Metro | Shivsena | पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा

| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

पुणे | सध्या चालू असलेल्या मेट्रोचे सर्व ठिकाणांचे स्ट्रक्चरल ऑडीट व फायर फायटींगची शासनमान्य एजन्सीमार्फत संपूर्ण ऑडीट करावे. तसेच याचा  अहवाल पुणेकरांसमोर ठेवावा. अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि माजी गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी  मेट्रो कडे केली आहे.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील अत्यंत महत्वाच्या अशा मेट्रो प्रकल्पाचे सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते.
त्यात काही दिवसांपूर्वीच अपूर्ण असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या वैभवात भर पाडणारा हा प्रकल्प असून सध्या पुणे मेट्रोची अवस्था काय आहे हे सर्व पुणेकर जाणत आहे. हा प्रकल्प पुणेकरांच्या कररूपी पैश्यातून उभा राहात आहे. परंतु हा प्रकल्प खरोखरच पुणेकरांच्या जीवीतावर आला आहे असे आम्हाला वाटते. या मेट्रोची अवस्था पुणेकरांच्या आठवणीतील सारस बागेतील फुलराणीसारखी झाली आहे. केवळ शनिवार रविवारीच यातून सफर करण्याचा आनंद घेत आहेत. त्यातच काही मेट्रो स्टेशनवर वाढदिवस व इतर समारंभ साजरे करण्यासाठी आपण पैसे घेवून मुभा दिलेली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, वास्तविक पाहता मेट्रोचे वास्तव्य काय हाच पुणेकरांच्या पुढील महत्वाचा प्रश्न आहे. आपण पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत असे वाटते. काही दिवसांपूर्वी आपल्याला काही तज्ञ व्यक्तींनी मेट्रो संदर्भातील त्रुटींचे पत्र दिलेले आहे. या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाले होते. त्या संदर्भातील विस्तृत माहिती आम्हाला मिळावी. तसेच १५.०६.२०२२ रोजी फायर फायटींग व इतर  कामांसंदर्भात पत्र दिले होते. त्याबाबतही कोणतेही सकारात्मक उत्तर मिळू शकलेले नाही.
तरी सध्या चालू असलेल्या मेट्रोचे सर्व ठिकाणांचे स्ट्रक्चरल ऑडीट व फायर फायटींगची शासनमान्य एजन्सीमार्फत संपूर्ण ऑडीट करावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. व त्याचा अहवाल पुणेकरांसमोर ठेवावा,  अशी जाहीर मागणी आम्ही करीत आहोत. असे शिवसेनेने म्हटले आहे.