PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांना अजून बोनस नाही | मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका |  कामगार नेते सुनील शिंदे 

PMC Contract Employees Bonus | कामगार उपायुक्तांची कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांना (Contractors) काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी केली आहे. (PMC Pune)

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनेकदा मागणी करूनही बोनस देण्यात येत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी पासून आमरण उपोषण आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर सुरू केले. या आंदोलनाची दखल घेऊन कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथील सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना पेमेंट ऑफ  बोनस ऍक्ट हा कायदा लागू होतो.  त्याप्रमाणे बोनस अदा करण्याचे आदेश मनपा व संबंधित कंत्राटदारांना दिले. या आदेशाप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील मुख्य कामगार सल्लागार यांनी पुणे मनपा मधील सर्व कंत्राटदारांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना  दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याचे आदेश दिनांक 3/11/2023 रोजी दिले. परंतु अद्याप पर्यंत सदर आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे. त्याचप्रमाणे कांत्राटी कामगार अधिनियम व पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट या दोन्ही कायद्याचे उल्लंघन मनपाच्या कंत्राटदारांकडून झालेले आहे. त्यामुळे अशा सर्व कंत्राटदारांवर आपण म्हणजेच पुणे महानगरपालिकेने कारवाई करावी, त्यांना काळे यादीत टाकावे व अशा कंत्राटदारांना पुन्हा महानगरपालिकेमध्ये कंत्राट देऊ नये. अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार साहेब यांच्याकडे केली आहे.

Contract Employees Salary | कंत्राटी कामगारांचे वेतन दोन दिवसांत देण्याचे आदेश | कामगार विभागाकडून सर्व खात्यांना ठेकेदारांना सूचना करण्याचे आदेश जारी

Categories
Breaking News PMC social पुणे

Contract Employees Salary | कंत्राटी कामगारांचे वेतन दोन दिवसांत देण्याचे आदेश

| कामगार विभागाकडून सर्व खात्यांना ठेकेदारांना सूचना करण्याचे आदेश जारी

Contract Employees Salary | पुणे | महापालिकेत (Pune Municipal Corporation) विविध खात्यांत ठेकेदार मार्फत कंत्राटी कर्मचारी (Contract Employees) घेण्यात येतात. या कंत्राटी कामगारांना दिवाळी सण निमित्ताने येत्या दोन दिवसांत वेतन देण्याचे  आदेश प्रभारी मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale) यांनी दिले आहेत. (PMC Pune News)
पुणे महापालिकेतील (PMC Pune) विविध खात्यात विकास कामे करण्यासाठी ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी घेतले जातात. या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्या प्रमाणे वेतन देण्याची संबंधित ठेकेदाराची आहे. मात्र बऱ्याचदा ठेकेदाराकडून वेळेवर वेतन दिले जात नाही. अशातच दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे यात कामगार विभागाने लक्ष घातले आहे. या कर्मचाऱ्यांना 8 तारखेच्या आत वेतन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठेकेदारांना याबाबत सूचना कराव्यात असे आदेशात म्हटले आहे. प्रभारी मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. महापालिकेतील सर्व खाती आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. (Pune PMC News)
—-

PMC Contract Employees Bonus | मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर | ठेकेदारांनी बोनस अदा करण्याचे कामगार उपायुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Bonus | मनपाच्या कंत्राटी कामगारांना  दिवाळी बोनस जाहीर | ठेकेदारांनी बोनस अदा करण्याचे कामगार उपायुक्तांचे आदेश

