Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  सुनावणी पुन्हा लांबणीवर! |  नवीन सुनावणी आता 6 मे  ला

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  सुनावणी पुन्हा लांबणीवर! |  नवीन सुनावणी आता 6 मे  ला

 

Aurangabad High Court – (The karbhari news Service) –  घाणकाम भत्ता वारसा हक्क केसची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. घाणभत्ता (Ghanbhatta Allowance) अबाधित राहिलाच पाहिजे, या मागणीकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर (Aurangabad High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 16 एप्रिल तारीख दिली होती. मात्र त्यावेळी सुनावणी होऊ शकली नाही. आता नवीन सुनावणी 6 मे ला होणार आहे. अशी माहिती महापालिका कामगार युनिअन च्या वतीने देण्यात आली.
  घाणकाम भत्ता वारसा अधिकार कायम रहावा. या मागणीकरता महाराष्ट्र सरकारने ठाम व परीणामकारक भूमिका घ्यावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची स्थगिती उठवावी व घाणीत काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उन्नती अजूनही मोठ्या प्रमाणात झालेली नाही.  याची दखल शासन दरबारी असलेल्या प्रतिनिधींनी घ्यावी व यावरची स्थगिती तात्काळ उठवावी. अशी मुख्य मागणी आहे. दरम्यान घाणभत्ता वारस केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर प्रलंबित आहे. (Ghanbhatta Varas Hakk)
16 एप्रिल  रोजी  घाणभत्ता वारस हक्क संबंधित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी होणार होती.  त्या दिवशी घाणभत्ता वारस केस सुनावणी करिता बोर्डावर होती.  परंतु वेळेअभावी सुनावणी झालेली नाही. आता 6 मे ला सुनावणी आहे. केस बोर्डवर आणण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. असे युनियन च्या वतीने सांगण्यात आले.

PMC Kamgar Union | दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याचा कंत्राटी कामगारांचा निर्धार | 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Kamgar Union | दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याचा कंत्राटी कामगारांचा निर्धार | 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने

 

PMC Kamgar Union | बंद केलेला बोनस (PMC Contract Employees), घरभाडे भत्ता व रजावेतन ताबडतोब चालु करा. PF व ESI चा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा. अशा विविध मागण्यासाठी 11 ऑक्टोबर पासून कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कॉ. उदय भट (Comrade Uday Bhat), अध्यक्ष,  पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) यांनी दिली.  (PMC Contract Employees Diwali Bonus)

कामगार युनियन च्या निवेदनानुसार पुणे मनपा प्रशासनाने मोठ्या विलंबाने 24 फेब्रुवारी 2015 चे शासनाचे किमान वेतन 17 फेब्रुवारी 2021 पासून लागू केले, आणि हे करत असताना बेकायदेशीर तसेच अन्यायकारक पद्धतीने बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे कंत्राटी कामगारांचे कायदेशीर अधिकार देण्याचे बंद केले, त्यामुळे पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना अत्यंत क्षुल्लक वेतनवाढ यातून मिळाली. महाराष्ट्रातील बहुतांश महानगरपालिकांनी शासनाचे किमान वेतन लागू करताना बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन ई. हक्क दिले, परंतु पुणे मनपानेच ते बंद केले. या अन्यायाविरोधात पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने वारंवार प्रशासनाकडे दाद मागितली, परंतु प्रशासनाने हे हक्क देण्यास नकार दिला. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने औद्योगिक न्यायालयात केस केली आहे. (Pune Mahapalika Kamgar Union)

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने 12 सप्टेंबर 2023 रोजी “ईशारा मोर्चा” काढलेला होता, परंतु अद्यापही या प्रश्नांवर प्रशासनाकडुन कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. त्यामुळेच 11 ऑक्टोबर 2023 पासुन दररोज दुपारी 3 वाजता पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार कुटुंबासह पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत निदर्शने करणार आहेत. (Pune Municipal Corporation)

कंत्राटी कामगार अत्यंत अल्प वेतनावर कायम कामगारांएवढे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काम करतात हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. कोरोना सारख्या महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांचे योगदान कोणीही विसरु शकत नाही. हे योगदान देत असताना 13 कंत्राटी कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या जीव गमावलेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसदारांना अद्याप एक रुपयाही पुणे महानगरपालिकेने दिलेला नाही. किमान वेतन 6 वर्षे विलंबाने देऊन त्याचा फरक देखील पुणे महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना दिलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून बंद केलेले घरभाडे भत्ता, दिवाळी बोनस, रजावेतन यावर्षी मिळवण्याचा निर्धार केल्या असल्याचे पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे अध्यक्ष कॉ.उदय भट यांनी जाहीर केले आहे. (PMC Pune Employees Diwali Bonus)

प्रमुख मागण्या :-

बंद केलेला बोनस, घरभाडे भत्ता व रजावेतन ताबडतोब चालु करा.

PF व ESI चा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा.

दरमहा वेतनपावती आणि 10 तारखेच्या आत वेतन मिळालेच पाहिजे.

कोरोना मध्ये दुर्दैवी मृत्यु झालेल्या कंत्राटी कामगारांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.

– ———–