Mohan Joshi vs Chandrakant Patil : राहुल गांधींना उपदेश करण्यापेक्षा महागाईवर बोला : माजी आमदार मोहन जोशी यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला

Categories
Breaking News Political पुणे

राहुल गांधींना उपदेश करण्यापेक्षा महागाईवर बोला

: माजी आमदार मोहन जोशी यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला

पुणे – हिंदू आणि हिंदुत्व यावर खासदार राहुल गांधी यांनी भाष्य केलं, आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यावर उपदेश करण्यापेक्षा सध्याच्या वाढत्या महागाईबद्दल बोलावे आणि त्याचा निषेध करावा, असा टोला माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी लगावला.

हिंदू आणि हिंदुत्व यावर राहुल गांधी यांच्या मनात संभ्रम असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आणि हिंदू आहात, तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचा निषेध करा ! असा उपदेश त्यांनी खासदार राहुल गांधी यांना केला. याचा समाचार घेताना मोहन जोशी म्हणाले, राहुल गांधी हे काँग्रेसचे अखिल भारतीय नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाची उंची चंद्रकांत पाटील गाठू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींना उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांना ते शोभत नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी पाटलांना बराच वेळ लागणार आहे. त्यांनी अशा भानगडीत पडू नये.

यापेक्षा मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाई वाढते आहे, त्याविरुद्ध आवाज उठवून चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध करावा. तसेच, पाटील यांना पुण्यातून आमदारकी मिळालेली आहे. पुणे महापालिकेत त्यांच्याच भाजपची सत्ता आहे आणि नदी सुधारणा, २४तास पाणीपुरवठा योजना असे लांबलेले प्रकल्प तसेच रस्त्यातील खड्डे यावर पाटील यांनी मतप्रदर्शन करावे. आपल्या पक्षाचे अपयश झाकून ठेवू नये, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

Fines Imposed on Motorists : Mohan Joshi : केंद्र सरकारने वाहनचालकांवर लावलेल्या जाचक दंडास राज्य सरकारने  स्थगिती द्यावी   : माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी 

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

केंद्र सरकारने वाहनचालकांवर लावलेल्या जाचक दंडास राज्य सरकारने  स्थगिती द्यावी

– माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

पुणे – दुचाकी वाहनचालक आणि कारचालकांवर केंद्र सरकारने जाचक दंडात्मक कारवाईचे नियम आणले आहेत. दि. १ डिसेंबरपासून त्याप्रमाणे दंड आकारणी चालू झाली आहे. राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी स्थगित करुन लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

केंद्र सरकारने सुधारित वाहन कायदा लागू केला आणि हेल्मेट परिधान न केल्यास एक हजार रुपये दंड, तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करणे तसेच काय सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड असे नियम केले आहेत आणि १ डिसेंबरपासून पुण्यात या नियमांनुसार दंडवसुली चालू झालेली आहे. सीसीटीव्हीमध्ये नोंदविल्या गेलेल्या काही नियमभंगाच्या प्रकरणातही नव्या दंड आकारणीच्या नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत. सद्य स्थितीत दसपट वाढवलेला दंड भरणे नागरिकांना अवघड असून, त्यांच्यात त्याविषयी असंतोष निर्माण झाला आहे. कोरोना साथीच्या काळात काही निर्बंध लावले गेले. परिणामी सर्वच घटकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. अनेक कुटुंबांमध्ये वैद्यकीय कारणांमुळे बराच खर्च झाला. अशा परिस्थितीत दंडात्मक कारवाई हा जाचक भुर्दंड आहे, तरी याची दखल घेऊन त्या दंडवसुलीला परवानगी द्यावी असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

दुचाकी वाहनचालकांनी स्वतच्या सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करायला हवे, त्याला आमचा विरोध नाही. पण, जाचक दंडवसुलीला मात्र विरोध आहे. अशी भूमिकाही जोशी यांनी मुख्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त मांडली आहे आणि मुख्य मंत्री त्याची योग्य ती दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Service-Duty-Sacrifice Week : शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता : मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

