Tag: kasba constituency
MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप
कसबा मतदार संघातील (Kasba Vidhan Sabha) मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील (Parvati Vidhan Sabha) कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री, पालकमंत्री व नगरविकास विभागाने कसबा मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पत्रकार परिषदेत केली.
रवींद्र धंगेकर म्हणाले, “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास अशी जवळपास १०० विकासकामे प्रस्तावित होती. २० डिसेंबर २०२२ रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही कामे मंजूर होऊन त्यासाठी १० कोटींचा निधी मान्य करण्यात आला होता.” (MLA Ravindra Dhangekar)
“मात्र, २७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय शुध्दीपत्रक काढून हा निधी कसबा मतदारसंघातील कामांऐवजी पर्वती
मतदार संघामध्ये वळवण्यात आला. हा प्रकार कसबा मतदार संघातही जनतेवर अन्याय करणारा आहे. विकासकामामधे सत्ताधारी राजकारण करू पाहत आहे. कसब्यातील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षातील आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाकडून हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका आमच्या मनात येत आहे. जाणूनबुजून कसबा मतदार संघाला डावलण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेवर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही. या शासन निर्णय बदल करुन पुन्हा कसबा मतदार संघाचा निधी परत द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. (Kasba Consistency)
——-
News Title | MLA Ravindra Dhangekar | Funds of Kasba Constituency diverted to Parbati Constituency Allegation of MLA Ravindra Dhangekar
Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी
| हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट
Kasba Constituency Civic Issues | गेल्या चार महिन्यांपासून कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Constituency) विविध प्रभागांमध्ये सुरू केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांच्या (BJP Offices) माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पेठ विभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जुन्या वाड्यातील ड्रेनेज लाईन, मोठ्या पावसामध्ये नागझरी लगत असणाऱ्या वसाहती मध्ये पावसाळ्यात होणाऱ्या पाणी समस्यांच्या दृष्टीने उपाययोजना करणे, पेठांमधील धोकादायक वाढलेली झाडे व फांद्यांची छाटणी करणे तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे अशा समस्यांचा समावेश आहे. याचे निवारण करण्याबाबतचे निवेदन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. (Kasba Constituency Civic Issues)
या समस्यांमध्ये महापालिकेच्या विविध विभागातील पुढील तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे.
1.पाणीपुरवठा
कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्यांची दखल घेऊन परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. (Pune Municipal Corporation)
2. रस्ते विकास
विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यात पडलेले खड्डे बुजविणे, डांबरीकरण करण्याची गरज आहे. (PMC Pune)
3. पार्किंग
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पार्किंगचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ठिकठिकाणी पार्किंगचे फलक लावलेले नाहीत. तसेच पार्किंगच्या पट्ट्याही अस्पष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.
4. पदपथ
कसबा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश पदपथांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. तसेच पदपथ नादुरुस्त झालेले आहेत. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा अस्पष्ट झाल्या आहेत. मतदारसंघातील पदपथ दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येईल.
5. ड्रेनेज लाईन आणि पावसाळी गटारे
मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत .चेंबर खचलेली आहेत. ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच पावसाळी गटार लाईन मधील राडाराडा काढून ते प्रवाही करण्याची गरज आहे.
6. सुलभ शौचालयांची दुरुस्ती
कसबा विधानसभा मतदारसंघातील वस्ती विभाग आणि जुन्या वाड्यांच्या परिसरामध्ये सुलभ शौचालये दुरावस्था झालेली आहे. दरवाजे बदलणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये नियमितपणे साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आले. कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात.
7. वृक्ष छाटणी
पावसाळा अर्ध्यावर आला तरी देखील मतदारसंघातील धोकादायक पद्धतीने वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कृपया तातडीने वृक्षांची छाटणी करावी
8. पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणा
मतदारसंघात विविध ठिकाणी पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. तसेच काही ठिकाणी नवीन उभारण्याची गरज आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही त्यासाठी उपाय योजना कराव्यात.
विषयांची तातडीने नोंद घेऊन कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी महापालिका आयुक्तांना यावेळी करण्यात आली. (PMC Pune News)
News Title | Request to the Municipal Commissioner to solve the civil problems in Kasba Constituency
कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी
| प्रभू श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याच बरोबर
पुणे| कसब्यातील विधानसभेच्या विजयानेच भारतीय जनता पक्षाला झुकवले आहे. काँग्रेसने प्रभू रामचंद्राला यासाठी साकडे घातले होते. ते मान्य झाले. श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याबरोबर आहे हे यावरूनच सिद्ध होत आहे अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी घरपट्टीतील सवलत पुन्हा लागू करणाऱ्या राज्य सरकारला लक्ष्य केले.
जोशी म्हणाले, मुळातच ही सवलत काढून घेण्याचे काही कारण नव्हते. महापालिका स्वायत्त संस्था आहे. त्यांनी विशेष ठराव करून अनेक वर्षांपूर्वी ही सवलत लागू केली होती. पैसे कसे काढता येतील याच विचारात असलेल्या भाजप सरकारने ही सवलत वेगवेगळी कारणे दाखवत काढून घेतली. या कारणांचा निपटारा सरकारला त्यांच्या स्तरावर आधीच करता येणे शक्य होते. मात्र त्यांनी तसे केले नाही.
नागरिकांकडून ओरडा सुरू झाल्यानंतरही त्याकडे शिंदे फडणवीस सरकारने लक्ष दिले नाही. वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. पुणेकर जनतेला फसवत राहिले.
