Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बैठक

 

Phule Smarak Pune |  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule)आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा(Phule Wada)  तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा (Bhide Wada) येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतीकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला. (Pune Local News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व्हीसीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्य, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेला त्याग याची माहिती शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देणारे थिएटर, युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तुसौंदर्यात भर घालणारे असले पाहिजे, त्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Bhide Wada Smarak | PMC Pune | भारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारकासाठी जमीनदोस्त! | पोलीस बंदोबस्तात करण्यात आले काम

Categories
Breaking News PMC social पुणे

Bhide Wada Smarak | PMC Pune | भारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारकासाठी जमीनदोस्त!

| पोलीस बंदोबस्तात करण्यात आले काम

Bhide Wada Smarak | PMC Pune | ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या समाजसुधारक जोडप्याला समर्पित राष्ट्रीय स्मारक उभारण्याची पुणे महापालिका योजना आखत आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची (First girls school of India) इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी (ता. ४) रात्री सुरू केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला हा धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि पोलिसांनी (Pune Police) गनिमी काव्याच्या मार्गाने ही कार्यवाही करत भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. (Bhide Wada National Memorial)
 न्यायालयाच्या आदेशानंतर एक महिन्यानंतर, पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मंगळवारी पहाटे भिडे वाड्याची जीर्ण इमारत उद्ध्वस्त केली, जिथे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
 मुलींसाठी भारतातील पहिली शाळा फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात सुरू केली.  या ठिकाणी समाजसुधारक जोडप्याला समर्पित राष्ट्रीय स्मारक बांधण्याची नागरी संस्था योजना आखत आहे, अधिकाऱ्यांनी सांगितले.  मात्र, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जागा रिकामी करण्यास नकार देत न्यायालयात धाव घेतली होती.
 मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पुणे महापालिकेला जागेवर राष्ट्रीय स्मारक बांधण्याचा मार्ग मोकळा केला आणि जीर्ण इमारतीतील दुकान मालक आणि भाडेकरूंना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले.
 “कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू आणि आम्ही त्या जागेवर राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाशी संबंधित कामासाठी पुढे जाऊ,” असे पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान महापालिकेने  इमारत उद्ध्वस्त केल्याने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मध्यरात्रीनंतर काही वेळाने वाडा पूर्णपणे पाडण्यात आले.

BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव

Categories
Breaking News PMC Political social पुणे

BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव

पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश – हेमंत रासने

 

BJP Pune | Bhide Wada Smarak | स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उगडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Dnyanjyoti Savitribai Phule) यांनी बुधवार पेठेतील भिडे वाडा (Bhide Wada Budhwar Peth) येथे पहिली शाळा (First school in pune) सुरु केली होती. गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक (National Memorial)  उभारण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. परंतु न्यायलयात सुरु असणाऱ्या खटल्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण झाली होती. आज उच्च न्यायालयाने महापलिका तसेच सरकारच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. यानंतर भारतीय जनता पार्टी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Constituency) माध्यमातून साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले, आजच्या क्षणाची लाखो नागरिक वाट पाहत होते. देशातील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथे सुरु करण्यात आली होती, न्यायलयाने महापलिका आणि सरकारच्या बाजूने निर्णय दिल्याने आता राष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मी मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांच्या प्रयत्नांतून आज हा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांच्या वाट्याला आला आहे. (Bhide Wada Smarak News)

कसबा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र काकडे, नगरसेवक योगेश समेळ ,मनिषा लडकत, संजयमामा देशमुख. युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक,धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर,किरण जगदाळे, संदिप लडकत, यशोधन आखाडे, तुषार रायकर, चंद्रकांत पोटे, जयदिप शिंदे,प्रणव गंजीवाले, निर्मल हरिहर, सनी पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (Bhide Wada National Memorial)

भिडेवाड्यातील भाडेकरू संदर्भातील वाद न्यायालयात होता. यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावण्यात आली. भिडे वाड्यातील काही भाडेकरूंनी रोख मोबदला मागितला होता. महापालिकेकडून त्याची तयारी देखील दर्शवण्यात आली होती. परंतु हा वाद न्यायलयात गेल्याने कामाला विलंब होत गेला. अखेर हा खटला पालिकेने जिंकल्याने भिडे वाड्याचे स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने महत्वपूर्ण असे प्रयत्न केले गेले. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने हे यश मिळाले आहे. (Bhide wada national memorial high court)

Bhide Wada Smarak News | भिडे वाडा स्मारक बाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Bhide Wada Smarak News | भिडे वाडा स्मारक बाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

 

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐन नवरात्रोत्सवातच न्यायालयाने हा निकाल दिल्याने महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार असून भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन, बळ देईल,

| उपमुख्यमंत्री अजित पवार

————-

पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे,मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती, राज्य शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे, आता लवकरच भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल,सर्व पुणेकरांचे अभिनंदन-

| प्रमोद नाना भानगिरे (शिवसेना शहरप्रमुख, पुणे)


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा साक्षीदार असलेला भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकात रूपांतरित व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होता. आज उच्च न्यायालयाने भिडे वाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने या संघर्षाला निर्णायक यश मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः अनेकदा भिडे वाड्यास भेट देऊन तेथील दुकानदार, नागरिक यांच्यासोबत चर्चा केली होती. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या विषयात जातीने लक्ष घालून या संघर्षात आपले योगदान दिले होते. “आजच्या निकालाने आमच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना असून याठिकाणी भव्य स्मारक व्हावे हे स्वप्न पूर्णत्वास जाणार ही बाब अतिशय आनंदाची आहे.”

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप


भिडेवाडा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटला महापालिकेने, सरकारने जिंकला. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला त्यामुळे दीपावली आगोदर दीपावली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यातील भिडे वाडा येथे साजरी केली. गेल्या कित्येक वर्ष्यापासून आंबेडकरी चळवळ आणि रिपबकिकन पार्टी ऑफ इंडिया भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आग्रही होता खुप मोठ्या प्रमाणात आंदोलनं ही केली गेली त्यामुळे आज तो आंनद कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला


 

Pune Bhide Wada Memorial | CM Eknath Shinde | भिडे वाडा स्मारकाच्या कामाला लवकर सुरूवात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे महाराष्ट्र

Pune Bhide Wada Memorial | CM Eknath Shinde | भिडे वाडा स्मारकाच्या कामाला लवकर सुरूवात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Pune Bhide Wada Memorial | CM Eknath Shinde | पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात (Pune Bhide Wada) दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक (Bhide Wada Will be the National Memorial) होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) आणि महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.

पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता खंडाळा)येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्व बाबींची पूर्तता करून स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.