| सुनील शिंदेच्या आमरण उपोषणाला यश

PMC Contract Employees Bonus | पुणे | बोनस अधिनियमाच्या तरतुदीनुसार महापालिकेच्या कंत्राटी कामगाराना बोनस देणे ठेकेदारावर बंधनकारक आहे. त्यानुसार ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे आदेश कामगार उपायुक्त यांनी दिले आहेत. तसे पत्र कामगार उपयुक्तानी महापालिका आयुक्तांना दिले आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय कामगार नेते सुनील शिंदे यांनी देखील आपले आमरण उपोषण माघारी घेतले आहे. (Diwali Bonus News)
पुणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते म्हणजे पुणे मनपाचे साफसफाई, वेहिकल डेपो, स्मशानभूमी, कीटकनाशक, सुरक्षारक्षक, आरोग्यविभाग, पाणीपुरवठा, गार्डन अशा विविध खात्यातील सुमारे 10,000  कंत्राटी कर्मचारी.
हे सर्व अदृश्य हात राबतात त्यामुळेच पुणे शहरातील नागरिकांचे आयुष्य हे निरोगी राहत पण विरोधाभास असा की या सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन, युनिफॉर्म, सामाजिक सुरक्षा वेळेवर भेटत नाही किंवा भेटतच नाही. गेली 2 वर्ष राष्ट्रीय मजदूर संघटने मार्फत
सातत्याने कामगार उपायुक्त कार्यालय पुणे व पुणे मनपा प्रशासनाचा कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनस बाबत पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नव्हते. कंत्राटी कामगार अधिनियम 1971 नुसार दिवाळी बोनस
हक्काच असूनही मिळत नाही यासाठीच राष्ट्रीय मजदूर संघटने (RMS) मार्फत सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर गेले 3 दिवस चालू होते.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला व प्रश्न समजावून घेतले या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व इन्स्पेक्टर पाठवून प्रकरणाची चौकशी केली. यानंतर अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व माधव जगताप तसेच मुख्य  कामगार अधिकारी  नितीन केंजळे यांच्या सोबत बैठक झाली असता कामगार उपायुक्ता कडून कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याबाबत पत्र आणण्यास सांगितले. त्यानुसार कामगार उपायुक्ता कडून पत्र मिळाल्यानंतर मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी बोनस ॲक्ट नुसार ठेकदारांनी दिवाळी पूर्वी बोनस द्यावा अस लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदेंनी यांना दिलं. तसेच ठेकेदाराकडून बोनस देण्यास विलंब झाल्यास पुणे मनपा प्रशासन ठेकेदाराला उसने पैसे देऊन कामगारांना बोनस देतील असे आश्वासन दिले.
गेली 10 वर्ष कंत्राटी कामगारांना बोनस मिळत नव्हता संघटनेच्या लढ्यामुळे व कामगारांच्या एकाजुटीमुळे हा एतिहासिक निर्णय झाला असे राष्ट्रीय मजदुर संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपोषण सोडताना सांगितले.
यानंतर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आमरण उपोषण सुरक्षा अधिकारी केंजळे व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  अरविंद शिंदे यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडलं.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  अरविंद शिंदे यांच्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचा प्रश्न हा लवकर मार्गी लागला. यावेळी कामगार एकजुटीची गाणी, तसेच बोनस आमच्या हक्काचा, आमचाच लढा न्यायासाठी अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस के पळसे त्याचबरोबर संघटनेचे विविध कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

PMC Contract Employees Portal | कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करा | सुनिल शिंदे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees Portal | कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करा | सुनिल शिंदे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

PMC Contract Employees Portal | महापालिका कंत्राटी कामगारांना वेतन कधी वेळेवर मिळणार असा सवाल कामगार नेते तथा राष्ट्रीय मजदूर संघाचे (Rashtriya Majdur Sangh) अध्यक्ष सुनिल शिंदे (Sunil Shinde) यांनी पुणे महापालिका प्रशासनाला विचारला आहे. तसेच कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल (Portal) तात्काळ सुरू करा,  अशी शिंदे यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)
शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे महापालिकेत (PMC PUNE) मध्ये सुमारे १० हजार कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार कधीच वेळेवर होत नाही. किंबहुना आजपर्यंत कधीही वेळेवर झालेला नाही,या कर्मचाऱ्यांना पगार स्लिप मिळणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु एकही कंत्राटदार पगार स्लिप देत नाही प्राव्हिडंट फंडाची रक्कमही वेळेवर व कायदेशीर भरणा केला जात नाही. कामगार राज्य विमा महामंडळात (इ. एस. आय.सी .) मध्ये सर्व कंत्राटी कामगारांची नोंदणी करून त्यांना ई-पहचान कार्ड कायद्याने देणे बंधनकारक आहे. परंतु त्याचीही पूर्तता आजपर्यंत कंत्राटदारांकडून झालेली नाही. विनाकारण अनेकदा पगार कापला जातो. त्याचे कारणही सांगितले जात नाही. (PMC Pune contract Employees)
शिंदे यांनी म्हटले आहे कि, अनेक कंत्राटदार किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन देत आहेत या सर्व बाबींकडे येथील संबंधित अधिकारी हेतूपुरस्सर डोळेझाक करीत आहेत.  अनेक कंत्राटदारांची अशी प्रकरणे आमच्या संघटनेकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे उघडकीस आणली गेली आहेत. परंतु अशा एकाही कंत्राटदारावर कारवाई झाल्याचे समोर आले नाही. अनेक कंत्राटदार दोन-दोन महिने पगार उशिरा करत आहेत. या सर्व संदर्भामध्ये मी.न.पा. मधील कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर प्रश्नांसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते. त्याची अंमलबजावणी अजून पर्यंत झालेली नाही. याबाबत  प्रशासनाने त्वरित पावले उचलून कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करावे. अशी मागणी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी म.न.पा.प्रशासनाकडे केली आहे.
——-
News Title | PMC Contract Employees Portal | Start independent portal for contract workers immediately | Sunil Shinde’s demand to the municipal administration

IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास

Categories
Breaking News PMC social पुणे

IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास 

 
IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | ‘जर एकही दिवस या कामगारांनी काम बंद केले तर शहराची परिस्थिती किती वाईट होईल?, दिवाळी, गणपती, नवरात्र प्रत्येक वेळी कर्मचारी कामावर हजर असतात. महापालिका प्रशासन कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करत आहे. असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला. गेल्या चार दिवसापासून कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आयुक्तांनी दाखवलेला विश्वास त्यांना दिलासा मानला जात आहे. (IAS Vikram Kumar | PMC Contract Employees)
पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) (PMC Kamgar Union) व कर्मचारी राज्य बिमा निगम,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रमिक भवन येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ई.एस.आय. सी. कार्ड शिबिराचे (ESIC Card Campaign) उद्घाटन आज संपन्न झाले.
विक्रम कुमार आयुक्त पुणे मनपा,चंद्रशेखर पाटील डेप्युटी डायरेक्टर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कंत्राटी कामगारांना  ई.एस.आय. सी. कार्ड देण्यात आले.
विक्रम कुमार – आयुक्त -पुणे मनपा, अरुण खिलारी – मुख्य कामगार अधिकारी पुणे मनपा, संदिप कदम – उपायुक्त पुणे मनपा, चंद्रशेखर पाटील – ई.एस.आय. सी. डेप्युटी डायरेक्टर, चंदन प्रभाकर -ई.एस.आय. सी. असिस्टंट डेप्युटी डायरेक्टर, सुभाष शर्मा -ई.एस.आय. सी. सुप्रिडेंट पुणे, कॉ. उदय भट – अध्यक्ष- पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त), कॉ. मुक्ता मनोहर – जनरल सेक्रेटरी- पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त), सी.पी.औदुच्य – कायदेशीर सल्लागार कॉ. मधुकर नरसिंगे – कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune Municipal Corporation Employees)
‘इ.एस.आय.सी नेहमीच कामगारांना चांगले व दर्जेदार उपचार देण्यासाठी प्रयत्नशील असते, इ.एस.आय.सी सोबत इतर 8 प्रकारच्या योजना कर्मचाऱ्यांसाठी राबवल्या जातात. सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे चंद्रशेखर पाटील डेप्युटी डायरेक्टर यांनी म्हटले.’ (Pmc Pune)
कंत्राटी कामगारांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर ऐनवेळी इ.एस.आय.सी कार्ड काढण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची धावपळ होते, व त्यामुळे उपचार घेण्यास विलंब होतो व नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांना लक्षात घेऊन एकाच जागी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी आजपासून झोन क्रमांक 1 मधील येरवडा – कळस धानोरी, नगररोड – वडगाव शेरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई. एस. आय. सी कार्ड काढून देणे व इतर कार्ड संदर्भातील दुरुस्ती या शिबिरात होणार आहे.
झोन क्रमांक १ मधील सर्व कंत्राटी कामगारांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद आजच्या शिबिरास दिला.
इतर झोन मधील क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तारीख व वेळ कळवली जाईल तेव्हा सर्व कामगारांनी आपले ई. एस. आय.सी. कार्ड काढण्यासाठी श्रमिक भवन येथे यावे. असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
—-

PMC Contract Employees | ESIC | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी हेळसांड नको, अशी मागणी करत कामगार युनियनची निदर्शने!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees | ESIC | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी हेळसांड नको, अशी मागणी करत कामगार युनियनची निदर्शने!

PMC Contract Employees | ESIC |  पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांच्या (Contract Employees) प्रमुख प्रश्नांबाबत आज ई.एस.आय.सी.(ESIC) ऑफिस-बिबवेवाडी, येथे निदर्शने करण्यात आली. मोठ्या संख्येने कंत्राटी कामगारांनी  उपस्थित राहत निदर्शन यशस्वी पार पाडले. या वेळी शिष्टमंडळाने वैद्यकीय अधीक्षक डॉ.बन्सल यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली आणि विविध मागण्या केल्या. (PMC Contract Employees | ESIC)
खालील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली :-
1) ई.एस.आय.सी. (ESIC) ची वेतन मर्यादा 21,000 रुपये वरुन वाढवुन 35,000 रुपये केली पाहिजे.
2) ई.एस.आय.सी. (ESIC) ने  खाजगी हॉस्पिटलच्या सुविधा नाकारणारे, दि.-28-04-2023 रोजी काढलेले आदेश रद्द करुन नविन सुसज्ज हॉस्पिटल सुरु होईपर्यंत पुर्विप्रमाणे खाजगी हॉस्पिटलच्या सुविधा देण्यात याव्यात.
3) पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या सर्व कंत्राटी कामगारांना ई.एस.आय.सी. (ESIC) कार्ड, ई-पेहचान कार्ड, त्वरीत मिळाली पाहिजे.
वरील सर्व प्रश्न लक्षात घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वसन यावेळी देण्यात आले. अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.
—-