Housing societies | MLA Sunil Tingre | गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नगरसेवकाच्या निधीमधून विकास कामे करण्यास मंजूरी द्या  | आमदार सुनील टिंगरे यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नगरसेवकाच्या निधीमधून विकास कामे करण्यास मंजूरी द्या

| आमदार सुनील टिंगरे यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर, आमदार निधीची कामे अनुज्ञेय केलेली आहेत. त्याच धर्तीवर महानगरपालिका क्षेत्रातील, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कामे करण्यास नगरसेवक निधी अनुज्ञेय करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे.

आमदार टिंगरे यांच्या पत्रानुसार  शहरामध्ये नगरसेवकांना नगरसेवक निधी वापरण्यास खुप मोठया प्रमाणात अडचणी निर्माण होताना दिसून येत आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात नागरीक मोठया प्रमाणात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोसायटी परिसरात विकास कामे करतांना मोठया प्रमाणात तांत्रिक व शासकीय अडचणी निर्माण होत आहेत. नगरसेवकांना नगरसेवकांचा विकास निधी खर्च करण्याकरीता अनेकदा जागेचा प्रश्न निर्माण होतांना दिसून येत आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरीक वारंवार आपल्या समस्या घेऊन नगरसेवकांकडे येत असतात. सहकारी नागरीक हे महानगरपालिकेचे पाणी पट्टी, घरपट्टी मालमत्ता कर असे विविध कर नियमीत भरत असतात.
परंतु महानगरपालिकेद्वारा सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मुलभुत विकासाची कामे करण्यात येत नाहीत. बऱ्याच समस्या हया त्यांच्या सोसायटीमधील रस्ते, ड्रेनेज विद्यूत, पावसाळी लाईन, आदी मुलभूत सुविधांसंदर्भात असतात. त्यामुळे नगरसेवकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे कि, २२ जून २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर, आमदार निधीची कामे अनुज्ञेय केलेली आहेत. त्याच धर्तीवर महानगरपालिका क्षेत्रातील, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कामे करण्यास नगरसेवक निधी अनुज्ञेय करावा. असे ही म्हटले आहे.