Categories
Political पुणे महाराष्ट्र

शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता

: मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

: सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात १९७१ च्या युद्धातील वीर सैनिकांचा सन्मान

पुणे : “भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी धाडसाने आणि धीराने प्रत्येक प्रश्न हाताळला. बांगलादेश मुक्ती संग्रामात इंदिराजींचे आणि माणिक शॉ यांच्या नेतृत्वातील भारतीय सैन्याचे मोठे योगदान आहे. देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा निर्णय घेत इंदिराजींनी भारताला प्रगतीपथावर नेतानाच शत्रू राष्ट्राला भारताकडे वाकड्या नजरेने बघू नका, असा इशारा दिला. स्वतंत्र भारताला मजबूत राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात इंदिरा गांधी आणि भारतीय सैन्याचे अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. इंदिराजींना खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ अशी उपमा दिली होती, ही आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर सैनिकांचा, वीरमाता व वीरपत्नींना सुवर्ण विजय महोत्सवानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश कमिटीचे वीरेंद्र किराड, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक विनोद मथुरावाला, लता राजगुरू, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

सुनील केदार म्हणाले, “इतिहास नीटपणे माहित असेल, तर उज्ज्वल भविष्याचा प्रवास चांगला होतो. अनेक शूर-वीरांच्या बलिदानातून, योगदानातून हा स्वतंत्र भारत देश सक्षमपणे प्रगतीपथावर चालत आहे. मात्र, आजच्या पिढीतील अनेकांना स्वातंत्र्य लढ्याचे महत्व समजत नाही. त्यामुळे शूर-वीरांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला नीटपणे सांगण्याची आवश्यकता आहे. सैन्यातील लोकांसोबत बोलताना सुद्धा स्फूर्ती चढते. देशाचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखली पाहिजे. इतिहास समजून घेत, शूर-वीरांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. स्वातंत्र्यलढ्यासह पाकिस्तान, चीन यांच्यासोबत झालेल्या युद्धांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “युद्धातील वीर जवान, बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतीय सैन्याच्या १९७१ मधील या शौर्याचा स्वर्ण विजय महोत्सव आपण साजरा करतो.” कर्नल साळुंखे, कर्नल पाटील यांनीही आपले अनुभव सांगितले. लेखा नायर यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य पुरंदरे आभार मानले.
——————-
या वीरांचा झाला सन्मान

१९७१ च्या युद्धातील योगदानाबद्दल कर्नल सदानंद साळुंके, शहीद मेजर दडकर यांच्या वीरपत्नी गीता दडकर, कर्नल संभाजी पाटील, लेफ्टनंट कर्नल सुरेश शिंदे, सुभेदार संपत कोंडे, वायुदलातील रामचंद्र शेंडगे, विठ्ठल बाठे, शहीद हवालदार प्रल्हाद दिघे (वीरपत्नी लक्ष्मीबाई दिघे), शहीद लक्ष्मण जाधव, शहीद तुळशीराम साळुंके (वीरपत्नी मंगलाताई साळुंके), शहीद मारुती माने (वीरपत्नी श्रीमती माने), गोविंद मासाळकर यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच शहीद सौरभ फराटे (वीरमाता मंगल फराटे), शहीद शिवाजी भोईटे (स्वप्ना भोईटे), मेजर लेखा नायर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

Ghanshyam Nimhan : Blood donation Camp : कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद  : सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम 

Categories
Political पुणे

कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

: सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम

पुणे : रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवाजीनगर काँग्रेस भवन येथे,  भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा श्रीमती सोनियाजी गांधी व मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य या कार्यक्रमा अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या निमित्त आयोजित  केलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक  घनश्याम निम्हण यांनी केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ७६ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळेस रक्तदात्यांना हेल्मेट व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