महापालिका प्रशासनाने ही सवलत काढून घेतलेली बीले तर पाठवलीच, शिवाय त्यात ४ वर्षांपासूनची थकबाकीही दाखवली. साधी सदनिका असलेल्या कुटुंबांवरही यामुळे २० हजार रूपयांपेक्षा जास्त बोजा पडला.
काँग्रेसने या विरोधात सातत्याने आंदोलने केली. अखेर मंत्री मंडळाने ठराव केला, मात्र तरीही प्रशासन बधत नव्हते. मंत्री मंडळही मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उदासिन होते.
पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तर या विषयाची माहिती नसल्यासारखे हात वर केले. काँग्रेसने अखेर प्रभू रामचंद्रांचरणी साकडे घातल्याचे आंदोलन केले. आता सरकारला सुबुद्धी आली व त्यांनी हा निर्णय अंमलात आणण्याविषयी महापालिकेला कळवले. त्यामुळे या गोष्टीचे फुकटचे श्रेय भाजपच्या शहरातील एकाही नेत्याने घेऊ नये, हा पुणेकरांचा विजय आहे व त्यांनाच याचे खरे श्रेय आहे असे जोशी म्हणाले.
कसबा मतदार संघातील वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी काँग्रेस ने महापालिका आयुक्ताकडे केली ही मागणी
कसबा मतदार संघातील जुन्या वाड्यांच्या रखडलेल्या पुनर्विकास बाबत साईड मार्जिन मध्ये १००% सवलत द्यावा व चटई निर्देशांक वाढवावा. अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यानुसार पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर पेशवाई पासून अस्तित्वात असलेल्या व मोडकळीस आलेल्या किमान पाच ते सात हजार वाड्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रचलित बांधकाम नियमावली व विकास आराखड्यात वेळोवेळी गावठाणातील वाड्यांबाबत नियमावलीत वस्तुस्थिती अवलोकन न केल्यामुळे रखडलेला आहे. जवळपास ४ लाखाहुन जास्त संख्येने पुणेकर या जीवितास धोकादायक व मोडकळीस असलेल्या बांधकाम वास्तूमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी
| आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात
पुणे : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. कसब्याच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रभाग 16,17,18,19 आणि 29 अशा सर्व प्रभागातील विकासकामासाठी प्रत्येकी 2 कोटीची तरतूद करण्याची मागणी आमदार धंगेकर यांनी आयुक्ताकडे केली आहे.
दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. यामध्ये मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा केला. पुणेकरांच्या मिळकत करात ४० टक्के सूट द्यावी, मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारू नये, पेठांच्या भागांमध्ये समानदाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशा विविध मागण्या केल्या.
त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस वीरेंद्र किराड, प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी रमेश अय्यर, कसबा कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव कान्होजी जेधे, आदी उपस्थित होते. या भेटीवेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी रवींद्र धंगेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.
याप्रसंगी रवींद्र धंगेकर म्हणाले की, संपूर्ण देशात पुण्यात मिळकत कर सर्वाधिक असून नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारला जाऊ नये. त्यामुळे छोट्या सदनिका धारकांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात विधीमंडळात मी प्रश्न उपस्थित करणार असून राज्यशासनाकडे त्याचा मी पाठपुरावा करेन. असे सांगून ते म्हणाले की, याबरोबरच पेठांच्या भागांमध्ये दाट वस्ती असून तेथे पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याकरिता योग्य नियोजन करून आमलात आणावे अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.
या सर्व प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने विचार करेल आणि योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले.
| गुरुवारी घेणार शपथ
दरम्यान विधिमंडळ सभागृहात विधानसभा सदस्य म्हणून आसनस्थ होण्यासाठी आधी शपथ घेणे आवश्यक असते. त्यानुसार आमदार रविंद्र धंगेकर यांना गुरुवारी शपथ दिली जाणार आहे. विधिमंडळाकडून तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पुण्यात कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसबा मतदारसंघातून धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर मात केली. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा येऊ इशारा दिला आहे.
“कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!,” असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले आहेत.
यामुळे लवकरच पुन्हा विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र महापालिका निवडणुकांचे काय, याबाबत मात्र काहीच उत्तर मिळत नाही. यामुळे कार्यकर्ते मात्र हवालदिल झाले आहेत.
कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो.
पण, एक नक्की सांगतो,
आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!#KasbaByElection #BJP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2023
रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील
पुणे | कसबा पेठ पोटनिवडणूक ही राज्य नाही तर देशभर गाजत होती. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेस चे रवींद्र धंगेकर यांच्यात चांगलीच टक्कर बघायला मिळाली. मतदान झाल्यानंतर दरम्यान दोन्हीकडील कार्यकर्ते सांगत आहेत कि आम्हीच निवडून येणार. रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स देखील लावले. मात्र ते काही वेळातच हटवावे लागले.
मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले होते. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी होणार आहे. पण दोन दिवस अगोदरच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची आमदारपदी (MLA) निवड झाल्याचे फ्लेक्स पुण्यात लावण्यात आले आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स असावा तर धंगेकर यांच्यासारखा… दोन दिवस आधीच विजयाचा फलक लावल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, सिंहगड रस्त्यावरीस वडगाव बु. येथील फलक लावल्यानंतर आवघ्या दोन तासातच ते काढण्यात आले.
२ लाख ७५ हजार ६७९ मतदार तर २७० मतदान केंद्रावर होणार मतदान
| कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वितरण
पुणे | कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी २७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ६०० पोलीस कर्मचारी व ८३ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*मतदान कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था*
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या ४३ बसेस, ७ मिनीबस आणि १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता.
*टपाली मतदानाची सुविधा*
निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी ५४ कर्मचारी कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या ५४ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार आज संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
00000