PMC Health System | MP Supriya Sule | पुणे महापालिकेकडे क्षय रोगावर असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत 

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र
Spread the love

PMC Health System | MP Supriya Sule | पुणे महापालिकेकडे क्षय रोगावर असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत

 

आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती आणि सर्व सुविधा तातडीने द्या | खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी

PMC Health System | MP Supriya Sule | पुणे : पुणे महापालिकेकडे (Pune Municipal Corporation) क्षय रोगावर (TB) असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात येत आहेत. यामुळे आरोग्यकेंद्रांमध्ये (Health Center) उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  रुग्णालयाची ही स्थिती असणे गंभीर असून शासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पत्राद्वारे केली आहे.

नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. सहा कोटी रुपये देऊनही रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिट्यूटने औषध पुरवठा केला नसल्याचे वृत्त आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या रुग्णालयाची ही स्थिती असणे गंभीर असून शासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे. (Health System of Maharashtra)

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच, महापालिकेची रुग्णालये आणि राज्य शासनाच्या मोठी रुग्णालयांबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत मागणी केली आहे. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांचा दाखला देत सुळे यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात नुकताच सुळे यांचा दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या. या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त असून, औषधेही अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांकडून त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शासनाने आरोग्य सेवांबाबत सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. परंतु रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना दुर्लक्ष होत आहे, हे नांदेड येथील घटनेतून अधोरेखित होत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

या निरीक्षणाअंती बारामती लोकसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालायांसोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे यांचे हेल्थ ऑडीट करण्यात यावे व रुग्णाना आवश्यक ती रुग्णसेवा उपलब्ध होणे बाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवलेली निरीक्षणे :

* ससून हॉस्पिटल हे पुणे जिल्ह्यातील अद्ययावत हॉस्पिटल असून येथे मोफत तसेच माफक दारात रुग्णसेवा उपलब्ध असल्याने पुणे शहर, पुणे जिल्हा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील व्यक्ती सुद्धा चांगल्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेऊन शकतात. परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत, त्याचबरोबर औषधेही अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यात दिरंगाई होत आहे, अशा तक्रारी रुग्णांकडून येत आहेत. ससून हॉस्पिटलकडून औषधे खरेदीसाठी ‘हाफकिन’ या संस्थेला सहा कोटी रुपये देण्यात आले आहेत. परंतु अद्यापही औषधपुरवठा करण्यात आला नाही.

*दौंड तालुक्यातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त आहेत. यामुळे येथील आरोग्यसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. याखेरीज येथे अधिक तत्पर आरोग्यसेवेसाठी ट्रॉमा केअर सेंटरचे अद्ययावतीकरण होण्याची आवश्यकता आहे.

*दौंड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला आहे. परंतु तो तांत्रिक अडचणींमुळे कार्यान्वित नाही. यासाठी २५० केव्ही रोहित्राची गरज आहे. आरोग्य आणि उर्जा या दोन खात्यांमध्ये समन्वय साधून याबाबत सकारात्मक विचार करुन तातडीने मार्ग काढावा‌ आणि हे केंद्र कार्यान्वित करण्याबाबत निर्णय घ्यावा.

*पुणे महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या हद्दीत वायसीएमच्या धर्तीवर, सर्व सुखसोयींनी युक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची आवश्यकता आहे. या परिसरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ससून रुग्णालयात जावे लागते.