: सोनिया गांधी आणि मोहन जोशी यांच्या वाढदिवसाचे निमित्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी यांच्या प्रमुख उपस्थिततीत पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, शिवाजीनगर मतदार संघातील, जेष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, पुणेशहर ओबीसी सेल अध्यक्ष  प्रशांत सुरसे, राजु नाणेकर, द स पोळेकर, दिपक ओव्हाळ, आशिष गुंजाळ, राहुल वंजारी, राजेंद्र शिरसाठ, संदिप मोकाटे, राजु साठे, राजाभाऊ कदम, सुमित डांगी, अविनाश बहिरट, सुरेश नांगरे, फैयाज शेख, मुख्तार शेख, संजय मोरे, .संदिप मोरे, जीवन चाकणकर, दत्ता जाधव, चंद्रशेखर कपोते तसेच बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.विठ्ठल आरूडे, मा.विजय सरोदे, मा.विनोद रणपिसे, मा.अनिल कांबळे, मा.प्रशांत टेके, मा.इंद्रजित भालेराव, मा.मैनुद्दीन अत्तार, माजी नगरसेवक मा.नंदलाल धिवार, सोशल मिडीया अध्यक्ष मा.मयुरेश गायकवाड, अल्पसंख्याक सेल विभाग काँग्रेस कमिटी बोपोडी अध्यक्ष मा.साजिद शेख, व मागासवर्ग पुणेशहर अध्यक्षा सौ सुंदरताई ओव्हाळ, बोपोडी ब्लाॅक काँग्रेस प्रभाग क्रमांक ८ च्या अध्यक्षा सौ शोभाताई आरूडे, सौ अक्तरी शेख भाभी, सौ पपिताताई सोनवणे, पुणेशहर सेवादल काँग्रेस कमिटी संघटीका सौ नीता कदम, सौ नाणेकर ताई, सर्व आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व आदरणीय मान्यवर, नागरीक, कार्येकर्ते व बंधु भगिनीनचे अभिनंदन व आभार आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक घनश्याम निम्हण यांनी मानले.

Farmers Law:  किसान संघर्ष की जीत; मोदी के अहंकार की हार : पूर्व विधायक मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र शेती हिंदी खबरे

 किसान संघर्ष की जीत; मोदी के अहंकार की हार

-पूर्व विधायक मोहन जोशी

 पुणे: पूर्व विधायक और प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी ने कहा कि किसान विरोधी कानूनों को रद्द करना किसानों के शांतिपूर्ण संघर्ष की जीत और प्रधानमंत्री मोदी के अहंकार की हार है.
 राष्ट्रपिता महात्मा गांधी की भावना में और उनके शांतिपूर्ण तरीके से, देश के किसानों ने मोदी सरकार के कृषि कानून के खिलाफ लंबी और कड़ी लड़ाई लड़ी. सांसद राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी ने भी इस लड़ाई का पूरा समर्थन किया. महाराष्ट्र में बंद कर दिया.  कृषि कानून के खिलाफ हस्ताक्षर का अभियान चलाया गया. किसानों और शहर के कई नागरिकों ने बंद और हस्ताक्षर अभियान का अनायास ही प्रतिक्रिया दी.   उन्होंने कहा, “इस तरह तरह-तरह के किसानों का पक्ष लेकर इसने लोगों में एक प्रतिक्रिया पैदा की है और फिर केंद्र सरकार को किसान विरोधी कानूनों को लागू करने की कोशिश कर रहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अहंकार को झुकना और हराना है. ऐसा मोहन जोशी ने पत्र में कहा.
 इस आंदोलन के दौरान कई किसान मारे गए.  आज उन किसानों के बलिदान को याद किया जाता है. किसानों के आंदोलन को दबाने के लिए पुलिस बल का प्रयोग किया गया.   बीजेपी के केंद्रीय मंत्री मिश्रा के बेटे ने प्रदर्शन कर रहे किसानों को कुचल दिया और उनकी हत्या कर दी.  सरकारी दमन के विरोध में किसानों ने शांतिपूर्ण विरोध जारी रखा. अंतत: उनके संघर्ष की जीत हुई. यह एक ऐसी घटना है जिसे देश में किसान आंदोलन के इतिहास में नोट किया जाना चाहिए, ऐसा भी मोहन जोशी ने कहा.

