Job Seekers | पाचवी पासून ते बीटेक पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी | जाणून घ्या सविस्तर 

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Job Seekers | पाचवी पासून ते बीटेक पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी | जाणून घ्या सविस्तर

| जेजुरी येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात ५ हजारावर रिक्त पदांच्या भरतीची संधी

Job Seekers | शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत (Shasan Aapaya Dari Abhiyan) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (Jejuri) येथे १३ जुलै रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार (Job Fair) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात ५ हजार २९० रिक्तपदांसाठी भरतीची संधी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे. (Job Seekers)

जेजुरी येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इयत्ता पाचवी, दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधारक, आयटीआय, बीई-बीटेक आदी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये टूल अँड डाय मेकर, फिटर, वेल्डर, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, वीजतंत्री, असेंबली लाईन ऑपरेटर, विक्री अधिकारी, लेखापाल, बँकेमध्ये पर्यवेक्षक, विक्री समन्वयक, प्रक्षिणार्थी, रासायनिक पदविकाधारक, हाऊस किपींग, निर्माता क्षेत्रातील पुरवठादार, गुणवत्ताधारक, मशीन ऑपरेटर, रंगारी, टर्नर, मॅकनिकल संचालक, वाहनचालक, वैज्ञानिक, शैक्षणिक सल्लागार, व्यवसाय विकास व्यवस्थापक, ग्राहक प्रतिनिधी, बॉयलर ऑपरेटर, डिझायन अभियंता, पेट्रोल-डिझेल फिलींग, मिलर, ग्रांडर, बीई इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल आदी रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावे. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छूक उमेदवारांनी या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या बायोडाटा सह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. इच्छुकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.
0000

News Title | Job Seekers | Job opportunity for candidates from 5th to B.Tech Know in detail

Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

Shasan Aapalya Dari |  ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या (Parvati Costituency) आमदार माधुरीताई मिसाळ (MLA Madhuri Misal) यांच्या माध्यमातून हा उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी आज सकाळी दत्तवाडी येथील आगरवाल शाळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. (Shasan Aapalya Dari)

यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांतर्गत ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रमात सर्व शासकीय दाखले व योजना नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. (Shasan Aapalya Dari News)

या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्षम आमदार  माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याची माहिती व अर्ज तसेच ऑनलाईन प्रक्रिया येथे करण्यात आली.

या सर्व गोष्टींचा लाभ दत्तवाडी परिसरातील अनेक नागरिक घेत आहेत.

हा कार्यक्रम आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार, बारटक्के मॅडम उपस्थित होत्या.

यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्व नागरी सुविधांची माहिती दिली.

याप्रसंगी  पर्वती मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

तरी सर्व नागरिकांनी ‘ शासन आपल्या दारी ‘ या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले.


News title | Shasan Aapalya Dari | Enthusiastic response to the ‘Shasan Apya Dari’ initiative in Parvati Constituency

Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Shasan Aapalya Dari | पर्वती विधानसभा मतदार संघ (Parvati Constituency) अंतर्गत ५ जुन  रोजी ग्लोबल हॉस्पिटल समोरील अग्रवाल शाळा दत्तवाडी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाला आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal)उपस्थित राहणार आहेत. (Shasan Aaplaya Dari)

विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी एकत्र येवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अभियांनातर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती पोहोचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, योजनेचा आणि सेवेचा प्रत्यक्ष लाभ देणे आदी कामे करण्यात येतील. (Shasan Aapalya Dari news)

नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राधिका हावळ- बारटक्के यांनी केले आहे. (Parvati Constituency)
000

News Title | Shasan Aapalya Dari | ‘Government at your door’ initiative in Parvati Constituency