Shivsena Pune | उबाठा गटाच्या मकरंद केदारींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

Categories
Breaking News Political पुणे

Shivsena Pune | उबाठा गटाच्या मकरंद केदारींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

Shivsena Pune | उबाठा गटाचे (Shivsena UBT) विभाग प्रमुख मकरंद केदारी (Makrand Kedari) यांनी काल शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले (MLA Bharat Gogawale) व शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Bhangire) यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. (Shivsena Pune)
पुणे शहरात शिवसेनेत विविध पदाधिकाऱ्यांचा येण्याचा ओघ वाढला असून यामुळे इतर पक्षात अस्वस्थता वाढली आहे. वानवडी परिसरातील उबाठा गटाचे विभाग प्रमुख मकरंद केदारी  यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुण्यातील शिवसेनेचे संघटन बळकट करण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. शहरात शिवसेनेची ताकद वाढत असून दरम्यानच्या काळात पुणे महानगरपालिकेचे काही माजी नगरसेवक व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्ष संघटन बळकट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याच्या विकासासाठी सातत्याने लक्ष असून पुण्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असा शब्द दिल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले यांनी विभाग प्रमुख मकरंद केदारी यांना शुभेच्छा देतांना एक खंदा शिवसैनिक शिवसेनेत परत आल्याची भावना व्यक्त केली.  शिवसेनेचा आत्मा हा शिवसैनिक असून शिवसेनेकडे त्याचा ओढा कायम राहील असेही ते म्हणाले. यावेळी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे व असंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
—-
News Title |Shivsena Pune | Makarand Kedari of UBT group announced entry into Shiv Sena!

Shivsena Pune | शिवसेना भवनात शेकडो तरुणांचा शिवसेना प्रवेशाचा वाढता ओघ

Categories
Breaking News Political पुणे

Shivsena Pune | शिवसेना भवनात शेकडो तरुणांचा शिवसेना प्रवेशाचा वाढता ओघ

Shivsena Pune | पुणे शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी जोर वाढला असून सारसबाग येथील शिवसेना भवन(Shivsena Bhavan Pune) येथे काल हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या शेकडो तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Shivsena city chief Pramod Bhangire) यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. (Shivsena Pune)

यावेळी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला पुढे घेऊन जाण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या अध्यक्षपदी असलेल्या अभिजीत बोराटे यांना शिवसेना शहराच्या प्रवक्तापदी जबाबदारी देण्यात आली. तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा करण्यात आल्या. शहरात शिवसेनेचे पक्ष संघटन मोठ्या प्रमाणावर बळकट होत असून येत्या काही काळात शिवसेनेत विविध पक्षाचे मोठे पदाधिकारी सुद्धा प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच  शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.

यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे, महिला शहर प्रमुख लीना ताई पानसरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, वैद्यकीय शहर प्रमुख अजय सपकाळ, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, श्रद्धा शिंदे ,सामाजिक कार्यकर्ता अमर घुले, विभाग प्रमुख हडपसर अक्षय तारू, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. काहीच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी ही शिवसेना पक्षात प्रवेश केला हे विशेष.

Gunthewari Regularisation | गुंठेवारी नियमितीकरणाला मुदतवाढ द्या | शिवसेना प्रमुख प्रमोद भानगिरे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Gunthewari Regularisation | गुंठेवारी नियमितीकरणाला  मुदतवाढ द्या | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांची मागणी

 

Gunthewari Regularisation | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) १० जानेवारी 2022 पासून  गुंठेवारीचे (Gunthewari) प्रस्ताव दाखल करून घ्यायला सुरुवात झाली.  ज्या नागरिकांनी शहरातील खाजगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक 31 डिसेंबर 2020 पुर्वी अनधिकृत बांधकाम करुन घरे/इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणे करीता अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार १० जानेवारी २०२२ पासून  सर्व गुंठेवारी धारकांनी त्यांच्या गुंठेवारीविकासाच्या नियमितीकरणाची प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्याची मुदत 31 जुलै ला संपली आहे. ही मुदत चार वेळा वाढवून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांना लाभ होण्यासाठी याची मुदत अजून वाढवून देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे (Shivsena city Chief Pramod Bhangire) यांनी महापालिका आयुक्त तसेच राज्य सरकारकडे केली आहे.  (Gunthewari Regularisation)