Pune Mahila Congress : अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन. 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन.

पुणे: अभिनेत्री कंगणा राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक विधानाविरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने आज राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस दिप्ती चवधरी,भूषण राणभरे,अजित जाधव, द.स. पोळेकर,रमेश अय्यर,राहुल सोनवणे,  उपस्थित होते.
यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रदेश सचिव सोनाली मारणे म्हणाल्या की, “एक विकृत बुद्धीची तीनपाट नटी अन्नदात्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणते, महाराष्ट्राची शान असणाऱया मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते आणि आता समस्त राष्ट्रीय नेते आणि भारतीयांनी प्रचंड संघर्ष करून, गोळ्या झेलून, तूरूंगवास भोगून, लाठ्या काठ्या घेऊन मिळविलेल्या स्वातंत्र्याला भिक म्हणते…. ही विकृती आली कुठून ? हिच्या मुखातून कोणाचे विचार बाहेर पडत आहेत ? याचा विचार करण्याची वेळ आता आलीय…… या विकृत बाईला परवाच आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं अवमूल्यन थांबलं पाहिजे. या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्यासाठी ताबडतोब तिचा पुरस्कार काढून घेणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं हे ऐवढं तरी करावं अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. मागे एकदा खा. प्रज्ञा ठाकूर या दूसर्या एका विकृत बाईने राष्ट्रपिता महात्माजी गांधींबद्दल असंच विधान केलं होतं. भाजपाच्या युवा आघाडीची एक वेडसर पोरगी असंच मागे स्वातंत्र मिळालं नसून करार झाला म्हणाली…..
गांधीजी, नेहरूजी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल संघ परीवाराला एक असूया आहे, राग आहे. कारण ही मंडळी त्या वेळी इंग्रजांच्या बाजूची होती. इंग्रजांशी एकनिष्ठ राहण्याच्या यांनी शपथा घेतल्या होत्या. स्वातंत्र सैनिकांच्या गुप्त खबरा हे इंग्रजांना पूरवायचे, इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. म्हणून संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्याची यांना चिड आहे. ती कंगणाकडून हेच लोक वदवून घेत असण्याची शक्यता आहे…. देशभक्तीचे नारे देऊन, भारतमातेच्या घोषणा देऊन, महापुरूषांचा वारसा आंम्ही चालवतो म्हणत, उठता बसता  वंदे मातरम् म्हणणारे भाजपवाले आता या देशाच्या स्वातंत्र्याचा असा अपमान होताना कुठं लपून बसले आहेत ? मोदीजी का कांहीच बोलत नाहीत, अमित भाईंचं का कांही स्टेटमेंट नाही ? JNU, दिल्ली विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ, जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर खोटे आरोप करून देशद्रोहाचे खटले लादणारं केंद्र सरकार कंगणा नावाची विकृती ठेचणार आहे का ? कि बक्षीस म्हणून तिला भारतरत्न बहाल करणार आहात ?
मोदीजी, आता तूम्हाला १५ आगस्ट, २६ जानेवारीला लाल किल्यावरून देशाला संबोधित करायचा नैतिक अधिकार अबाधीत ठेवाय चचा असेल तर कंगणाचा पद्मश्री काठून घ्या. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करू…
बघू तूमची हिंम्मत आणि बघू तूमचं देशप्रेम “

