेशद्वारावर आयोजित इशारा आंदोलनाचे. हे आंदोलन मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वा झाले. गेल्या वर्षभरात कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याबाबत संघटनेने दिलेला लढा, प्रशासन करत असलेली या बाबतची दिरंगाई याबाबत माहिती या आंदोलनावेळी केली. कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या एवढा बोनस मिळालाच पाहिजे, ठेकेदार बदलला तरी कामगार तेच राहिलेच पाहिजे, कंत्राटी कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळालीच पाहिजे,
कंत्राटी कामगारांना कायम कामगारां येवढेच वेतन व सवलती मिळाल्याच पाहिजेत या आंदोलनाच्या मागण्या होत्या. पाऊस असो की उन आम्ही बोनस घेतल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शेवटी सर्व कामगारांनी केला. (PMC Pune)

जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचे अध्यक्ष कामगार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार आमरण उपोषणाला बसतील असा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, प्रतिनिधी विजय पांडव, सरिता धुळेकर, गोरखनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.
तसेच पगार 10 तारखेनंतर मिळाला पाहिजे हा नियम असतानाही न मिळणारा पगार, पगाराची स्लीप, युनिफॉर्म, वेळेवर जमा न होणारा PF अशा अनेक मुद्यांवरचे प्रश्न उपस्थित कामगारांनी उपस्थित केले. आभाळाची आम्ही लेकरे, सवालाचा जवाब दे रे मनपाच्या प्रशासना ही गाणी तसेच बोनस आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीचा, ठेकेदार व अधिकाऱ्याचं नातं काय होऊ द्या चर्चा या घोषणा ही यावेळी घेण्यात आल्या. (Rashtriya Majdur Sangh)

PMC Kamgar Union | दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याचा कंत्राटी कामगारांचा निर्धार | 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Kamgar Union | दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याचा कंत्राटी कामगारांचा निर्धार | 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने

 

PMC Kamgar Union | बंद केलेला बोनस (PMC Contract Employees), घरभाडे भत्ता व रजावेतन ताबडतोब चालु करा. PF व ESI चा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा. अशा विविध मागण्यासाठी 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कॉ. उदय भट (Comrade Uday Bhat), अध्यक्ष,  पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) यांनी दिली.  (PMC Contract Employees Diwali Bonus)

कामगार युनियन च्या निवेदनानुसार पुणे मनपा प्रशासनाने मोठ्या विलंबाने 24 फेब्रुवारी 2015 चे शासनाचे किमान वेतन 17 फेब्रुवारी 2021 पासून लागू केले, आणि हे करत असताना बेकायदेशीर तसेच अन्यायकारक पद्धतीने बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे कंत्राटी कामगारांचे कायदेशीर अधिकार देण्याचे बंद केले, त्यामुळे पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना अत्यंत क्षुल्लक वेतनवाढ यातून मिळाली. महाराष्ट्रातील बहुतांश महानगरपालिकांनी शासनाचे किमान वेतन लागू करताना बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन ई. हक्क दिले, परंतु पुणे मनपानेच ते बंद केले. या अन्यायाविरोधात पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने वारंवार प्रशासनाकडे दाद मागितली, परंतु प्रशासनाने हे हक्क देण्यास नकार दिला. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने औद्योगिक न्यायालयात केस केली आहे. (Pune Mahapalika Kamgar Union)

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने 12 सप्टेंबर 2023 रोजी “ईशारा मोर्चा” काढलेला होता, परंतु अद्यापही या प्रश्नांवर प्रशासनाकडुन कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. त्यामुळेच 11 ऑक्टोबर 2023 पासुन दररोज दुपारी 3 वाजता पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार कुटुंबासह पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत निदर्शने करणार आहेत. (Pune Municipal Corporation)

कंत्राटी कामगार अत्यंत अल्प वेतनावर कायम कामगारांएवढे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काम करतात हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. कोरोना सारख्या महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांचे योगदान कोणीही विसरु शकत नाही. हे योगदान देत असताना 13 कंत्राटी कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या जीव गमावलेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसदारांना अद्याप एक रुपयाही पुणे महानगरपालिकेने दिलेला नाही. किमान वेतन 6 वर्षे विलंबाने देऊन त्याचा फरक देखील पुणे महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना दिलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून बंद केलेले घरभाडे भत्ता, दिवाळी बोनस, रजावेतन यावर्षी मिळवण्याचा निर्धार केल्या असल्याचे पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे अध्यक्ष कॉ.उदय भट यांनी जाहीर केले आहे. (PMC Pune Employees Diwali Bonus)

प्रमुख मागण्या :-

बंद केलेला बोनस, घरभाडे भत्ता व रजावेतन ताबडतोब चालु करा.

PF व ESI चा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा.

दरमहा वेतनपावती आणि 10 तारखेच्या आत वेतन मिळालेच पाहिजे.

कोरोना मध्ये दुर्दैवी मृत्यु झालेल्या कंत्राटी कामगारांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.

– ———–