PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका |  कामगार नेते सुनील शिंदे 

PMC Contract Employees Bonus | कामगार उपायुक्तांची कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांना (Contractors) काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी केली आहे. (PMC Pune)

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनेकदा मागणी करूनही बोनस देण्यात येत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी पासून आमरण उपोषण आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर सुरू केले. या आंदोलनाची दखल घेऊन कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथील सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना पेमेंट ऑफ  बोनस ऍक्ट हा कायदा लागू होतो.  त्याप्रमाणे बोनस अदा करण्याचे आदेश मनपा व संबंधित कंत्राटदारांना दिले. या आदेशाप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील मुख्य कामगार सल्लागार यांनी पुणे मनपा मधील सर्व कंत्राटदारांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना  दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याचे आदेश दिनांक 3/11/2023 रोजी दिले. परंतु अद्याप पर्यंत सदर आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे. त्याचप्रमाणे कांत्राटी कामगार अधिनियम व पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट या दोन्ही कायद्याचे उल्लंघन मनपाच्या कंत्राटदारांकडून झालेले आहे. त्यामुळे अशा सर्व कंत्राटदारांवर आपण म्हणजेच पुणे महानगरपालिकेने कारवाई करावी, त्यांना काळे यादीत टाकावे व अशा कंत्राटदारांना पुन्हा महानगरपालिकेमध्ये कंत्राट देऊ नये. अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार साहेब यांच्याकडे केली आहे.