Mohan joshi : स्मार्ट सिटी योजना : नावलौकीक मोदींचे; पैसा पुणेकरांचा

Categories
PMC Political पुणे

स्मार्ट सिटी योजना : नावलौकीक मोदींचे; पैसा पुणेकरांचा

– माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील एका कामासाठी महापालिकेने ५८ कोटी रुपये देणे म्हणजे नांवलौकीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढवायचा आणिपैसा मात्र पुणेकरांचा खर्च करायचा असा उफराटा प्रकार आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडला अॅडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रकल्पासाठी ५८ कोटी देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. यावर टीका करताना जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे, शहरांच्या विकासासाठी ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना राबविली, त्यातून पुण्यात दोन हजार कोटींची कामे झाली. १४ साली मोदी सरकारनेही चांगली योजना बंद केली. त्यानंतर गाजावाजा करून स्मार्ट सिटी योजना आणली. देशातील १०० शहरांची निवड योजनेसाठी केली. पुण्यासह एकाही शहरात योजना दहा टक्केही यशस्वी झालेली नाही. अशा फसलेल्या योजनेतील कामांसाठी महापालिकेकडून पैसे मिळविणे चालू झाले आहे. पुणेकरांनी कररूपाने महापालिकेला दिलेला पैसा स्मार्ट सिटीला देण्याचा काय संबंध ?

स्मार्ट सिटीला निधी देत बसण्यापेक्षा महापालिकेने तीच कामे करावीत. मोदी सरकारच्या फसलेल्या योजनेसाठी पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

Nana patole : सामाजिक ऐक्य तोडण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही : नाना पटोले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

सामाजिक ऐक्य तोडण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही

– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पुणे : देशातील सामाजिक ऐक्य तोडू पाहाणाऱ्या शक्ती अलिकडे डोके वर काढू पाहात आहेत पण हे प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांच्या सत्कारानिमित्त बोलताना काढले.

बिशप थॉमस डाबरे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिशप हाऊस येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने गुलाबपुष्पाचा गुच्छ भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल, नगरसेवक अविनाश बागवे माजी महापौर कमलताई व्यवहारे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे आदी उपस्थित होते.

शांततेच्या मार्गाने विरोध करीत पुढे चालायचे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्व जातीधर्माचे योगदान आहे आणि ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात जराही सहभाग नव्हता अशा नागपूर केंद्रीत व्यवस्थेतून अल्पसंख्यांकांना त्रास दिला जात आहे.परन्तु डॉक्टर आंबेडकर यांचे संविधान मानणाऱ्या आपल्यासारख्यानी शांततेच्या मार्गाने विरोध करीत पुढे चालायचे आहे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

बिशप थॉमस डाबरे यांच्या कार्याला पन्नास वर्ष यंदा पूर्ण झाली ,असे सांगून प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, पुण्याचे वातावरण शांत आणि सामाजिक सलोख्याचे ठेवण्यात बिशप डाबरे यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

प्रभू येशू यांचा बंधूभावाचा संदेश बिशप डाबरे यांनी समाजात प्रामाणिकपणे रुजविला, असे गौरवोद गार माजी आमदार उल्हास पवार यांनी काढले.

सर्व जाती धर्माच्या लोकांनी देश घडविला हे योगदान मान्य करायला हवे, असे बिशप थॉमस डाबरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. अलिकडे निधर्मी तत्वाला बाधा आणणाऱ्या शक्ती प्रबळ होताना दिसतात याबद्दल बिशप डाबरे यांनी खेद व्यक्त केला. लोकांच्या भल्यासाठी झटणे हे राजकारणी माणसाचे कर्तव्य आहे, त्याचे पालन व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. काँग्रेस पक्षाने सर्व धर्म जाती संस्कृती एकत्र राहाव्यात यासाठी सातत्य ठेवले, असेही ते म्हणाले.

पुणे शहर निधर्मी आहे, असे बिशप डाबरे यांनी सांगितले.मी मराठी असून मराठी भाषेचा मला अभिमान आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, असे उत्कटपणे बिशप डाबरे यांनी सांगितले.