BJP Vs MLA Ravindra Dhangekar | आमदार धंगेकरांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी! | भाजपा नेते हेमंत रासने यांचा टोला

Categories
Breaking News Political पुणे

BJP Vs MLA Ravindra Dhangekar | आमदार धंगेकरांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी! | भाजपा नेते हेमंत रासने यांचा टोला

BJP Vs MLA Ravindra Dhangekar |  कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांचे आरोप अपूऱ्या माहितीच्या आधारे आहेत. जिल्हा नियोजन आणि नगरविकास विभागाच्या कामांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यावी, आणि मगच आरोप करावेत, असा टोला भाजपा नेते हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आज लगावला. (BJP Vs MLA Ravindra Dhangekar)
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला असून, निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, ते म्हणाले होते. (Kasba Consistency)
त्याला उत्तर देताना हेमंत रासने म्हणाले की, नामदार चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. कोणावरही अन्याय करण्याची त्यांची भूमिका नसते. जिल्हा नियोजन मधून सन २०२२-२३ मध्ये लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे निधीचे वाटप झाले आहे. त्यामुळे अपूऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. (Parvati Constituency)
रासने पुढे म्हणाले की, धंगेकर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. जिल्हा नियोजन आणि महापालिकेच्या माध्यमातून नगरविकासकडून करण्यात येणाऱ्या कामांचा कोणताही संबंध नाही. कसबा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे इथली बहुतांश कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका करते. दिवंगत आमदार मुक्ताताई यांनी आपल्या कार्यकाळात जी कामे दिली होती. त्या कामाचा निधी मंजूर झाला होता. त्यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत रविंद्र धनगेकर निवडून आल्यानंतर त्यांनीही त्यांचीच कामे आपल्या नावाने दाखवून श्रेय लाटण्याचा प्रकार धनगेकर करत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
——
News Title | BJP Vs MLA Ravindra Dhangekar | MLA Dhangekar should get full information first! | BJP leader Hemant Rasane’s entourage

MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप

 

कसबा मतदार संघातील (Kasba Vidhan Sabha) मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील (Parvati Vidhan Sabha) कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री, पालकमंत्री व नगरविकास विभागाने कसबा मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पत्रकार परिषदेत केली.

रवींद्र धंगेकर म्हणाले, “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास अशी जवळपास १०० विकासकामे प्रस्तावित होती. २० डिसेंबर २०२२ रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही कामे मंजूर होऊन त्यासाठी १० कोटींचा निधी मान्य करण्यात आला होता.” (MLA Ravindra Dhangekar)

“मात्र, २७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय शुध्दीपत्रक काढून हा निधी कसबा मतदारसंघातील कामांऐवजी पर्वती 
मतदार संघामध्ये वळवण्यात आला. हा प्रकार कसबा मतदार संघातही जनतेवर अन्याय करणारा आहे. विकासकामामधे सत्ताधारी राजकारण करू पाहत आहे. कसब्यातील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.  विरोधी पक्षातील आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाकडून हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे की काय,  अशी शंका आमच्या मनात येत आहे. जाणूनबुजून कसबा मतदार संघाला डावलण्याचा हा प्रयत्न आहे.  जनतेवर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही. या शासन निर्णय बदल करुन पुन्हा कसबा मतदार संघाचा निधी परत द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. (Kasba Consistency)

——-

News Title | MLA Ravindra Dhangekar | Funds of Kasba Constituency diverted to Parbati Constituency Allegation of MLA Ravindra Dhangekar

Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

Shasan Aapalya Dari |  ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या (Parvati Costituency) आमदार माधुरीताई मिसाळ (MLA Madhuri Misal) यांच्या माध्यमातून हा उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी आज सकाळी दत्तवाडी येथील आगरवाल शाळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. (Shasan Aapalya Dari)

यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांतर्गत ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रमात सर्व शासकीय दाखले व योजना नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. (Shasan Aapalya Dari News)

या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्षम आमदार  माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याची माहिती व अर्ज तसेच ऑनलाईन प्रक्रिया येथे करण्यात आली.

या सर्व गोष्टींचा लाभ दत्तवाडी परिसरातील अनेक नागरिक घेत आहेत.

हा कार्यक्रम आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार, बारटक्के मॅडम उपस्थित होत्या.

यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्व नागरी सुविधांची माहिती दिली.

याप्रसंगी  पर्वती मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

तरी सर्व नागरिकांनी ‘ शासन आपल्या दारी ‘ या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले.


News title | Shasan Aapalya Dari | Enthusiastic response to the ‘Shasan Apya Dari’ initiative in Parvati Constituency