Multipurpose workers | महापालिकेच्या विविध खात्यात घेतले जाणार बहुउद्देशीय कामगार  | 5 जुलै पर्यंत आवश्यक कामगारांची माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेच्या विविध खात्यात घेतले जाणार बहुउद्देशीय कामगार

| 5 जुलै पर्यंत आवश्यक कामगारांची माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पुणे | महापालिकेच्या विविध खात्यात बहुउद्देशीय कामगारांची आवश्यकता असते. मात्र महापालिकेकडे कायमस्वरूपी कामगार कमी आहेत. त्यामुळे ठेकेदारांच्या माध्यमातून कामगार घेतले जातात. विविध खात्यात कामगाराची आवश्यकता पाहून कामगार घेतले जाणार आहेत. त्यासाठी विविध खात्याकडून आवश्यक कामगारांची माहिती मागवण्यात आली आहे. 5 जुलै पर्यंत ही माहिती देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी विविध विभागांना दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा विभागामार्फत सुरक्षा रक्षक / बहुउददेशीय कामगार प्रत्येक खात्यास त्यांचे मागणीनुसार मान्य संख्येच्या अनुषंगाने पुरविले जातात. कायम सुरक्षा रक्षक कमी असल्यामुळे कंत्राट. पध्दतीने बहुउददेशीय कामगार घेतले जातात. पुणे महानगरपालिकेतील विविध विभागाकडून तसेच मा. सभासद यांचेकडून अतिरिक्त सुरक्षा सेवकांची मागणी केली जाते. नविन ठिकाणे व जुनी ठिकाणे यांचे देखभाल व सुरक्षा व्यवस्थेकामी बहुउददेशीय कामगारांची आवश्यकता असते.

तरी सुरक्षा विभागामार्फत नविन १ / २०२२ निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असलेने आपल्या विभागात कार्यरत बहुउददेशीय कामगार संख्या व नविन गावात तयार होणारी ठिकाणे यासह माहिती त्वरित सुरक्षा विभागाकडे लेखी कळविण्यात यावी. जेणेकरुन सुरक्षा विभागास निश्चित
अशी संख्या गृहित धरुण निविदा प्रक्रिया रबविणे सोइस्कर होइल. निविदा प्रक्रिया करणे कामी आपल्या विभागाची निश्चित संख्या कळविणे आवश्यक आहे.

आपल्या विभागा कडून प्रमाणित माहिती प्राप्त न झाल्यास निविदा प्रक्रिया झालेनंतर आपले मागणीचा विचार करणेत येणार नाही. खात्यामार्फत पाठविणेत आलेली माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त
यांचे मार्फत प्रमाणीत करून पाठविण्यात यावी. आपल्या मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करुन त्यास आयुक्त यांची मान्यता घेणेकामी कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे 5 जुलै पर्यंत हीमाहिती देण्यास सांगण्यात आले आहे.