PMC Kamgar Union | दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याचा कंत्राटी कामगारांचा निर्धार | 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Kamgar Union | दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याचा कंत्राटी कामगारांचा निर्धार | 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने

 

PMC Kamgar Union | बंद केलेला बोनस (PMC Contract Employees), घरभाडे भत्ता व रजावेतन ताबडतोब चालु करा. PF व ESI चा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा. अशा विविध मागण्यासाठी 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कॉ. उदय भट (Comrade Uday Bhat), अध्यक्ष,  पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) यांनी दिली.  (PMC Contract Employees Diwali Bonus)

कामगार युनियन च्या निवेदनानुसार पुणे मनपा प्रशासनाने मोठ्या विलंबाने 24 फेब्रुवारी 2015 चे शासनाचे किमान वेतन 17 फेब्रुवारी 2021 पासून लागू केले, आणि हे करत असताना बेकायदेशीर तसेच अन्यायकारक पद्धतीने बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे कंत्राटी कामगारांचे कायदेशीर अधिकार देण्याचे बंद केले, त्यामुळे पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना अत्यंत क्षुल्लक वेतनवाढ यातून मिळाली. महाराष्ट्रातील बहुतांश महानगरपालिकांनी शासनाचे किमान वेतन लागू करताना बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन ई. हक्क दिले, परंतु पुणे मनपानेच ते बंद केले. या अन्यायाविरोधात पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने वारंवार प्रशासनाकडे दाद मागितली, परंतु प्रशासनाने हे हक्क देण्यास नकार दिला. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने औद्योगिक न्यायालयात केस केली आहे. (Pune Mahapalika Kamgar Union)

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने 12 सप्टेंबर 2023 रोजी “ईशारा मोर्चा” काढलेला होता, परंतु अद्यापही या प्रश्नांवर प्रशासनाकडुन कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. त्यामुळेच 11 ऑक्टोबर 2023 पासुन दररोज दुपारी 3 वाजता पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार कुटुंबासह पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत निदर्शने करणार आहेत. (Pune Municipal Corporation)

कंत्राटी कामगार अत्यंत अल्प वेतनावर कायम कामगारांएवढे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काम करतात हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. कोरोना सारख्या महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांचे योगदान कोणीही विसरु शकत नाही. हे योगदान देत असताना 13 कंत्राटी कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या जीव गमावलेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसदारांना अद्याप एक रुपयाही पुणे महानगरपालिकेने दिलेला नाही. किमान वेतन 6 वर्षे विलंबाने देऊन त्याचा फरक देखील पुणे महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना दिलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून बंद केलेले घरभाडे भत्ता, दिवाळी बोनस, रजावेतन यावर्षी मिळवण्याचा निर्धार केल्या असल्याचे पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे अध्यक्ष कॉ.उदय भट यांनी जाहीर केले आहे. (PMC Pune Employees Diwali Bonus)

प्रमुख मागण्या :-

बंद केलेला बोनस, घरभाडे भत्ता व रजावेतन ताबडतोब चालु करा.

PF व ESI चा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा.

दरमहा वेतनपावती आणि 10 तारखेच्या आत वेतन मिळालेच पाहिजे.

कोरोना मध्ये दुर्दैवी मृत्यु झालेल्या कंत्राटी कामगारांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.

– ———–