IPL : CSK vs MI : चेन्नई आणि मुंबई चा कसा झाला सामना? कोण हारले?

Categories
Breaking News Sport देश/विदेश
Spread the love

पहिल्याच सामन्यात चेन्नई ने मुंबईला ला चारली धूळ

: मुंबईला 20 धावांनी हरवले

: चेन्नई पोहोचली 1 नंबर वर

दुबई : कोरोनाच्या कारणास्तव प्रलंबित असलेल्या IPL च्या सामन्यांना आज धडाक्यात सुरुवात झाली. मात्र CSK चा सुरुवातीचा खेळ फारसा चांगला झाला नाही. मात्र ऋतुराज ने मैदानावर IPL च्या ऋतू वर राज करत 88 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे चेन्नईचा डाव सावरला. चेन्नई ने मुंबई समोर 156 धावांचा डोंगर उभा केला. मुंबई ने हि दमदार सुरुवात केली मात्र फार लांबचा पल्ला मुंबईला गाठता आला नाही. मुंबईचा डाव 136 धावांवर आटोपला. त्यासाठी मुंबईने आपल्या 8 विकेट्स गमावल्या. चेन्नई ने मुंबईला 20 धावांनी हरवले.
: चेन्नईचा डाव सावरला ऋतुराज ने
रविवारी iPL सामन्याची सुरुवात झाली. सुरुवातीलाच पारंपरिक स्पर्धक ज्यांना मानले जाते अशा मुंबई आणि चेन्नई चा सामना खेळवला जातोय. जरी या सामन्यात मुंबई चे कर्णधार रोहित शर्मा खेळत नसले तरी मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत चेन्नईला ला अगदी नामोहरम करून टाकले. ट्रेंट बोल्ट ने आपल्या पहिल्या दोन ओव्हर मध्ये महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. मात्र त्यांनतर ही सुरेश रैना आणि चेन्नई चे कर्णधार महेंद्रसिंग धोनी फारसा चमत्कार दाखवू शकले नाहीत. हे काम केले ऋतुराज गायकवाड आणि त्याला साथ दिली रवींद्र जडेजा ने. शेवटच्या 5 ओव्हर मध्ये तर चेन्नईचा डाव पूर्णपणे सावरला. जडेजा माघारी गेल्यानंतर ब्रावो ने आघाडी घेत 3 षटकार मारत खेळ चांगलाच सावरला. शेवटी ब्रावो ला देखील पॅव्हेलियन ला परतावे लागले. तरीही ऋतुराज मात्र आपला जलवा दाखवतच होता. आपल्या 88 धावांवर नाबाद राहत ऋतुराज ने चेन्नई का पूर्णपणे सावरले. नंतर मात्र चेन्नई ने मुंबईला 136 एवढ्या धावांवर रोखले.
: मुंबईचे खराब प्रदर्शन
चेन्नई चा खेळ संपल्यानंतर मुंबई ने दमदार सुरुवात केली मात्र मुंबईला ला फार लांबचा पल्ला गाठता आला नाही. 4 थ्या ओव्हर नंतर मुंबईचा डाव डळमळू लागला. मुंबईचा कर्णधार पोलार्ड व तिवारी ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार ही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. तो ही लवकरच परतला. त्यानंतर मात्र मुंबई कोसळली. ती सावरलीच नाही. त्यातच चेन्नईच्या गोलंदाजांचा बेधडक मारा मुंबईला सहन झाला नाही. त्यामुळे चेन्नई ने सामना खेचून आणला. जो सामना सुरु झाल्यानंतर मुंबईच्या हातात आहे, असा वाटत होता. तिथे चेन्नई ने बाजी पणाला लावत यश खेचून आणले.

Leave a Reply