 नागरीकानी दिनांक ३१ डिसेंबर २०२० पूर्वी विभागणी करण्यात आलेले भूखंड व त्यावर केलेल्या अनाधिकृत बांधकामासाठी लायसेन्स आर्किटेक्ट अथवा ला.इंजिनिअर्स यांचे मार्फत संगणक प्रणालीमध्ये प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार 10 जानेवारी 2022 पासून याची सुरुवात झाली होती. मात्र यासाठी नागरिकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून येत नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून यासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. शेवटची मुदत 31 जुलै ला संपली आहे. मात्र अजूनही काही नागरिकांना याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी शहर शिवसेना प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी महापालिका आयुक्त तसेच राज्य सरकारकडे केली आहे. (Pune Municipal Corporation News)

——

News Title | Gunthewari Regularization | Extend Gunthewari regularization Shiv Sena chief Pramod Bhangire’s demand

Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | पुण्यात बेकादेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई करा | शिवसेना शहर प्रमुखांची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | पुण्यात बेकादेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई करा | शिवसेना शहर प्रमुखांची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | पुणे शहरात बेकायदेशीरपणे रहात असणाऱ्या बांगलादेशीविरुद्ध (Illegal Bangladeshi in Pune) कारवाई करण्याची मागणी शहर शिवसेना प्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांच्याकडे केली आहे. (Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune)

शहर प्रमुखांच्या निवेदनानुसार  पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे सुविख्यात आहे.  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात बेकायदा पद्धतीने ५,००० बांगलादेशी रहात असल्याचे गुप्तचर विभागाच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पुण्यात लष्कराचे दक्षीण मुख्यालय येथे आहे. तसेच पुण्यात देहु, खडकी ही लष्कराच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. तसेच रिझर्व बँकेचे महत्त्वाचे कार्यालय देखील पुण्यात आहे. पुणे शहरात यापूर्वीही दोनदा बॉम्बस्फोट झालेले आहेत. तसेच नुकतेच पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून तरुणांची माथी भडकवणारा इसीस संबंधित डॉक्टर जेरबंद करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर ५,००० बांगलादेशी नागरिक पुण्यात बेकायदेशीरपणे राहत असणे, शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. बांगलादेशी नागरिकांचे राहणीमान, आपल्या
भारतातील पश्चिम बंगाल या राज्यातील लोकांशी मिळतेजूळते असल्याने, त्याचा गैरफायदा घेत बांगलादेशी पुण्यात रहात आहे. या बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी पुण्यात भाडे करार करुन राहणाऱ्या व्यक्तींनी मुळ मालकाशी योग्य तो करार केला आहे का? मुळ मालकाने त्यांच्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी केली आहे का? हे माहिती असणे आवश्यक आहे. अनेक घरमालकांनी याबाबत अनास्था दाखवली आहे. ज्यामुळे पुणे शहराला धोका निर्माण होवू शकतो. तरी मोहिम उघडून संयुक्तिक कारवाई करावी तसेच अवैधरित्या शहरात राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर निर्बंध आणावेत. असे भानगिरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Bangladeshi  Citizens in Pune)
——–
News Title | Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | Take action against Bangladeshi people living illegally in Pune Shiv Sena city chief’s demand to police commissioner

 Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

 Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा

Pune Potholes | पुणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल (Shivsena) आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी महापालिकेला (Pune Municipal Corporation) दिला आहे. (Pune Potholes)

भानगिरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असून, आज पुणे शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून जून महिन्यात पाउस झाला नसताना, जूलै महिन्यात फक्त पंधरा दिवसात झालेल्या पावसाने हे खड्डे पडले आहेत. पावसाळापुर्व केलेल्या कामाच्या माहितीत पुणे महानगरपालिकेतर्फे, आम्ही पावसळ्यात शहरात खड्डे पडू नये म्हणून ५५ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले होते, तरी फक्त १५ दिवसाच्या पावसाने पुण्यात रस्त्यावर खड्डे पडले आहेत.  या खड्डयामुळे दुचाकीचे शहर असलेल्या पुण्यात, दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. दुचाकींचे अनेक अपघात होत आहेत. चारचाकी वाहनांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आपणांस विनंती आहे की, येत्या १५ दिवसात पुणे शहर खड्डेमुक्त करावे, अन्यथा कायम समाजसेवेत तत्पर असलेल्या शिवसेनेतर्फे “शिवसेना स्टाईल” आदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित घडल्यास पुणे महानगरपालिका जबाबदार असेल. असे ही निवेदनात म्हटले आहे.

———-
News Title | Pune Potholes | Fill the potholes on the road quickly otherwise there will be a Shiv Sena style protest City President Pramod Bhangire warned

Shivsena Pune | Pune Water Cut | पुणे शहराची पाणीकपात रद्द करा | शहर शिवसेनेची महापालिकेकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Shivsena Pune | Pune Water Cut | पुणे शहराची पाणीकपात रद्द करा | शहर शिवसेनेची महापालिकेकडे मागणी

Shivsena Pune | Pune Water Cut | खडकवासला धरण (Khadakwasla Dam) जवळपास भरल्याने धरणातून मुठा उजवा कालवा मध्ये तसेच नदीतून  पाणी सोडायला सुरुवात (Water Discharge) झाली आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस सुरु असलेली पाणीकपात (Water cut) रद्द करण्यात यावी. अशी मागणी शहर शिवसेनेकडून महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Water Cut)

याबाबत शिवसेना पुणे चे अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी सांगितले कि आजही पाणी कपाती मुळे पुणेकरांना हाल सोसावे लागत आहे. खडकवासला धरण साखळीत काल रात्री पर्यंत ६०% पाणी साठा जमा झाला आहे. तर एकटे खडकवासला धरण ८२% भरले आहे.  पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण साखळी  पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पाटबंधारे खाते नदीपात्रातून विसर्ग करण्याच्या दृष्टीने काम करीत असून  नदीपात्रातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात रद्द करावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)

—-
News Title | Shivsena Pune | Pune Water Cut | Cancel Pune city water cut City Shiv Sena’s demand to the Municipal Corporation

Irshalwadi Landslide | Shivsena Pune | पुणे शिवसेनेच्या वतीने इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात | मदतकार्यसाठी टीम रवाना

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Irshalwadi Landslide | Shivsena Pune | पुणे शिवसेनेच्या वतीने  इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना  मदतीचा हात | मदतकार्यसाठी टीम रवाना

Irshalwadi Landslide | Shivsena Pune |  पुणे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod Bhangire) यांच्या वतीने रायगड (Raigad) येथे शिवसैनिकांची टीम पाठवत त्यांनी एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवन आवश्यक्य वस्तूच्या किट देखील गावातील नागरिकांना वाटण्यासाठी दिल्या आहेत.  या अन्नधान्य किटमध्ये सर्व जीवन आवश्यक्य वस्तूचा समावेश यामध्ये आहे. पुणे शिवसेनेची (Pune Shivsena) टीम सकाळीच रायगडच्या दिशेने रवाना झाली आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली. (Irshalwadi Landslide | Shivsena Pune)

 

रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील (Raigad Khalapur) इर्शाळवाडी (Irshalwadi) इथं बुधवारी मध्यरात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता सोळा झाली आहे. अजूनही 100 च्या आसपास लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनास्थळी काल मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होतं; शंभरपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि निसरड्या वाटांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यादिवशी सकाळीच घटनास्थळी पोहचले आणि दिवसभर सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. स्थानिक ग्रामस्थांना भेटून त्यांची विचारपूस केली आणि आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासनही दिलं.

याच पार्श्वभूमीवर पुणे शिवसेनेनं मदतीचा हात पुढे केला आहे.

—–

News Title | Irshalwadi Landslide | Shivsena Pune | On behalf of Pune Shiv Sena, a helping hand to the disaster victims in Irshalwadi Team sent for relief work

Shivsena Vs NCP | नाना भानगिरे यांचे प्रशांत जगताप यांना खुले आव्हान | राष्ट्रवादीकडील बेहिशोबी संपत्तीचा हिशोब द्या

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Shivsena Vs NCP | नाना भानगिरे यांचे प्रशांत जगताप यांना आव्हान | राष्ट्रवादीकडील बेहिशोबी संपत्तीचा हिशोब द्या

Shivsena Vs NCP | पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) गद्दार दिवस (Gaddar day) साजरा करत ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शहर शिवसेना (Pune Shivsena) आता चांगलीच चवताळली आहे. शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire)!यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना खुले आव्हान देत राष्ट्रवादीने बेहिशोबी संपत्तीचा हिशोब देण्याची मागणी केली आहे. (Shivsena Vs NCP)

ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (Nationalist congress party) राज्यभरात गद्दार दिवस (Traitor Day) म्हणून साजरा केला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांच्या नेतृत्त्वाखाली यानिमित्ताने गद्दार दिवस (Traitor Day) साजरा करत ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन (50 Khoke ekdam ok Agitation) करण्यात आले. ५0 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. (Traitor Day | Pune News)

राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर शहर शिवसेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. सेनेचे अध्यक्ष नाना भानगिरे यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भानगिरे म्हणाले कि राष्ट्रवादीने सत्तेत असताना पुणे महापालिका, शिक्षण मंडळ, पीएमपी मध्ये किती भ्रष्टाचार केला, हे जगजाहीर आहे. सत्तेत असताना किती संपत्ती मिळवली याचा जाहीर खुलासा प्रशांत जगताप यांनी करावा. भ्रष्टाचारी लोकांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत, असे देखील भानगिरे यांनी सांगितले. (Pune News)

——

News Title | Shivsena Vs NCP |  Prashant Jagtap Challenge by Nana Bhangire |  Give an account of the unaccounted wealth of NCP

PMC Pune New Village’s | समाविष्ट 34 गावांच्या लोकप्रतिनिधी समितीचे काय झाले?  | प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडला प्रश्न 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

PMC Pune New Village’s | समाविष्ट 34 गावांच्या लोकप्रतिनिधी समितीचे काय झाले?

| प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडला प्रश्न

 

PMC Pune new Villages | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट 34 गावांच्या (Merged 34 villages) समस्या सोडवण्यासाठी “लोकप्रतिनिधी समिती” (Representative Committee) नियुक्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याचा कुठलाही अध्यादेश आलेला नाही. याकडे शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena City President Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे लक्ष वेधले आहे. तसेच समाविष्ट गावांना न्याय देण्याची मागणी भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (PMC Pune New Village’s)
पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 34 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. (PMC Pune village news)
याबाबत प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यानुसार आजतागायत या समितीचा ना जी. आर. आला न समिती स्थापन झाली, ना काही हालचाल झाली. तश्या तक्रारी पुण्यातील पक्ष कार्यलयात येत आहे. तरी लवकरात लवकर आपण समिती नेमण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांना आदेश द्यावा व लवकरात लवकर कार्यवाही करावी व ह्या ३४ गावांना योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title |PMC Pune New Village’s | What happened to the People’s Representative Committee of the 34 villages involved?| Pramod Bhangire raised the question to the Chief Minister

Nana Bhangire | PMC Pune | कर संकलन (property tax) विभागातील ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात | शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कर संकलन (property tax) विभागातील ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात

| शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांची मागणी

सामान्य प्रशासन विभागाकडून कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील किमान ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात व पुढील ३ महिन्यात उर्वरित २०% व पुढील ३ महिन्यात २०% अशा बदल्या करण्यात याव्यात. अशाच प्रकारे पुणे मनपा प्रशासानाकडील सर्व खात्यांमध्ये सर्वच पदांच्या बदल्या तातडीने करणेची कार्यवाही करावी. अशी मागणी शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे  केली आहे.

भानगिरे यांच्या निवेदनानुसार महानगरपालिकेतील लेखनिक संवर्गातील प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक व पदस्थापना बदली यांच्या दि.१७/०४/२०२३ रोजी नियतकालिक एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात २० % बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यामध्ये सन २०१५ मध्ये ज्या सेवकांची कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक यांची नेमणूक झाली आहे असे सेवक आजही कर आकारणी कडे कार्यरत आहेत व सन २०१६ अथवा त्यानंतर नेमणूक झालेल्या मोजक्या सेवकांच्या बदल्या झालेल्या दिसून येत आहेत.

सध्या कार्यरत सेवकांची बदली करताना अनुभवी सेवक पाहिजे अशी मागणी कर आकारणी कर संकलन खाते प्रमुखांकडून होत आहे. कर आकारणी कर संकलन प्रमुख यांचेकडे मालमत्ता व्यवस्थापन असे २ पदभार असून त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे असे वाटते. असे असल्यास त्यांना एकाच खात्याचा पदभार देण्यात यावा.

सन २००७ – २००८ या आर्थिक वर्षात कर आकारणी विभागातील वर्ग-३ मधील सर्व पदांच्या सेवकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी वर्ग-३ मधील नवीन सेवक घेऊन कर आकारणी खात्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले व उत्पन्नात वाढ होऊन यश आले होते, हि बाब लक्षात घ्यावी. सामान्य प्रशासन विभागाकडून कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील किमान ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात व पुढील ३ महिन्यात उर्वरित २०% व पुढील ३ महिन्यात २०% अशा बदल्या करण्यात याव्यात. अशाच प्रकारे पुणे मनपा प्रशासानाकडील सर्व खात्यांमध्ये सर्वच पदांच्या बदल्या तातडीने करणेची कार्यवाही करावी.

कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडील अधिक्षक हे प्र.प्रशासन अधिकारी म्हणून काम करीत आहेत. आमच्या माहितीनुसार ते सन १९९७ रोजी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून ते आजतागायत (सन २०१२ ते २०१५ अशी ३ वर्षे सोडून) कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडेच कार्यरत आहेत. हि बाब सामान्य प्रशासन विभागाच्या लक्षात का आली नाही. सदर बाब अतिरिक्त महा.आयुक्त (ज) यांच्या सहमतीने करण्यात आलेली आहे अशी चर्चा पुणे मनपा वर्तुळात होत आहे.  प्रकरणी तातडीने योग्य कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची माहिती आम्हास देण्यात यावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.