Illegal Construction Circular | राज्यातील सर्व महापालिकामध्ये अनधिकृत बांधकामावर शास्ती माफ करण्यात यावी | घनश्याम निम्हण

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Illegal Construction Circular | राज्यातील सर्व महापालिकामध्ये अनधिकृत बांधकामावर शास्ती माफ करण्यात यावी | घनश्याम निम्हण

Illegal Construction Circular | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्षेत्राकरिता अनधिकृत बांधकामावर शास्ती माफ करण्याबाबत राज्य सरकारकडून  परिपत्रक काढण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व महापालिकांमध्ये शास्ती माफ करण्यात यावी. अशी मागणी शहर काँग्रेस चे चिटणीस घनश्याम निम्हण (Ghanshyam Nimhan) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

निम्हण यांनी नगरविकास विभागाच्या उपसचिवांना दिलेल्या पत्रानुसार महाराष्ट्र अधिनियमातील कलम २६७ अ मधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीतील बांधकामाना शास्ती आकारणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. यानुसार  महानगरपालिकेकडुन अवैध बांधकामावर शास्तीची आकारणी करण्यात येते. याकामी नगर विकास विभागाकडुन ०८/०३/२०१९ रोजी आपल्या राज्यातील केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता अनाधिकृत बांधकामावर शास्ती दर आकारण्याबाबत सुधारणा करण्यात आली होती. आकारण्यात आलेल्या दराबाबत मालमत्ता धारकांनी जशी हवी होती, तशी अवैध बांधकाम शास्ती जमा न केल्याचे आढळून आले. त्यामुळे शास्ती माफ केल्यास मुळ कराचा भरणा होईल व स्थायी उत्पन्नात वाढ होईल, या हेतुने नगर विकास विभागाने, केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील, अवैध बांधकामाना, देय असलेली, शास्ती माफ करणेकांमी, परिपत्रक, निर्गमित केलेले आहे.

निम्हण यांनी पुढे म्हटले आहे कि, परिपत्रक निर्गमित केल्यामुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील अवैध
बांधकामांची शास्ती माफ झालेली आहे. परिपत्रकामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ता धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा लाभ केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील मालमता धारकांना झालेला आहे. आपल्या देशामध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोना महामारीचे पडसाद अजुन संपूर्णतः गेलेले नसुन, आपली जनता आजसुध्दा त्याच्या प्रभावामध्ये होरपळत आहे. असे असताना, परिपत्रक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६७ अ मधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात आल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदरील परिपत्रक संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेमधील अवैध बांधकामाना लागु करणे कायद्याने आवश्यक, बंधनकारक व क्रमप्राप्त होते. तथापि सदरचे परिपत्रक हे केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील अवैध बांधकामानाच लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये भेदभावाचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असुन, यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या  परिपत्रकाचा लाभ संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेच्या हद्दीतील अवैध बांधकामाना झाल्यास, ते जनहिताचे व न्याय्य होणार आहे. तरी याचा विचार करुन, असे परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेमधील अवैध बांधकामाना लागु करणेकांमी योग्य ते आदेश करण्यात यावेत. असे निम्हण यांनी म्हटले आहे. 

Ghanshyam Nimhan | Pune congress | पुणे काँग्रेसच्या चिटणीसपदी घनश्याम निम्हण

Categories
Breaking News Political पुणे

Ghanshyam Nimhan | Pune congress | पुणे काँग्रेसच्या चिटणीसपदी घनश्याम निम्हण

Ghanshyam Nimhan | Pune congress  | घनश्याम निम्हण यांची पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

 निम्हण म्हणाले, मी नागरिकांसोबत फिरणारा काँग्रेस कार्यकर्ता आहे. पक्षाची ध्येयधोरणे समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून काँग्रेस पक्ष बळकट करण्यास प्राधान्य देणार आहे.

Ghanshyam Nimhan | मिळकतकराबाबत आतातरी शहाणे व्हा! | काँग्रेस सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा सरकारला सल्ला

Categories
PMC Political social पुणे

मिळकतकराबाबत आतातरी शहाणे व्हा! | काँग्रेस सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा सरकारला सल्ला

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर काय होते, याचा उत्तम धडा कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मिळाला. पुणेकरांची मिळकतकराची ४० टक्क्यांची सवलत रद्द करून थकबाकीची वसुली करण्याचा प्रकार पुणेकरांवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करून नागरिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार ३१ मार्च पूर्वी कायमची दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. असा सल्ला काँग्रेस चे सरचिटणीस घनश्याम निम्हण यांनी दिला आहे.

निम्हण म्हणाले, गेली वर्षभरापासून पुणेकर त्यांच्यावर लादलेल्या  मिळकतकराच्या थकबाकीने त्रस्त आहेत. या संदर्भात वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला. पालकमंत्री, नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, पण ३१ मार्च जवळ आला तरी त्याबाबत निर्णय झालेला नाही. जेव्हा कसब्याच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्येश्वराबाबत काँग्रेसची भूमिका काय असे विचारत होते, त्यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे गल्लीबोळात कोपरा सभेत मिळकत कराच्या जादा आकारणी बाबत हे सरकार काहीच निर्णय घेत नसल्याचे सांगत होते*. सहाजिकच नागरिकांना मिळकतकराचा प्रश्न महत्त्वाचा वाटला.
राज्य सरकारने १९७० पासून पुणे महापालिकेतील मिळकतकराची ४० टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. यामध्ये महापालिकेने दोन संस्थांकडून शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये जेथे भाडेकरू राहत आहेत आणि ज्यांची घरे बंद आहेत, त्यांचे दुसरे घर असणार असा अंदाज लावत त्यांचीही ४० टक्के सवलत रद्द केली. अशा प्रकारे ९७ हजार ५०० नागरिकांची सवलत रद्द केली. या नागरिकांना २०१९ ते २०२२ या तीन वर्षांतील फरकाची रक्कम भरा, अशा नोटिसा बजावल्याने खळबळ एक उडाली. तीन वर्षांच्या ४० टक्के रकमेच्या वसुलीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तात्पुरती स्थगिती दिली असली तरी पुणेकरांच्या डोक्यावर पाच हजार कोटी रुपयांच्या थकबाकीचा बोजा कायम आहे. त्याची कधीही वसुली होऊ शकते. त्यामुळे याबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. निवासी मिळकतींची ४० टक्के सवलत काढू नये तसेच कोविड सारख्या रोगांवर उपचार (लॉकडाऊन) दरम्यान महानगर पालिकाच दुकाने उघडू देत नव्हती व उघडली तर दंड वसूल केले जात होते अशा आपत्तीत व्यापारी लोकांचे पेकाट मोडलेले आहे आणि देखभाल -दुरुस्तीचा खर्च पाच टक्के कमी केला आहे त्याची वसुली करू नये अशी राज्य सरकारकडे मागणी आहे. ही मागणी मान्य करण्यात तसाही राज्य सरकारला कोणताही आर्थिक भुर्दंड बसणार नाही. पुणे महापालिकेसही त्याचा फटका बसणार नाही, मग निर्णय का होत नाही हा खरा प्रश्न आहे.
 निम्हण पुढे म्हणाले, राज्य सरकारने ४० टक्के सवलत कायम ठेवावी. तसेच महापालिकेने नव्या वर्षात ४० टक्के कर कमी आकारावेत आणि  नव्या बिलातून थकबाकीची रक्कम वगळावी.
—-

Ghanshyam Nimhan : Blood donation Camp : कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद  : सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम 

Categories
Political पुणे

कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

: सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम

पुणे : रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवाजीनगर काँग्रेस भवन येथे,  भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा श्रीमती सोनियाजी गांधी व मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य या कार्यक्रमा अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या निमित्त आयोजित  केलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक  घनश्याम निम्हण यांनी केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ७६ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळेस रक्तदात्यांना हेल्मेट व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

: सोनिया गांधी आणि मोहन जोशी यांच्या वाढदिवसाचे निमित्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी यांच्या प्रमुख उपस्थिततीत पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, शिवाजीनगर मतदार संघातील, जेष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, पुणेशहर ओबीसी सेल अध्यक्ष  प्रशांत सुरसे, राजु नाणेकर, द स पोळेकर, दिपक ओव्हाळ, आशिष गुंजाळ, राहुल वंजारी, राजेंद्र शिरसाठ, संदिप मोकाटे, राजु साठे, राजाभाऊ कदम, सुमित डांगी, अविनाश बहिरट, सुरेश नांगरे, फैयाज शेख, मुख्तार शेख, संजय मोरे, .संदिप मोरे, जीवन चाकणकर, दत्ता जाधव, चंद्रशेखर कपोते तसेच बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.विठ्ठल आरूडे, मा.विजय सरोदे, मा.विनोद रणपिसे, मा.अनिल कांबळे, मा.प्रशांत टेके, मा.इंद्रजित भालेराव, मा.मैनुद्दीन अत्तार, माजी नगरसेवक मा.नंदलाल धिवार, सोशल मिडीया अध्यक्ष मा.मयुरेश गायकवाड, अल्पसंख्याक सेल विभाग काँग्रेस कमिटी बोपोडी अध्यक्ष मा.साजिद शेख, व मागासवर्ग पुणेशहर अध्यक्षा सौ सुंदरताई ओव्हाळ, बोपोडी ब्लाॅक काँग्रेस प्रभाग क्रमांक ८ च्या अध्यक्षा सौ शोभाताई आरूडे, सौ अक्तरी शेख भाभी, सौ पपिताताई सोनवणे, पुणेशहर सेवादल काँग्रेस कमिटी संघटीका सौ नीता कदम, सौ नाणेकर ताई, सर्व आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व आदरणीय मान्यवर, नागरीक, कार्येकर्ते व बंधु भगिनीनचे अभिनंदन व आभार आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक घनश्याम निम्हण यांनी मानले.