cartoon competition | “बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

“बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

पुणे| जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त (५ मे) पुण्यामध्ये “बाळकडू” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागसमोरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे या स्पर्धेतील व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक ५ मे रोजी होणार आहे. नुकतेच या स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, युवासेनेचे राजेश पळसकर, अविनाश बलकवडे, सनी गवते, युवराज पारीख, संजय साळवी आणि शिवसैनिकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे अनंत घरत, व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी केले आहे.

जास्ती जास्त युवकांपर्यंत ही स्पर्धा नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. मराठी मातीतील कुंचल्याचे फटकारे, देशातील राजकिय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे, निर्भीड व्यंगचित्रकारांचे एक व्यासपीठ उभे करण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धकांनी सहभाग नोंदवण्यासाठी २ मे पर्यंत amit.papal19@gmail.com यावर आपले व्यंगचित्रकार पाठवावे किंवा ९०२८९०२१८०, ९९२२९२७९५९ यावर संपर्क साधावा.

Metro | Shivsena | पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

Categories
Breaking News Political social पुणे

पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा

| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

पुणे | सध्या चालू असलेल्या मेट्रोचे सर्व ठिकाणांचे स्ट्रक्चरल ऑडीट व फायर फायटींगची शासनमान्य एजन्सीमार्फत संपूर्ण ऑडीट करावे. तसेच याचा  अहवाल पुणेकरांसमोर ठेवावा. अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि माजी गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी  मेट्रो कडे केली आहे.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील अत्यंत महत्वाच्या अशा मेट्रो प्रकल्पाचे सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते.
त्यात काही दिवसांपूर्वीच अपूर्ण असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या वैभवात भर पाडणारा हा प्रकल्प असून सध्या पुणे मेट्रोची अवस्था काय आहे हे सर्व पुणेकर जाणत आहे. हा प्रकल्प पुणेकरांच्या कररूपी पैश्यातून उभा राहात आहे. परंतु हा प्रकल्प खरोखरच पुणेकरांच्या जीवीतावर आला आहे असे आम्हाला वाटते. या मेट्रोची अवस्था पुणेकरांच्या आठवणीतील सारस बागेतील फुलराणीसारखी झाली आहे. केवळ शनिवार रविवारीच यातून सफर करण्याचा आनंद घेत आहेत. त्यातच काही मेट्रो स्टेशनवर वाढदिवस व इतर समारंभ साजरे करण्यासाठी आपण पैसे घेवून मुभा दिलेली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, वास्तविक पाहता मेट्रोचे वास्तव्य काय हाच पुणेकरांच्या पुढील महत्वाचा प्रश्न आहे. आपण पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत असे वाटते. काही दिवसांपूर्वी आपल्याला काही तज्ञ व्यक्तींनी मेट्रो संदर्भातील त्रुटींचे पत्र दिलेले आहे. या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाले होते. त्या संदर्भातील विस्तृत माहिती आम्हाला मिळावी. तसेच १५.०६.२०२२ रोजी फायर फायटींग व इतर  कामांसंदर्भात पत्र दिले होते. त्याबाबतही कोणतेही सकारात्मक उत्तर मिळू शकलेले नाही.
तरी सध्या चालू असलेल्या मेट्रोचे सर्व ठिकाणांचे स्ट्रक्चरल ऑडीट व फायर फायटींगची शासनमान्य एजन्सीमार्फत संपूर्ण ऑडीट करावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. व त्याचा अहवाल पुणेकरांसमोर ठेवावा,  अशी जाहीर मागणी आम्ही करीत आहोत. असे शिवसेनेने म्हटले आहे.

Sanjay More | कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला | शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political social पुणे

कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला

| शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

पुणे | मागील आठ  महिन्यापासून सरकार असूनही 40% मिळकतकर सवलतीबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने काही निर्णय घेतला नाही. याना पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतु कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे पुण्याचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.
मोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेने मिळकत करातील 40% सवलत रद्द केली. 2019 पासूनच्या सवलतीची रक्कम 2022 – 2023 यावर्षीच्या बिलामधे आकारल्याने नागरिकांमधे नाराजी असल्याचे शिवसेना पुणे शहराचे वतीने 8 जून 2022 रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून लेखी पत्राद्वारे निवेदन दिले होते. आजपर्यंत काहिच निर्णय घेतला नाही. मागील आठ  महिन्यापासून यांचे सरकार असूनही याबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतू कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले. नागरिकांनी झिडकरल्यानंतर यांना मिळकत कर आठवला.
आठ महिन्यापासून शांत का बसले याचे उत्तर अगोदर यांनी द्यावे. पुणेकर नागरिक सुजाण आहेत. त्यांना चांगले माहिती आहे. मागील जूनमधे शिवसेनेने हा प्रश्न नगरविकास मंत्र्यांकडे मांडला. परंतू तेव्हा ते पुढच्या फुटीच्या प्लॅनिंगमधे व्यस्त असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. असे ही मोरे यांनी म्हटले आहे.

Agitation Against CM | मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन! | शिवसेना (ठाकरे गट) करणार आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन!

| शिवसेना (ठाकरे गट) करणार आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन (Agitation) करण्यात येणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने हे आंदोलन  सकाळी 11.00 वा. छ संभाजी महाराज पोलीस चौकी, अलका टॉकीज चौक, येथे हे आंदोलन होईल. अशी माहिती शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली. Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)

मोरे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात भूखंडाच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला, परंतू जुने पुराणे विषय काढून हे अधिवेशन भरकटवल जातय. भूखंडाचे श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.