Bhide Wada Smarak News | भिडे वाडा स्मारक बाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Bhide Wada Smarak News | भिडे वाडा स्मारक बाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

 

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐन नवरात्रोत्सवातच न्यायालयाने हा निकाल दिल्याने महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार असून भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन, बळ देईल,

| उपमुख्यमंत्री अजित पवार

————-

पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे,मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती, राज्य शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे, आता लवकरच भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल,सर्व पुणेकरांचे अभिनंदन-

| प्रमोद नाना भानगिरे (शिवसेना शहरप्रमुख, पुणे)


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा साक्षीदार असलेला भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकात रूपांतरित व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होता. आज उच्च न्यायालयाने भिडे वाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने या संघर्षाला निर्णायक यश मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः अनेकदा भिडे वाड्यास भेट देऊन तेथील दुकानदार, नागरिक यांच्यासोबत चर्चा केली होती. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या विषयात जातीने लक्ष घालून या संघर्षात आपले योगदान दिले होते. “आजच्या निकालाने आमच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना असून याठिकाणी भव्य स्मारक व्हावे हे स्वप्न पूर्णत्वास जाणार ही बाब अतिशय आनंदाची आहे.”

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप


भिडेवाडा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटला महापालिकेने, सरकारने जिंकला. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला त्यामुळे दीपावली आगोदर दीपावली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यातील भिडे वाडा येथे साजरी केली. गेल्या कित्येक वर्ष्यापासून आंबेडकरी चळवळ आणि रिपबकिकन पार्टी ऑफ इंडिया भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आग्रही होता खुप मोठ्या प्रमाणात आंदोलनं ही केली गेली त्यामुळे आज तो आंनद कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला